Lyrics Swapnil

मन माझे वेडे...
« on: August 04, 2014, 08:38:58 AM »
तु बघता मन माझे वेडे जरा शहारते,
तु हसता नाजुक खळी तुझ्या गाली पडते...
डोळ्यात कोणते माझ्या नशा  ही भिनते
का सागं जीव हा गंधाळून जात असे
चादंणे वाटते तुझ्या लाजण्यासारखे...
तु बघता मन माझे वेडे जरा शहारते,
तु हसता नाजुक खळी तुझ्या गाली पडते...
मिटताच डोळे अन् समोर पुन्हा तु दिसे,
का सागं अन् मला भास होत तुझे सारखे...
शोधत मी तुला वळणावरी हरवून जात असे..
का वाटे आता माझ्या मला हे वेड लागल्यासारखे...
तु बघता मन माझे वेडे जरा शहारते,
तु हसता नाजुक खळी तुझ्या गाली पडते...
समोर पाहता तुला हा जीव धुदावला,
अलवार डोळ्यातल्या तुझ्या डोहात गुतंला...
साद बावर्या स्पंदनाचा वाटतो का आज नवा,
हा भास की तुझी नशा उमजेना या मनाला...
तु बघता मन माझे वेडे जरा शहारते,
तु हसता नाजुक खळी तुझ्या गाली पडते...

www.aishwswapn143.blogspot.com
------------------------------
स्वयं लिखीत:-

©स्वप्नील चटगे
(दि. 03-08-2014)
-------------------------------