Chota Kavi

विचार कसला...
« on: August 13, 2012, 10:10:13 PM »


विचार कसला...
_____________

हातांची बोटे उगाच
एकमेकांवर फिरवीत..
एकटक नजरेने..
कुठल्यातरी विचारात
त्या झाडाखाली का थांबलोय
माहीत नाही...!!!

अगदी माझ्यासारखाच
एका बाजूला सूर्य आहे..
काही तरी विचार करतोय
त्याच्या विचाराच्या तीव्र जाणीवा
अंगभर मला जाणवत आहेत...!!!

आणि एकीकडे
तो गार वारा..
आपल्याच विचारात
भरकटत आहे..
गोंधळून
एकडून तिकडे उगाच...!!!

तो गार वारा..
तो तप्त सूर्य..
यांच्या विचारांची प्रखरता
मी आता अनुभवतोय..
सूर्याची दाहकता..
वार्‍याची शीतलता..
माझा विचारभंग करत आहेत...!!!

ते झाड
इतके कसे निश्चल उभे आहे..
सूर्याची तप्त किरणे..
वार्‍याची झुळुक अंगावर घेत..
तो कसला विचार करतोय...!!!

मी काय विचार करतोय
याचाच मी अजुन विचार करतोय..
उत्तर काय सापडत नाही...!!!

अजूनही मी तिथेच आहे
हातांची बोटे उगाच
एकमेकांवर फिरवीत..
एकटक नजरेने..
कुठल्यातरी विचारात
त्या झाडाखाली का थांबलोय
माहीत नाही...!!!