Chota Kavi

एक तो एकटा...
« on: August 13, 2012, 10:17:47 PM »


एक तो एकटा...
_______________

त्या तिथे
एकट्या लोकांच्या जागेत
कोणीतरी एकटा बसला होता..

कुणास ठाऊक
कोण होता..
कुठला होता..
कसा होता...!!!

शांत त्या जागी
एकटाच तो बोलत होता..
एकटाच तो हसत होता..
एकटाच हसत हसत
अचानक तो रडत होता..
एकट्या लोकांच्या जागेत
कोणीतरी एकटा बसला होता...!!!

पाहत होतो मी
त्याच हसण बोलण..
लहान मुलासारखा तो होता..
मनाला पडणार्‍या प्रश्नाचे
उत्तर तो शोधता शोधता
स्वतालाच तो एक प्रश्न होता..
एकट्या लोकांच्या जागेत
कोणीतरी एकटा बसला होता...!!!

पाहून त्याला
मलाही वाटत आता
आपणही लहान व्हाव..
लहान होऊन
हसाव.. खेळाव.. बागडाव..
मनमोकळेपणाने बोलाव..
कदाचित मला हे जमणार नाही...!!!

हाच तो एक फरक आहे
त्याच्यात आणि माझ्यात..
अंगात त्याच्या
निरागसपणा अल्लडपणा होता..
तो अगदीच सरळ आणि होता...!!!

आणि एक मी आहे
माझ्या मुजोर मनाला
ते वागणे जमणार नाही..
मी दुरून त्याला पाहतो आहे
त्याच्या निरागस हळव्या
हालचाली पाहून..
एकटाच मी हसत आहे...!!!

वाटूनही मी..
लहान होऊ शकत नाही..
त्या जागेत बसु शकत नाही..
हसत नाही रडत नाही...!!!

खरच तो..
लहान होता
वेगळा होता
म्हणूनच..
एकट्या लोकांच्या जागेत
कोणीतरी एकटा बसला होता...!!!