vivekpawar

एक पाऊल पुन्हा मागे जावे का?

एक पाऊल पुन्हा मागे जावे का?
अनमोल माझे बालपण
पुन्हा मी जगावे का?
शाळेला दांडी मारून,
दफ्तर खुंटीला टांगुन
मित्रांसोबत पुन्हा उनाड मी बनावे का?

एक पाऊल पुन्हा मागे जावे का?
मन माझे तुझ्यावर मरतंय,
प्रेमात तुझ्या आता रोजच झुरतय..
घाबरून प्रेमाने तिला सांगावे का?
लाजरा तिचा होकार ऐकून मात्र
दिवसाच चांदणे पुन्हा मी पाहावे का ?
 
एक पाऊल पुन्हा मागे जावे का?
हरवलंय कुणी माझे
जाऊन त्यास शोधावे का?
सापडल्यावर आनंदाश्रू पुसताना
"पुन्हा नाही ना जाणार "
तिला मी विचारावे का?

एक पाऊल पुन्हा मागे जावे का?
जगलेले आयुष्य पुन्हा  मी जगावे का?
माहितीय नाही पुर्ण कधीच होणार,
तरी आशा मनात ठेवुन
अधुरे हे स्वप्न पुन्हा पुन्हा मी पहावे का?

विवेक...