Chota Kaviहातात येईल म्हणता
क्षण सारे निघून जातात..
जपून ठेवावे म्हणता
वेळ अशी अचानक क्रूर होते..
आणि नशीबपण हात वर करून
सोबत सारे घेऊन जातो...!!!

आंधारल्या रातीत
धडपडत आहे एकटाच..
आजूबाजूस सडा पडला आहे
चांगल्या वाईट क्षणाचा...!!!

क्षण ते हातात येऊन
काही बोचतात तर
काही सुखावतात..
फेरा नशीबाचा इथेपण दुर्दैवी
जे पाहिजे ते नीट गवसत नाही...!!!

जगतोय कसाबसा
नशिबावर स्वाधीन होऊन..
कान माझे कंटाळून गेलेत
त्या अघोरी नृत्याला..
ज्यात क्षण आणि नशीब
नाचतात हातात हात घालून...!!!

दुर्दैव माझ्या स्वताचे
नाही पाहवत डोळ्याना..
मूकपणे भोगतोय
नशिबाचा फेरा आणि
क्षण चांगले वाईट घेतोय
मूकपणे अंगावर...!!!

डोळे मिटून जगतोय आता
दुनियादारी म्हणते मला
डोळे असून तू आंधळा ...!!!