amolautde

मराठी कवीता
« on: August 17, 2016, 02:34:57 PM »
--- काटेरी राखी ---

राखी बांधता बांधता,
ताई बघते डोळ्यातं |
कसा चिडायचा दादा,
लहानपणीच्या खेळात |

बालवयात इवल्याशा,
मोठी समज ताईची |
तीच्यामध्येच दिसायची,
मला सावली आईची |

तूझ्या सारखी बहीणं,
मोठं नशीब हो माझं |
लहान वयातं पेललं,
मोठं जीवाहून ओझं |

अशी नितळ मनाची,
माझी बहीणं लाडाची |
रखरखत्या ऊन्हामधी,
होती सावली झाडाची |

राखी बांधून घेताना,
हात माझा हा कापतो |
राक्षसाच्या या दूनियेत,
जीव तीचा का धूपतो |

कधी संपून जाईल गं,
तूझ्या भितीचा हा घाटं |
कधी सूखरूप होईलं,
तूझी काटेरी ही वाटं |

तूझं करम बदलावं,
शाप आता हा पूसावा |
असा सोन्याचा दिवसं
माझ्या ताईला दिसावा |

--- काव्यरचना---
--- अमोल औताडे
(9130327777)