sonam

पुन्हा तोच पाऊस….
अन पुन्हा तोच वारा…..
पुन्हा भावनांचा,
तोच खेळ सारा….

पुन्हा तोच सागर…
नव्याने उधाणलेला….
एक मात्र मनात…..
तसाच तहानलेला….

त्याच विजा नव्याने….
पुन्हा कडाडलेल्या….
तोफा भावनांच्या हृदयी…..
तशाच धडाडलेल्या…..

पसरला श्रावणाने….
फिरुनी तोच सडा….
परत पाणावलेल्या माझ्या,
नयनांच्या त्याच कडा…..marathi kavita .