rupa

पाहिले कितीदा तुला
« on: March 18, 2015, 05:49:47 PM »
भिजायचे होते मला
डोळ्यात काजळलेल्या
निवायाचे होते मला

तू कृपेची बरसात
तू सुखाची रुजवात
असे स्वप्न देखणे मी
पाहिले ना जीवनात

गाईलेल्या गाण्यात या
पाहिले कितीदा तुला
मांडलेल्या ओळीत या
सजविले सदा तुला

शोधतांना जन्म गेला
कवडसे काही जरी
आणि त्या हासण्याचा
भास खुळखुळे उरी.....