vivekpawar

पत्र तुला...
« on: February 03, 2014, 03:44:13 PM »
पत्र तुला...

आधुनिक या जगात प्रिये,
पत्र तुला लिहतोय..
सुरुवात कशाने करू?
उत्तर याचे अजून शोधतोय..
 
hi, hello आणि whatsup पेक्षा,
कशी आहेस? हीच सुरुवात बरी..
अन त्यामागची भावनाही,
माझी तेवढीच खरी..

मी आनंदात आहे,
खोटे हे माझे समजून घे..
तू मात्र आनंदातच आहे,
याची शाश्वती मात्र नक्की दे..
 
आठवले शेवटचे पत्र,
दहावीला असताना मी लिहिले,
त्यात १० पैकी फक्त दोनच मार्क्स
एक "प्रती" साठी अन
एक "प्रेषका" साठी भेटले..
 
झाले एकदाचे लिहून पत्र तुला,
समाधान मनाचे माझे मला..
post  करायला त्याला,
address तुझा आता शोधतोय..
आधुनिक या जगात प्रिये,
पत्र तुला लिहतोय....
   
विवेक...