Ravi padekar

 रामच्या च्या मनात चलविचल चालू असतात, त्याला सुचत नाही काय कारव... तो घरात विचार करता करता चकरा मारत असतो.... त्याला वाटत असत आपली चांगली मैत्री तुटू शकते....रामच्या मनात आता तिच्याशिवाय कुठलाच विषय नसतो.... राम रविला contact करण्याचा प्रयत्न करतो, पण फोन काही उचला जात नाही.... सारखे फोन केल्याने फोन चा आवाज तिथेच त्याच्या घरात असलेल्या रविच्या बॅग मधून येतो.... रवि तर बॅग इथेच विसरला आहे, हे त्याच्या ध्यानात येत.... राम तर बॅग OPEN करून पाहतो तर त्या मध्येच फोन वाजत असतो,  हा बहुतेक फोन इथेच विसरलाय... ओपेन केलेल्या बॅगमधून त्याला एक डायरी दिसते.... त्या डायरीवर नाव असत "...आठवणी....."  राम त्या डायरीची पान पलटून बघतो... त्यात खूप काही लिहिलेलं असत....म्हणून राम ती डायरी वाचायला सुरवात करतो...
             कॉलेज मध्ये पहिल्यांदाच तिला पाहिलं होत.... आणि पाहता क्षणीच तिच्या प्रेमात पडलो होतो.....Blue कलर च्या ड्रेस मध्ये खरच खूप छान दिसत होती ती....कानात मोठे रिंग... कपाळावर चंद्रकोर.... डोळ्यावर येणारी तिची बट...तिची HairStyle खरच खूप मोहक होती....तिची आणि आमची कधी अशी भेट घडेल अस वाटलं नव्हतं....तिचा लागलेला रामला धक्का.... त्या दिवशी खरच तिचा खूप राग आला होता... पण राम मुळे आज पूर्ण लेक्चर मला तिला पाहता आल... खरच तिच नाव विचारायला जाणार होतो...पण रामनेच मला सांगितलं "तनवी" म्हणून.... Next day पुन्हा ती आमच्याकडेच येत होती, पण मला खरच माहिती नव्हतं की तिला सॉरी बोलायचं होत....उगच तिच्यासोबत एवढं भांडलो... राम तर काही बोलतच नव्हता....  तिच्या मैत्रिणीला मी बोललो खरच तिला सॉरी सांग... मला खरच माहिती नव्हतं.....तेव्हा कुठे तनवी ने एक स्मितहास्य देऊन Its ok म्हटलं....आणि मला माझ नाव विचारलं...मी ही सांगितलं रवि म्हणून....तेव्हाच आमची खरी ओळख झाली... आणि आमच बोलणं वाढल.... राम, मी आणि तनवी आम्ही नेहमी एकत्रच असत.... त्याच्या दुसर्‍या  दिवशी आम्ही खूप भिजलो पावसात... " तनवी" तर आजारीच पडली होती.... पण मला तर तिचीच काळजी लागली होती...तेव्हा रामला घेऊन मी तिच्या कडे गेलो होतो....  रामला कधी तिचा एवढा जिव्हाळा लागला कळलच नाही....तेव्हा कळलं रामचं "तनवी" वर प्रेम आहे म्हणून....मनातलं घरच तुटल होत... काहीच कळत नव्हतं.... राम ने म्हटलं, "खरच मला ती खूप आवडते यार, काही तरी help करना....!!!" काय बोलावं काहीच कळत नव्हतं...कुणीतरी काळीज चोरून नेल्यासारख वाटत होत... मी ही म्हटलं......"करेन ना त्यात काय?"आणि तेवढं बोलून निघून गेलो....
            परवाच "तनवीचा" वाढदिवस... रामला घेऊन मी गिफ्ट शॉप मध्ये गेलो, आणि मला तर माहिती होत तिला काय आवडत?  पण रामच्या आवडीसाठी मी दोन- तीन गिफ्ट आणखीन पाहिले.... रामला बोललो ही रिंग घे, तिला नक्कीच आवडेल..... पण रामकडे तेवढे पैसे नसल्याने मी माझ महागड घड्याळ विकल फक्त तिच्यासाठी....आणि ते गिफ्ट pack केल........उद्या तिच्याच वाढदिवसाला जायचं आहे....आणि  तिला हे gift नक्की आवडेल.... मला खात्री आहे ती उद्या मी संगीतलेलाच  ड्रेसच wear करणार.   ............................................................................
...

