charmingmanu

समजलेच नाही... marathi kavita .
« on: August 18, 2012, 11:38:31 AM »


समजलेच नाही...
_________________

शांत जागा म्हणता
उन्हाची तिरिप कधी आली..
समजलेच नाही...

विरह म्हणता म्हणता
विरक्ति कधी आली
समजलेच नाही....

नवीन नाते जुळले म्हणता
जुन्या नात्यांची ताटातूट कधी झाली
समजलेच नाही...

हसू ओठवर् आले म्हणता
डोळ्यात दुख कधी जमले
समजलेच नाही...

जीवन सुंदर आहे म्हणता
दिवस कधी सरत आले
समजलेच नाही...

आहे ते थोड जगावे म्हणता
वेळ कधी सरली
समजलेच नाही...