sonam

परत लहान व्हायचे आहे मला
आईचा कुरवाळणारा स्पर्श,
बाबांबरोबर शाळेतजाताना मिळणारा हर्ष..

परत लहान व्हायचे आहे मला,
आई बाबांच्या प्रेमात नहायचे आहे मला!

... बाहुला-बाहुलीचं लग्न,
भातुकलीच्या खेळात तासन्-तास् मग्न..
परत लहान व्हायचे आहे मला,
आई झोपली असताना खाऊ पळवायचा आहे मला!

मामा-मामी च्या रम्य गावी,
सगळे लाड पुरविणारे आजोबा-आजी..
परत लहान व्हायचे आहे मला,
ए राजी , ए हौशी करत बैलगाडीतून चक्कार मारायची आहे मला!