m4marathi Forum

महाराष्ट्र पर्यटन : Maharashtra Tourism => कोकण : Konkan (Beauty of Maharashtra) => Topic started by: Chota Kavi on June 16, 2012, 09:49:17 PM

Title: मन नसत तर किती मज्जा आली असती
Post by: Chota Kavi on June 16, 2012, 09:49:17 PM
मन नसत तर किती मज्जा आली असती
सुख-दुःखाची कसली जाणीव झाली नसती

विचारांच्या चक्रात कोणी गुरफटल नसत
हूकूमशाहीच्या मनावर कोणी राज्यच केल नसत
रूसव्या फुगव्याच्या गर्दीत कधी कुस्तीच झाली नसती
मन नसत तर किती मज्जा आली असती

फुलपाखरू बनून कधी बागडलच नसत
गजबजलेल्या वस्तीत कोणी घुसमटच नसत
भावनांची शाल पांघरून केली नसती मस्ती
मन नसत तर किती मज्जा आली असती

सागराच्या प्रवाहाबरोबर वाहून गेल नसत
चलबिचलता अंगी बाणून खेळत बसल नसत
प्रत्येक क्षणाला रंग दाखवून केली नसती सक्ती
मन नसत तर किती मज्जा आली असती...
(http://a7.sphotos.ak.fbcdn.net/hphotos-ak-ash4/c67.0.403.403/p403x403/282065_270669922948241_236544_n.jpg)