...
       
राम हे सर्व वाचून स्तब्दच होतो..... त्याला समजत नाही हे नक्की काय आहे... स्वतच्या मनातली गोष्ट लपवून मित्रासाठी एवढं करायचं.... त्या वेळीच रामला सर्व कळालं... खरं तर रविच खूप प्रेम होत तनवी वर पण त्याने कधी बोलून दाखवलं नाही....फक्त आपल्या मैत्रीसाठी......तो सर्व हे करत राहिला.....राम ने कसला ही विचार न करता तनवीला फोन करायचं ठरवलं..... जे काही आहे ते सर्व खर सांगायचं.... राम  ने तनवीला फोन करून सर्व काही खरे सांगितले.... “ रविच तुझ्या वर खूप प्रेम आहे आणि हेच सांगण्यासाठी तो तुझ्याकडे येत आहे...” तुझ्या प्रेमासाठी त्यांनी कधीच आमच्या मैत्रीत अंतर पाडल नाही... Pls त्याच तू प्रेम स्वीकार... एवढं बोलून राम फोन ठेवून देतो.
 रवि तनवीच्या घरी पोहचतो.... आणि तनवी पुढे येतो...” काय रे काय झाल?? तनवी म्हणते... "मला तुझ्याशी बोलायचं आहे!!!”.....रवि.
"एवढ्या रात्री??” तनवी
"हो थोड महत्वाच आहे!!!"..... रवि
"हम्मं!!!" तुझ माझ्यावर प्रेम आहे हेच ना??......तनवी
“नाही!!! रामच तुझ्यावर प्रेम आहे, हे सांगायला मी इथे आलोय?.... रवि
“ तुझ नाही का??.....मला राम ने सर्व सांगितलं आहे.
रविला काहीच कळत नाही... काय बोलावं ते....
"मग हे काय आहे?( तेवढ्यात राम तेथे येतो डायरी घेऊन....आणि म्हणतो)
रवि आणि तनवी दोघेही मागे वळून बघतात.....आणि राम त्यांना सर्व गोष्ट सांगतो.... खरच रविचे डोळे पानवलेले असतात....खरच खूप प्रेम असत त्या डोळ्यामध्ये... मैत्रीसाठी फक्त अबोल राहिलेलं हे  प्रेम तनवी ला ही आवडत.... मी तर त्या दिवसा पासूनच तुझ्या प्रेमात पडली होती... ज्या दिवशी आपण एकत्र पावसात भिजलो होतो.... शेवटी तीच विचारते.... "लग्न करशील माझ्याशी...?? खर तर माझही खूप प्रेम आहे तुझ्यावर.” रविने तिला आनंदाने उचलून घेऊन घट्ट मिठीत घेतले.... आणि आपल्या मित्राकडे पाहत त्याला हातानेच thumb दाखवत थॅंक्स म्हटलं......

ही कथा आवडल्यास नक्की share करा.... (Writer- Ravi :-8454843034)

Ashish Dingankar

 :) :) :) :) :) :)

bk

Re: कॉलेज मधलं प्रेम...!!! (भाग-३)
« Reply #2 on: October 20, 2016, 06:25:26 PM »
vary nice story.....

MANISHA NARWADE

Re: कॉलेज मधलं प्रेम...!!! (भाग-३)
« Reply #3 on: October 24, 2016, 09:22:50 AM »
khupach khupach chan