m4marathi Forum

महाराष्ट्र पर्यटन : Maharashtra Tourism => कोकण : Konkan (Beauty of Maharashtra) => Topic started by: Chota Kavi on June 21, 2012, 09:42:35 PM

Title: कोकणातील एक प्रसिद्ध देवस्थानान आई भराडी मातेचे मंदिर .
Post by: Chota Kavi on June 21, 2012, 09:42:35 PM
कोकणातील एक प्रसिद्ध देवस्थानान पैकी एक म्हणजे
आंगणे वाडी येथील आई भराडी मातेचे मंदिर .
मालवण तालुक्यातील मसुरे या गावातील एक वाडी आंगणे वाडी.
दर वर्षी फेब्रुवारी महिन्यात एक दिवस आंगणे वाडीची जत्रा भरते. लाखो भाविक महाराष्ट्रभरातून या यात्रे साठी येतात.
सारी आंगणे वाडी माणसांनी फुलून जाते. सर्वत्र तोबा गर्दी असते.
भाविक खणा , नारळांनी भराडी मातेची ओटी भरतात. सामान्य माणसां बरोबर राजकीय नेते मंडळी सुद्धा भराडी मातेचे दर्शन घेण्यास येतात. रात्रभर जत्रेचा कार्यक्रम चालतो. भाविक वर्षभर या आंगणे वाडी जत्रेची वाट पाहतात.
(http://a1.sphotos.ak.fbcdn.net/hphotos-ak-snc7/425820_305811319479183_721553750_n.jpg)
Title: Re: कोकणातील एक प्रसिद्ध देवस्थानान आई भराडी मातेचे मंदिर .
Post by: ganeshpraorane on February 26, 2014, 02:47:39 PM

Changli Mahiti dili ahe, asich ajun mahiti det raha,  shubhechcha