Anjali27

न भुलेंगे ना माफ करेंगे
« on: February 18, 2019, 02:36:07 PM »
होळी येण्या आधीच होळी खेळुन गेले,
निधड्या छातीवर गोळी झेलुन गेले..
चाळीस वीरमातांचे वीरपुत्र भारतमातेसाठी प्राणांचे बलिदान देऊन गेले..
पाठीवरच्या वाराने अंग अंग झालं  होतं भंग..
तरीही तसुभरही फिका पडला नाही देशभक्तीचा रंग..
त्या वीरमाता धाय मोकलुन रडत आहेत.
कपाळाचं कुंकू पुसल म्हणुन वीरपत्नी बेशुद्ध पडत आहेत..
अजाण बालकं बाबांच्या पार्थिवाजवळ खेळत आहेत..
सुखी संसाराचेे स्वप्न बघणारे डोळे आज अश्रु ढाळत आहेत.
घरासोबतचं देशाची जबाबदारी ज्याने स्वत:च्या खांद्यावर घेतली..
त्याच वीरपुत्राला खांदा देण्याची परीस्थिती त्या वीरपित्यांवर बेतली..
त्या आईवडीलाना  खांदा कोण देणार..?
भावाचा आधार कोण बननार..?
आता लाडकी बहीण राखी कोणाला पाठवणार..?
त्या अजाण लेकरांना बाबांची माया कशी मिळणार..?
अन्..
काळे मणी विखुरले.,रक्ताच्या सड्यापुढे कुकवाचा लाल रंग फिकट पडला..
हिरव्या चुड्याची किणकीण करत पत्नी आता वाट कोणाची बघणार..??बाँम्बगोळ्यांच्या आवाजात त्यांची किंकाळी विरली..
पुन्हा एकदा भारतमाता चाळीस वाघांना मुकली..
भेकड पाकिस्थानच्या पोटी आतंकवाद निपजला..
बेसावध वीरजवानांच्या पाठीत खंजीर खुपसला..
शुर वीरजवानांच बलिदान व्यर्थ जाणार नाही..
भारतीय सेना बदला घेतल्याविणा राहणार नाही..!!
''न भुलेंगे ना माफ करेंगे'' म्हणत CRPF बदला घेणार..
''भारतमाता की जय'' चा नारा देत पाकिस्तानला नेस्तनाबूद करणार..!!!
🇮🇳🇮🇳🇮🇳

पुलवामा हल्ल्यातील सर्व शहीद वीरजवांनांना भावपुर्ण श्रद्धांजलि...
💐🙏🏻🙏🏻🙏🏻💐

@njali27
9689099673