sonamतेव्हा आईच्याही डोळा आले पाणी ...

नवससायास आले फळासी
जीव उमलला गर्भासी
दिस-मास पालटले जनांसी
सुख भरून पावलेसी

येता पोटी गोजिरे बालक
पाहिले डोळे भरून एकटक
नको आसपास राजारंक
हृदयी धरला तो जीव एक

तान्हुलं चालू लागले दुडूदुडू
मन लागले त्याभोवती गुरफडू
आठवणी सार्या गोडकडू
दिसू लागले रूप त्याचे रांगडू

आला लेकुराच्या सुखाचा क्षण
सुखावले आईचे प्रेमळ ते मन
केली तयारी जय्यत धडपडून
ठेपला येऊन दाराशी तो क्षण

हास्यासहीत ढग ओथंबला
मातेच्या काळजाचा ठोका चुकला
घटिका जवळी येता अश्रू ओघळला
अंतरपाट दूर होता त्यांचा जीव एक झाला

हसरे मुख आप्तेष्टांनी पाहिले
दुखरे मन क्षणासाठी झाकोळले
स्वप्न ते सार्यांचे साकार झाले
किंतु माते हृदयी कंठ दाटून आले

आजवरी छकूल्याला छान सांभाळिला
क्षण एक येता तो दुज्या हाती दिला
आशीर्वाद तोंड भरून दिला
दृष्ट न लागो तुझ्या संसाराला


marathi kavita .


best marathi kavita .nice marathi kavita .