Chota Kavi

पावसाच्या त्या सुंदर क्षणी
तो अन मी असेच बसायचो
एकमेकांच्या गप्पांत
उगाच तासंतास रमून जायचो

आठवतात ते क्षण
सोबत एकमेकांच्या सहवासातले
दोघांनी समुद्र किनारी बसून
वाळूतही स्वप्नातले घर साकारलेले

ते बाईक वरून आमच फिरणं
रोज रोज नाही पण कधीतरी असायचं
दोघांच एकमेकांवर प्रेम करणं
जणू स्वप्न सुख भासायचं

त्यान माझी उगाच काळजी करणं
मला नेहमीच खटकायच
त्या काळजीतीलही त्याच प्रेम
मला नंतर जाणवायच

भर पावसातही दोघे
आम्ही स्वच्छंदी होऊन फिरायचो
सिहगड काय अन माथेरान काय
सर्वच पालथ घालायचो

पावसाचे ते टपोरे थेंब
अंगावर झेलायला त्याला खूप आवडायचे
त्याच्या ह्या आवडीवर
मी मात्र त्याच्यावर खूप चिडायचे

रुसवा फुगवा काढत
दिवस असेच उडून जायचे
जीवनाच्या वाटेवर आतातरी
आपण स्थिर व्हावे आसे मला वाटायचे

माझ्या वाटण्याचा आता त्याला नाही गंध
हे मला सारख जाणवायच
माझ्या पेक्षाही आता त्याला
कोणी दुसरेच जवळच भासायचं

दिशा बदलल्या , वाटा बदलल्या
पण तरीही मन त्याच्यासाठीच झुरायचं
कधीतरी तो परत येईल
असा वेडा विचार मन माझ करायचं

आजही पावसाचे ते क्षण
हवेहवेसे वाटतात
पण पाउस येताच
पाण्याबरोबर आठवणीही वाहून नेतात...!!! :)