Tejasvi

मी स्वप्न पाहतो
« on: July 05, 2012, 06:41:52 PM »
मी स्वप्न पाहतो
माझ्या देशाचं
गरुडझेप घेऊन उडणाऱ्या   
उद्याच्या महान भारताचं

बहाल केले अनेक वीरांनी
प्राण स्वातंत्र्यसाठी
मी स्वप्नं पाहतो
त्यांच्या मनातल्या तेजस्वी भारताचं
 
आज देशासमोर प्रश्न
भ्रष्टाचार, घुसखोरी, गरीबीचा
मी स्वप्नं पाहतो
स्वयंपुर्ण, निर्मळ, शांत भारताचं

माझ्या देशाचा प्रत्येक नागरिक
जगेल माझ्या भारतासाठी
मी स्वप्नं पाहतो
हे स्वप्नं पूर्ण होण्याचं