m4marathi Forum

महाराष्ट्र पर्यटन : Maharashtra Tourism => कोकण : Konkan (Beauty of Maharashtra) => Topic started by: Chota Kavi on June 18, 2012, 08:06:26 PM

Title: दूरवर रवान घराची खरी किंमत कळता
Post by: Chota Kavi on June 18, 2012, 08:06:26 PM
दूरवर रवान घराची खरी किंमत कळता
आठवण इली काय आपोआप डोळ्यात्सून पाणी गळता
"इम्पोर्टेड" ब्लान्केटात थंडी तर नसता...
पण "फाटक्या" गोडधेच्या मायेची कमी नक्कीच भासता
मार्बलच्या टाइलस वर सुळसुळीत तर वाटता
पण शेणान सारवलेल्या जमिनिचो सुगंध थय नसता
खारवलेले काजू आम्ही "ड्राई फ्रुट" म्हनान खातव
चुलीत भाजलेल्या काजीन्चो डिक मिस करतव
५०० रुपायक हापूसचे आंबे इकत घेतव
पन धोंडे मारून पाडलेल्या आंब्यांची मजा मिस करतव
कमोड मध्ये बसन आम्ही पेपर आरामात वाचतव
पण नदीर जावची मजा आम्ही गंभीररित्या हुकतव
एसी मध्ये बसान आम्ही थंडशीर हवा घेतव
पण गावाची हवा खाण्यासाठी येडेपिशे होतव
दूरवर रवान सुद्धा मालवणी आम्ही जपतव
पण खऱ्याखुऱ्या मालवणाक खूप्पच मिस करतव...!!!!
(http://a3.sphotos.ak.fbcdn.net/hphotos-ak-ash3/c29.0.403.403/p403x403/550227_421698414512057_1705323694_n.jpg)