vivekpawar

मन...
« on: February 03, 2014, 03:45:38 PM »
मन...

देवा चुकतय काय मनाचे
तेच कळत नाही रे,
जुनी पाऊलवाट सोडुन
नव्या वाटेवर ते
वळतच नाही रे...

जुन्या वाटेवर ,
जुन्या  क्षणात
शोधतेय कुणाला तरी,
नाहीच काही गावणार
शोधतंय भाभडे
हरवलेले असे काहीतरी...

शोधतांना हरवलेले
स्वतः नाही ना 
हरवून बसणार स्वताला ?
भीती  याचीच  रे ,
नाही कुणी वेड्या
मनाला या शोधायला...

एकदा घे रे कुशीत
या माझ्या मनाला,
घेई जशी माऊली
रडक्या तिच्या लेकराला...

सांग कानात त्याला
हरवलंय नाही,
गेलय सोडून तुला ते
पुन्हा न परतण्यासाठी...

कितीही केले प्रेम कुणावर
तरी बांधल्या असतात तुच,
जन्मोजन्मीच्या या रेशीमगाठी
साताजन्माच्या न तुटण्यासाठी,..

विवेक...