Anjali27

तिलाच त्याची ओढ का.???
« on: August 26, 2018, 11:25:27 PM »
Dedicate to Dear Khadus..!!!
नेहमीच फक्त तिलाच त्याची ओढ का..?
त्याच रुसणं चिडण तिला गोड का..?
क्षणोक्षणी तिलाच का त्याच्याशी बोलण्याची घाई..???
त्याच्याकडे मात्र तिच्याशी बोलण्यासाठी काहीच नाही..!!

त्याच्याशिवाय तिचं पाऊल का अडतं..?
त्याच्या अबोल्याने कायम तिचंच का नडतं..?
तिला त्याची उणीव का भासावी..?
त्याला तिची थोडीही गरज का नसावी..?
अळवावरच्या पाण्यासारखा तिचा राग का ठरावा..?
अबोल्याचा तिचा  निश्चय त्याचा बोलन्याने का हरावा..?
सदैव त्याच्या नी तिच्या पैजेत ती का हरावी..?
नकळत का होईना त्याच्या त्रासाचं कारण का ठरावी..?
काय खरं काय खोटं तिला काही कळेना..
त्याला मात्र कळुनही वळेना..
मनात तिच्या असे प्रश्नांचे थैमान का मांडावे..
उत्तरांसांंठी तिने कोनाशी भांडावे...???

Anjali27