anagha

महाबळेश्वर
« on: October 15, 2013, 11:29:49 AM »
आठवणीतले महाबळश्वर
सुहाना सफर और ये मौसम हंसी....
हे   नीले गगन के तले....
मानसीचा चित्रकार तो, तुझे निरंतर
चित्र काढतो,
अशी कितीतरी निसर्गाची छान छान गाणी आपण म्हणत व ऐकत असतो
व डोळ्यासमोर  त्याचे सुंदर चित्र आणत असतो. निसर्गाच्या सान्निध्यात, मोक ळया
हवेत,निळ्यासार    नील या आभाळाची   मजा काही वेगळीच असते. भव्य, दिव्य निळ
गगन, उडणारे पक्षी, पळणारे ढग, उगवतीचा डोंगराआडून येणारा, आपल्या लाल,
नारिंगी छटांच्या किरणांना घेऊन येणारा सूर्य व त्याचे पाण्यात पडलेले प्रतिबिंब
पाहताना वा! काय वर्णावे? फक्त हा आनंद अनुभवावा व मनाच्या कुपीत बंदिस्त
करावा.मावळतीचा  सूर्यही फार छान असतो. झाडांवर त्याचीपिवळी- किरणे
पडलेली असतात. झाडांचा वरचा भाग जणू सोनेरी मुकुट घातलेला भासतो.
                         पक्षी घरटयांकडे लगबगीने येत असतात. तो `सोन्याचा गोळा
तप्त लाल नारिंगी रंगात ढगाआड जाऊन पुन्हा पुन्हा डोकावत असतो. डोंगराआड,
खाली सरकेपर्यंत निसर्गप्रेमी त्याचा पिच्छा पुरवतातच! आता चंद्राचे राज्य सुरू होते. रात्रीच्या
चांदण्यांची लुकलुक, चंद्राची शांत, पांढरी दूधी कोर मनाला आनंद देते. हे सर्व
अनुभवल्यावरही मन तृप्त होत नाही. रोजच्या जीवनाच्या धावळीत माणूस स्वतःतच
एवढा व्यस्त झाला आहे, की त्याला फक्त उद्याची भ्रांत पडलेली असते. 
लागोपाठ 4/5 दिवसांची सुट्टी आली व आम्ही व्हन करून व आधीच
लॉज बुक करून महाबळेश्वराचा निसर्ग मनात साठवण्यासाठी बाहेर पडलो.
प्रथम सकाळी-सकाळी लवकरच उठून `विल्सन पॉइंट'ला भेट दिली. निसर्गाने
भरलेल्या या भूमीत, सह्यद्री पर्वतातील हिरवा शालू पांघरलेली भूमाता, दर्‍याखोर्‍यांत
वाहणारा झरा, लक्षात ठेवून त्यांची आठवणीने टिपणे काढणे हा छंद मी जोपासला.
सूर्याच्या सकाळच्या कोवळया उन्हात फारच मजा वाटत होती. जरा उजाडले तर
दूरवर पसरलेल्या  हिरव्या पर्वत रांगा दिसल्या . प्रतापगड ,पवनचक्की इत्यादी   
ठिकाणे दिसत होती. महाबळैश्वरला सापांची भीती वाटते म्हणून सावधपणे
आमची वाट आक्रमत होतो.
येथील निसर्गाच्या सान्निध्यात सर्व जण खूप मजेत व उत्साहात होते. थकवा पळून
गेला होता. तापोळिच्या उजव्या बाजूस छोटया बागेसारखे होते. कुठूनतरी हत्तीचा
आकारही बघितल्याचे स्मरते. येथील सिल्व्हर ओकची झाडे पाहिली व त्याची
पाने वहीत ठेवण्यासाठी आणली. पावसाÈयात धबधब्यांची मजा बघावयास मिळते.
त्यात `लिंगमळा' प्रसिद्ध आहे.
