Ravi padekar

  कॉलेज मध्ये एकदा PRESENTATION  साठी ग्रुप बनविण्यात आले  ... पाच जणांचा ग्रुप चिट्ट्यापाडून तयार करण्यात आला... योगायोग असा की रवि- तनवी- आणि राम हे एकाच ग्रुप मध्ये आले होते ... पण तनवी ला नकोस वाटत होत त्यांच्या सोबत काम करन.... म्हणून तिने आपल्या सरांना विचारले... पण त्यांनी तिचे बोलणे नाकारले.... पण हळूहळू PRESENTATION साठी मिळणारा वेळ त्यांच्या मैत्रीसाठी खूप अनमोल ठरत गेला ...
रामचे विनोदी बोलणे... रवि ने मारलेले टोमणे.... अशाच होणार्‍या गप्पा गोष्टीमुळे सर्व खूप चांगले मित्र झाले....हळू हळू तनवी ही त्यांच्या मध्ये रुजू लागली होती....   PRESENTATION ही एकदम व्यवस्थित पार पडले....
         कामामुळे त्यांना त्यांचे मोबाइल नंबर एकमेकांना share करावे लागले.....नेहमी FB - WhatsApp वरील chat यामुळे मैत्री खूप वाढत गेली..... राम, तनवी, रवि नेहमी कुठेही एकत्रच असत, कॅंटीन, लायब्ररी मध्ये....राम आणि  रवि दोघेही बालपणापासूनचे जिवलग मित्र... सर्व गोष्टी SHARE करणारे.... रविला Sketching काढणे, कविता बनविणे या सर्व गोष्टी आवडत होत्या....  PRESENTATION मध्ये लागणारे designs सुद्धा त्यांनीच तयार केले होते.... त्याला माहीत होत राम ला ती खूप आवडते.... त्यांनी एकत्र येण्यासाठी रविचे चाललेले प्रयत्न....
            परवा तनवीचा वाढदिवस.... हे कोणाच्याच लक्षात नव्हतं. ...रवि रामला आठवण करून देतो.... "हीच संधी आहे तिला प्रपोज करण्याची!!!” ....रवि
“अरे पण करणार कस !!!”... राम
" चल माझ्याकडे एक कल्पना आहे !!!” रवि राम ला घेऊन Gift  Shop मध्ये जातो...
खूप गिफ्ट पाहिल्यानंतर त्यांना एक रिंग पसंत येते....पण त्या गिफ्ट ची किमंत थोडी जास्त असल्याने
दोघ ही एकमेकांच्या चेहर्‍याकडे पाहतात.... थोडे पैसे कमी पडत असल्याने रवि रामला थोड Wait करायला सांगतो....आणि बाहेर येतो.... कसे तरी पैसे adjust करून रवीने ते गिफ्ट pack केले ....
                आज तिचा वाढदिवस.... दोघेही तिथे पोहचतात....."तनवी"च्या हातात गिफ्ट दिल्यानंतर तिच्या चेहर्‍यावरच्या आंनदाणे रामला खूप छान वाटत... राम पुढे सरसवतो....आणि बोलतो.
"तनवी...!!!”
"हा बोल ना !!!'....तनवी म्हणते
"खूप दिवसापासून तुला एक गोष्ट सांगायची होती.!!!”....राम
“कसली !!!”

पण तिच्या भोवती असणार्‍या कल्लोळामुळे त्याची हिम्मत होत नाही....तिला Propose करण्याची....
“अरे तू काहीतरी सांगत होता!!!”..... तनवी
“काही नाही ग, नेहमी पेक्षा आज तू खूप छान दिसतेस  !!!”..... राम
“ohh  Thanks....!!!” तनवी
दोघांमध्ये बराच वेळ बोलणं चालल होत... रवि आपल्या मित्रामध्ये वेळ घालवत असतो...दोघांना मोकळा वेळ मिळावा म्हणून तो बाकीच्या मित्रांना आपल्या बोलण्यातून आपल्याकडे आकर्षित करून घेतो...
रात्र पसरलेली असते.... वेळ अशीच सरलेली असते... दोघे तिला शुभेच्छा देऊन घरी निघतात....

घरी आल्यावर रविला उत्सुकता असते...ती नक्की हो म्हणाली असेल का? पण रामच्या चेहर्‍यावर अस काहीच दिसत नाही...तो विचारतो रामला...
“ विचारलस तिला. ??..... रवि
“ नाही रे ??.... राम
“का?.....रवि
नको रे ती आपली मैत्री तोडेल?......राम
"काय यार तुझ्याकडून एवढी गोष्ट ही होत नाही का? किती दिवस असा राहशील.....मीच जाऊन सांगतो तिला.!!!”.....रवि
"तू कुठे जाणार नाही, रात्र पण खूप झाली आहे? उगाच काहीपण बोलू नको... रवि त्याच्या बोलण्याला प्रतिकार करत त्याला झटकारून BIKEघेऊन निघून जातो....  to be continued......( पुढे वाचा.....)