Chota Kavi

पाऊस झाला हिरवा
« on: June 16, 2012, 08:06:01 PM »
पाऊस झाला हिरवा
हिरव्यागार पानांचा
थेम्बातून उलगडे
हा खेळ नव्या क्षणांचा

पाऊस आला दाटून
मेघांच्या अधरातून
होई पृथ्वी चैतन्याची
ओल्या गंधित मातीतून

पाऊस झाला धुन्दिचा
शब्दातीत ओळखीचा
वेडावल्या मनाच्या
हव्या हव्या आठवणीचा...!!!