rupa

शब्द जुने उलगडावे
« on: March 18, 2015, 05:48:44 PM »
 स्वप्न जरासे पापणीत असावे
त्या राञीत कोणते गूज वसावे
साकारेल स्वप्न सत्यात कधी
जणु त्या स्वप्नात तूझेच चिञ दिसावे

कधी मोकळ्या हातांनी माझा निस्वार्थ उरी
मिठीत तुला घेता जग सारे विसरावे
थेंब तूझा स्पर्शाचा तना-मनावर ओघळता
नेञातुनी अवेळीच बांध का फुटावे

भुईस अंथरावे निळ्या अंबरास पांघरावे
थांबवुनी चांदण्यांस तूझे रुप त्यांस वर्णवावे
जसे श्रावणात सरींचे इंद्रधनूत सप्त रंगांचे
तसेच बंध गहिरे तूझे नि माझे हि असावे

असंख्य माझा भावनांना तूझेच अर्थ कळावे
आठवांच्या मैफिलीला तूझेच गीत सजावे
गुंतवावे शब्द जुने उलगडावे अर्थ नवे
उधळूनी रंग नवे मन फितुर का व्हावे
उधळूनी रंग नवे मन फितुर का व्हावे ..