Chota Kavi

पावसात एक बरं असतं . . . . .
« on: August 12, 2012, 12:12:55 PM »


पाऊस आठवणींचा
पावसात एक बरं असतं
भिजून घेता येतं
भिजता भिजता आतुन
आतून रडता येतं .
कोसळता सरी ओठांवरती
अधीर होते मन
थेंबाथेँबातून साजरा होतो .
आठवणीँचा सण
ओल्या मातीत आठवणीँच्या मग रुजून येता येतं . . .
भिजता भिजता . . .
आठवत राहतात तिलाही मग
हुळहुळणारे गाल
टिचभर छत्री टपटपणारी
अन् भिजलेला रुमाल
चिंब ओल्या रूमालानं तिचं डोकं पुसून घेता येतं . . . .
भिजता भिजता . . . .
आसू हासू , आशा ,हुरहुर
पावसाला सारं कळतं
मेंदीभरल्या तळहातावर
पावसाचं तळं जळतं
विरहाची काडी सुलगावून त्यात जळून घेता येतं . . .
भिजता भिजता . . .
सरतो पाऊस ,फिटते धुके
वास्तवाचे पडते ऊन
मन म्हणते चल रे गड्या ,
आपल्या घरी आपणाहून
पागोळ्यांचे बनुन थेंब रेंगाळत राहता येतं
भिजता भिजता आतून रडून घेता येतं
पावसात एक बरं असतं . . . . .