sachinikam

प्रेमासाठी काहीही
« on: December 26, 2016, 09:58:02 AM »
प्रेमासाठी काहीही
--------------------------------------------------
तुझ्या प्रेमासाठी प्रिये करेन मी काहीही
स्मित चेहऱ्यावरचे ढळू देणार नाही कधीही
माळावया गजरा सखे गुंफीन टपोर चांदणे
येशील ना धावून सये ऐकून माझे गाणे.
तू अशी आवडतेस मला
तू तशीपण आवडतेस मला
तू जशी आहेस तशीच
तू कशीपण आवडतेस मला
तुझ्या प्रेमासाठी प्रिये करेन मी काहीही
प्यावया पाणी तुला आणेन वळवून नदीही
परिमळ साऱ्या फुलांचा आणीन ओंजळीत
देशील का साथ प्रिये पाहून वेडी प्रीत.
तुझ्या एका हसण्याने मन माझे सुखावले
जवळी तुझ्या बसण्याने रोमरोम हर्षावले.
तुझ्या प्रेमासाठी प्रिये करेन मी काहीही
बनेन पुरुषोत्तम श्रीराम तू माझी वैदेही
परीसस्पर्शाने देईन तुला आणून मृगकांचनी
उतरतील नभतारका लेवूनी सौदंर्य लोचनी.
तुझ्या असण्याने शुष्क कंठ झाला ओला
तुझ्या नसण्याने सखे जीव अबोला अबोला.
तुझ्या प्रेमासाठी प्रिये करेन मी काहीही
बनेन श्रीकृष्ण मुरारी तू राधा बावरी
होशील मग्न वृंदावनी ऐकूनि मधुर बासरी
संगे तुझिया प्रीतगंध रोमरोमांत पसरी.
तुझ्या जवळ येण्याने आसमंत दरवळला
तुझ्या एका पाहण्याने श्वास श्वासांत विरघळला.
तुझ्या प्रेमासाठी प्रिये करेन मी काहीही
नाही जमला ताजमहाल बांधीन इवलेसे घरटे.
राजाराणी नांदू सुखाने
गाऊ आनंदाने मिलनगीते...
--------------------------------------------------
कवी: सचिन निकम, पुणे
९८९००१६८२५
sachinikam@gmail.com
--------------------------------------------------