vivekpawar

एकच कविता...
« on: February 03, 2014, 03:43:22 PM »
एकच कविता...

शंभर कागदे फाडुन
शेवटी एकच कविता केली
कधी सुरुवात
तर कधी शेवटच चुकला
प्रत्येक चुकीसह अश्रु
या नयनी मात्र दाटला

कधी हस्ताक्षर नव्हते बरे
तर कधी काना,मात्रा,वेलांटी  चुकली
सुधारण्यासाठी चूक हि
बाराखडी आज पुन्हा शिकली

कधी चुकला आठवणीचा
तुझ्या या क्रम
तर कधी नव्हता स्पष्ट
विरहाचा तो क्षण
त्यालाही एकच कारण
डोळ्यात या तुझ्या अश्रुंचे तारण

कधी सौंदर्य तुझे लिहिताना
शाईच सर्वत्र पसरली
तर कधी नजर नको लागाया
कुणाची म्हणून मीच ओतली
अन शंभरावा कागद तो फाडुन
शेवटी एकच हि कविता केली....

विवेक...