धुक्यात दर्‍याखोर्‍यांत वाट हरवून जाते. भातशेतीची, भाताची पिके वार्‍यासंगे
डोलत होती. लॉडविक पॉइंटवरून कोयना दूरवर गेलेली दिसत होती. `केट्स पॉ
इंट'वरून जलाशय, कृष्णेचे खोरे, पायर्‍या-पायर्‍यांची शेती, वृक्षवेली व हिरवळ
मनाला भुरळ पाडते. `एको पॉइंट'वर मुलांनी एकमेकांच्या नावाने हाका मारल्या
व `एको'चा आनंद लुटला. `एल्फिन्स्टन पॉइंट'वरून सृष्टी सौंदर्याचा आस्वाद
घेतल्यावर आम्हांला `मार्जोरी पॉईंट' दिसला. तिथून निसर्ग सौंदर्य फारच छान
दिसतो. मंकी पॉइंटच्या मंकीची दरीतील शिल्पे गांधीच्या माकडांची आठवण करून
देतात. `आर्थर सीट पॉइंट' हा एक मुख्य पॉइंट आहे. येथूनच हॉटनिंग पाइंटचा व
एको पॉइंटचा पुन्हा प्रत्यय घेतला. टायगर स्प्रिंग येथील पाण्याच्या कुंडाचे थंडगार
पाणी प्यायलो. या पॉइंटला बांधकाम असल्याने भीती वाटत नाही येथून निरनिराळ्या
रंगांची उधळण करणारा निसर्ग दिसतो. आर्थर हा युरोपियन माणून म्हणून हे नाव
दिले. पुढे पंचगंगेच्या मंदिराला भेट दिली. येथे गोमुख आहे व पाणी पडते त्या
कुंडाला `ब्रह्मकुंड' हे नाव आहे. शेजारी `विष्णुकुंड' येथे शिवलिंग रूद्राक्षाकृती
आहे. घोडयावरची रपेट करून आम्ही दोन पॉइंट बघितले, तेथून कोयना नदी व
छोटी घरे, वाडया बघता येतात. `बॉम्बे पॉइंट'वरून सूर्यास्त छान दिसतो. खरेदी व
घोडयावर बसून मजा करता येते. नवीन सूर्यास्ताचा सूर्य आकार बदलत असतो व
हौशी प्रवासी कमेर्‍याने त्याचे फोटो टिपत असतात. पिवळाया, तांबूस, नारिंगी रंगांची
उधळण करत सूर्य क्षितिज पातळीवर अस्ताला जातो.
वेण्णा लेक येथे नौकाविहार व भेळपुरीची चव चाखत व महाबळेश्वरच्या
सुंदर आठवणींसोबत, आम्ही दुसर्‍या दिवशी प्रतापगडावर जायचे ठरवले.
दुरूनच घेतलेले प्रतापगडाचे दृश्य प्रत्यक्षात साकार होणार होते. पराक्रमी
शिवराय व त्यांचे मावळेयांच्याविषयी मनात फार आदर आहे. जावळीच्या खोर्‍यातील
शौर्याची शिकस्त हा पराक्रम, घनदाट अरण्य जेथे सूर्याची किरणे पोहचत नाही. मोठे कडे, भयानक पायवाट, हिंस्त्र प्राण्यांचे आवाज; पण शिवराय
व त्यांचे मावळे यांनी या बिकट स्थितीवर मात केली होती. मावळयांच्या घोडयांच्या
टापांचे आवाज पूर्वा तेथे होते व ते खोरे या पराक्रमासाठी प्रसिद्ध आहे. शिवाजीराजांनी
जाळीच्या मोर्‍यांचा बंदोबस्त केला होता. आम्ही प्रतापगडावरील भवानीमातेचे दर्शन
घेतले, अफजलखानाचा वध शिवाजीराजांनी येथेच केला. प्रतापगडाच्या पायथ्याशी
त्याची समाधी आहे. म्हणतात मरणानंतर वैर संपते. खानाचा वध कसा झाला?
शिवाजींमहाराजांनी `गनिमी कावा' करून हा वध केला हे सर्वांना माहीत आहे.
शिवरायांच्या पराक्रमाच्या गाथा मनात साठवून व महाबळेश्वराचे `सौंदर्य'
डोळयांत व आठवणींत साठवून आम्ही परतीच्या प्रवासाला निघालो.