Chota Kavi

चविष्ट ओला काजू...!!!!
« on: June 09, 2012, 08:18:28 PM »
चविष्ट ओला काजू...!!!!

जंगलात, डोंगरावर, माळरानात नैसर्गिक पद्धतीने वर येणा-या रानभाज्या चविष्ट आणि तितक्याच उपयुक्तही.. ओले काजू हे त्यापैकीच एक. मध्य अमेरिका आणि इतर उष्ण प्रदेशातील देश काजूचं उगमस्थान आहेत. सोळाव्या शतकाच्या सुरुवातीला पोर्तुगिजांनी ते फळ दक्षिण अमेरिकेतून भारतात आणलं.. आणि पाहता पाहता ते भारतातलंच एक पारंपरिक फळ झालं. पोर्तुगीज भाषेत या फळाला काजू म्हणतात. आता मराठीतही तेच नाव रूढ झालं आहे. काजूपासून काय बनत नाही ते सांगा..तेल, फेणी, सरबत, काजूगर..गोवा, कोकण पट्टय़ात तर काजूच्या ओल्या गराचा उपयोग भाजीत होतो...!!!