आई - तुझी आठवण
आई म्हणजे मूर्तिमंत माऊली
घाले सदैव मायेची सावली
असे कर्तव्यतत्पर अन् उत्साही
धावे सदैव दुसऱ्यांसाठी
म्हणे करावे कर्म मन:शांतीसाठी
धरावी कास सत्याची
ठेवावा विश्वास भगवंताच्या चरणाशी
आई म्हणजे ज्ञानाचा झरा
मायेचा ओलावा
आई म्हणजे खळखळता झरा
उत्साह अन् आनंदाचा
आई म्हणजे हृदयाची हाक
निःशब्द जाग
आई म्हणजे क्षमेची मूर्ती
मुलांचे अपराध पोटात घालणारी
आई होती परोपकारी
स्वत:साठी न जगता
इतरांसाठी जगत राहणारी
आई तुझी आठवण येते
तू आहेस माझ्या चराचरात
सदैव तेवत माझ्या मनात
मृणाल वाळिंबे