kk

काय सांगू पिऊ, तू किती गोड दिसतेस,
चांदन माळून स्वप्नांना घेऊन, शब्द फुलांचा सुगंध घेऊन तू येतेस,
आनंदाची पखरण जेव्हा तू करीत जातेस, काय सांगू पिऊ तेव्हा तू किती गोड दिसतेस....

अंबराची शाल निळी अंगावर ओढ़त, निळाईच्या रंगाने तू जशी बरसतेस, श्रावणाच्या दिवसात सोबत माझ्या तू असतेस, काय सांगू पिऊ तेव्हा तू किती गोड दिसतेस....

निराश मनाला पुन्हा उभारी देऊन, हळुवार साद, शब्दात तुझ्या, अलवार तू घालतेस,
बेभान भरारी, माझ्या स्वप्नांना, पंख तुझे तू देतेस, काय सांगू पिऊ तेव्हा तू किती गोड दिसतेस...।।।