Ravi padekar

 पुन्हा घरी येण्यासाठी आमची गाडी निघाली होती..... गाडीत तोच जल्लोष होता..... मस्ती मज्जा करत सर्व चालले होते....... पण पल्लवीचा चेहरा मात्र अबोलच वाटत होता..... ती मात्र शांतच होती..... सहल तर मजेशीरच झाली होती...... पण नेमकं काय झाल तेच दिगंबरला कळत नव्हतं.......... दोन तीन दिवसांनी सोनल कडून कळलं की जितू ने तिला propose केला होता.....
असा हा झालेला प्रसंग दिगंबरने पाहिला होता...... त्याची मनशक्ती थोडी कमी झाली होती......  त्याच बोलणं तिच्यासोबत कमी झाल होत..... दिगंबरला तर ती आवडायची पण आता तिच्याशी बोलायला पण हिम्मत नव्हती त्याची...... त्याच्या प्रत्येक वहीच्या शेवटच्या पानावर फक्त तीचच नाव होत.... पण जितूचा प्रसंग पाहील्यापासून दिगंबरची बोलायची हिम्मत नव्हती...... दिवस सरत सरत बोर्डाच्या परिक्षेपर्यंत पोचले होते..... प्रेम हे काय असत नेमकं कुणालाच कळलं नव्हतं..... पण दिगंबरला तिचा लळा लागला होता.... आज शाळेचा शेवटचा दिवस..... पल्लवी casual ड्रेस मध्ये खरच खूप छान दिसत होती..... दिगंबर, सोनल, पल्लवी सर्वांनी पुन्हा भेटणार नाही म्हणून फोटो काढले...... शेवटचा दिवस कुणाला काय बोलावं काहीच कळत नव्हतं...... सर्वांचे डोळे पानवलेले..... पुढे कोणत कॉलेज, कुठे addmission या सार्‍या गोष्टी चालल्याच होत्या..... एकमेकांचे number तर मिळालेच होते पुढे contact साठी..... दिगंबरने ही पल्लवीचा number घेतला होता..... सर्व निघाले

“दिगंबर" ( पल्लवीने हाक मारली)
“बोल काय झाल"
"हे घे तुझ्यासाठी" (पल्लवी ने त्याच्यासाठी एक छोटस gift आणल होतं )
अगं...! हे कशासाठी?
" राहुदे रे, आपली एक आठवण म्हणून"
दिगंबर ही गिफ्ट घेऊन घरी गेला.... पण त्याची काही बोलायची हिम्मत नाही झाली...... खूप दिवस असेच सरत गेले.... नंबर मिळाल्यामुळे त्यांचं होणार बोलणं यामुळे मैत्रित कधीच दुरावा पडला नाही.....दिगंबर engineering करत होता..... आणि पल्लवी तिच्या मामाकडे आपल राहिलेलं शिक्षण पूर्ण करण्यासाठी गेली होती....... 6-7 वर्ष झाले तरीही मैत्री अशीच होती घट्ट....... पण नेहमी फोन वर बोलण्यात , मेसेज ने बोलण्यात आता दिगंबरला राहवल नाही त्याने ठरवलं आज तिला विचारायच....त्याने तिला call केला.......
“hello.....!
“hello dear.... कसा आहेस ?..... पल्लवी
“मी मस्त.....तु कशी आहेस ?........दिगंबर
“मजेत...... बोल काही काम होत का?
“नाही सहजच......तुझ्याशी बोलायचं होत थोड”
“बोल ना....!!!”
“ खूप दिवसापासून तुला एक गोष्ट सांगायची होती.......पण शब्द मुके होते या ओठांवर......कित्येक दिवस कित्येक रात्र  तुझ्याच विचारात मन हि वेडे होते...... पण आज नाही राहवलं.....
मला आवडतेस तू...... माझ पिरम हाय तुझ्यावर......लग्न करशील माझ्याशी? Hello (समोरून काही आवाज येत नाही......
Are you there?
Hmm..!  मला अपेक्षा नव्हती तू असा काही बोलशील म्हणून......तू खरच माझा एक चांगला मित्र आहे..........आपली मैत्री अशीच चिरंतर राहू दे......पण please आपल्या मैत्रीला असं प्रेमाचं नाव नको जोडूस.... चल bye....
इतके दिवस मनात अडकून बसलेल्या विचारांच्या पाखरांना दिगंबरने आज मोकळं केल होत......त्याने फोन ठेऊन दिला....

            काही दिवसांनी दिगंबरचे वडील आणि सोनलच्या वडलांनी त्यांच्या दोघांचा लग्नाचा विषय काढला......नाही नाही म्हणता दोघंच लग्न ही झाल......दोघंच संसार आंनदाने चालला होता.... कित्येक वर्ष कपाटात बंद असलेल गिफ्ट दिगंबरने हातात घेतलं.... ते काचेच बाउल असलेल गिफ्ट, त्यामध्ये सुंदर असं couple चंद्रावर बसलेले, आणि त्याने switch on केल्यावर त्यांच्यावर बरसणारे ते तुटते तारे.... (light च्या स्वरूपात)..... त्याने ते ठेवून दिल आणि बाहेर आला..... सोनल अंगणात बसली होती. तेच पुन्हा तुटत्या तार्‍यांकडे पाहत.....
"काय पहातेस आभाळात?”
"काही नाही...”
“खरच किती सुंदर असत ना! या तुटत्या तार्‍यांकडून आपल्याला मिळणारी गोष्ट मिळाली असती तर.”..... दिगंबर
“हम्मं...!
“सोनल ही त्याच्या मिठीत शिरली....!!! आणि तिने मनोमन म्हटलं....”कित्येक तुटत्या तार्‍यांकडे मी तुलाच मागत आले, म्हणून आज मी तुझ्या मिठीत निवांत आहे”
           दोघांचा संसार पण सुखात आंनदाने चालला होता.....पण त्यांनी सुद्धा कधी मैत्रीत दुरावा आणला नाही..... पल्लवी देखील आनंदी होती आपल्या संसारात.......ते दोघे पल्लवीला भेटण्यासाठी महिन्यातून एकदा तरी जात होते.....!!!

(ही कथा आवडल्यास नक्की share करा.)
story written by- Ravi Padekar (Mumbai)
contact- 8454843034.