Chota Kavi

एक हापूस आंबा ३३३ रूपयांना...!!!
एक हापूस आंबा ३३३ रूपयांना...!!!

एका हापूस आंब्याची किंमत चक्क ३३३ रूपये! विश्वास बसणार नाही असे हे दाम रत्नागिरीचे शेतकरी आनंद जयंत देसाई यांना मिळाले आहेत.

देसाई हे गेली अनेक वर्षे अमेरिका, ऑस्ट्रेलिया, जपान इत्यादी देशांत आंबे निर्यात करत आहेत. पण यंदा हापूसला परदेशातून मागणी जास्त आहे असे ते सांगतात.

अर्थात सर्वसामान्य माणसाने या किंमतीमुळे घाबरून जाण्याचे कारण नाही असा दिलासा देवगडचे प्रगत शेतकरी कुमार फडके यांनी दिला आहे.

गेली अनेक वर्षे फडके कुटुंबीय हापूसची लागवड आणि विक्री यांत गुतले आहेत. ते म्हणाले की यंदा, फयान वादळाने कोकणाला झोडपले असले तरी हापूसच्या पिकावर फारसा परिणाम झालेला नाही.

त्यांनी सांगितले की, सध्यातरी वातावरण हापूसला अनुकुल आहे. मोहर नीट आला आहे. नेहमीप्रमाणे सुरुवातीला दर चढे असतात, पण साधारण मेच्या आरंभापासून दर कमी होत जातात. सुमारे ६० ते १०० रूपये डझन या भावाने रसदार हापूर आंबा मिळू लागेल. त्यामुळे आंबा रसिकांनी खरेदीची घाई करू नये असा सल्लाही ते देतात...!!!