Harishnaitam

क्रांतीसुर्य महात्मा फुले

मुलींची पहिली शाळा काढून दिले मुलींना शिक्षण
अंगावर दगळ, शेनाचे घाव सोसून रचला स्री शिक्षणाचा पाया
मुलींना शिक्षण देऊन तुम्ही केला या समाजाचा उद्धार
म्हणूनच स्री आहे पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून ||

बाल विवाहाला विरोध करून विधवा विवाहाचा समर्थन केला
अनिष्ट रूढी परंपरा नष्ट करून बहुजनांचा तुम्ही उद्दार केला
ब्राम्णांचे कसब, गुलामगिरी या सारखे ग्रंथ लिहिलून
जातीव्यवस्थे आणि वर्णव्यवस्थे विरुद्ध बंड पुकारला ||

शेतकऱ्यांचे आसुड ग्रंथ लिहिलून त्यातुन मांडली शेतकऱ्यांची वेथा
त्यातुन अन्यायाविरुद्ध आवाज उठण्याचा मंत्र दिला
जातीपातीत विभागलेल्या बहुजन समाजाला एकत्र केला
अंधश्रद्धेच्या या कचाट्यातून बाहेर काढण्यात मोलाची भूमिका बजावलात ||

रयतेचे राजे लोककल्याणकारी छत्रपती शिवाजी महाराज यांची
समाधी शोधून पहिल्यांदाशिवजयंती साजरी केलात
पहिल्यांदा शिवाजी महाराजांवर पोवाडा लिहून
शिवाजी महाराजांचा ईतिहास उजेडात आणलात ||

      कवी : हरिष नैताम मो.न. 9834209927