sonam
आपण आपले कवितेतच राहुयात..
____________________________

आपण आपले कवितेतच राहुयात..
भावनांचा खेळ करणारे
हळव्या.. प्रेमळ.. भावना जपूयात..
पाना फुलात बागडुयात..
पाखरासंगे खेळूयात..
नकोच मुळात तो
कपटीपणा.. छळवाद
सोसनार नाही तो मला...
आपण आपले
कवितेतच राहुयात...

चंद्र तार्‍याशी गप्पा मारूयात
उन पावसात चिंब भिजूयात..
नवीन मित्र बनवूयात..
एखादी चांगली कोणी भेटली
तर तिच्याशी प्रेम करूयात..
आपण आपले
कवितेतच राहुयात...

खेळ मांडून मायेचा.. प्रेमाचा..
असेच आपण एकमेकांच्या
मनात घर करूयात...
आपण आपले बरे
कवितेतच राहुयात...


marathi kavita .


marathi kavita .