Ravi padekar

कॉलेज मधलं प्रेम...!!!

      कॉलेज नुकतच सुरू झाल होत.... दोन तीन दिवस झाले होते फक्त.... रवि कॉलेजच्या गेट जवळच उभा होता. राम ची वाट पाहत... तसे दोघही जिवलग मित्र... Late होण हे नेहमीच होत रामच...  राम तसा हुशार, मनमिळावू, कुणासोबत ही झटपट मैत्री करणारा, विनोदी, आणि थोडा हटके होता...  नेहमी हसत खेळत राहणारा...दिसायला ही सुंदर

आज कुणाची तरी bike घेऊन आला होता... खाली उतरला आणि आला समोर
"कया भाई कया चल रहा है!!!”..... अस बोलत रामने हात मिळवला

"सब चल रहा है,  लेकीन दिमाग बंद है!!!” ... रवि

“ what happened ?? ”... राम

" काही नाही रे घरच टेंशन आहे...”
" हट तिच्यामरी !!! एवढच ना”... हा घे प्रसाद... रामने बॅगेतून प्रसाद काढला
“कसला रे प्रसाद !!!”... रवि
"अरे बाबा शिरडीला गेले होते !!!" त्याचा हा प्रसाद
राम रविच्या हातावर प्रसाद देणार तेवढ्यात, त्याच्या हाताला धक्का बसतो कुठल्या तरी मुलीचा... प्रसाद तर पडतो पण दोघही काही न बोलता पाहत असतात... ती तर निघून जाते
तेवढ्यात रवि उद्गारतो... "वेडी आहे का रे ही !!!"
“अरे पण नक्की आहे कोण ही!!!”...राम
"बहुतेक college मध्ये नवीनच दिसतेय!!!”... रवि

दोघही कॉलेज मध्ये जाऊन बसतात.... आजही पुन्हा बोरिंग Lecture म्हणून दोघेही कॅंटीन मध्ये जायला पुन्हा बाहेर निघतात.... पण समोरून येणारी मुलगी आपल्याच क्लास च्या दिशेने येतेय हे पाहून दोघे पुन्हा आत येतात...ही तीच मुलगी आहे... जी थोड्या वेळापूर्वी आपल्याला भेटली... राम रविला घेऊन पुन्हा आत Class मध्ये जातो... “ दिसायला सुंदर होतीच... पण तिचे टपोरे डोळे... उभा चेहरा... तिच्या गालावरची खळी... पापण्याची होणारी उघडझाप, ओठांची उमलेल्या पाकळ्यावाणी होणारी हालचाल... तिच्या डोळ्यावर येणारी तिची बट....खरच मोहवून टाकणारे होते...  कॉलेज मधले आज सर्व लेक्चर कसे संपले रामला कळाले नाही... तो तर तिच्याकडे पाहतच  बसला होता...
oye hero...रवीने आवाज दिला!!!"
"हम्म!!!" बोल.... रामने दोन्ही हात वरती करुन आळस देत म्हटले.
"कुठे हरवला आहे!!!" जायचं नाही का?? रवि

"हो चल लवकर !!!".... बाहेर येऊन रामची नजर तिलाच शोधत होती.
 पण तोपर्यंत ती निघून गेलेली होती... काही हरकत नाही... आज तीच नाव तरी कळालं...." तनवी..."       

घरी परतल्यावर रामला काहीतरी विसरल्यासारखे वाटत असते... त्याच्या मनाला वाटत असते कुणीतरी मनाला साथ देणारी भेटली आहे.... पण ही नक्की तीच आहे का??  त्याने मनोमन होण्यार्‍या आनंदाने रेडियो लावला.... राम नेहमी खूश असेल किंवा त्याचा मूड चांगला असला की तो रेडियो लावून गाणी ऐकायचा... रेडियो वर लावलेल गाण पण त्याच्या मनाला अजून साथ देत होत...

“ आंखो मे तेरी अजबसी अजबसी अदाये है
 दिल को बना दे जो पतंग सांसे ये तेरी वो हवाये है !!!"

राम ने तिला फेसबूक वर शोधल... पण ती नाही भेटली त्यावर... पुन्हा तो चेहरा पाहण्यासाठी रामला खूप उत्सुकता होती, कधी एकदा सकाळ होतेय, आणि कॉलेज ला जातोय अस झाल होत त्याला... नेहमीप्रमाणे दिवस उजाडला..... तसाच रविचा फोन खणानला....
"हॅलो!!!”
“hello बोल रे!!!"....रवि
"लवकर ये...खाली उभा आहे तुझ्या बिल्डिंग च्या !!!" ...राम
“Wait I am Just Coming.!!!”.... रवि
"ओके!!!"
 
आज पुन्हा ती कॉलेज मध्ये आली होती... recess टाइम मध्ये ती स्वत:हून समोर येत होती...

"ती आपल्याकडेच येत आहे!!!” असे रविने संगितले
“कोण?? ”  राम
"अरे ती काल धडकली ती!!!”  तिच्याकडे बोट दाखवत रवि
“अच्छा... तनवी !!!" ....राम ने म्हटलं

“Excuse me !!!

“Yes” दोघांनी एकाच वेळेला म्हटलं.

"ये तुला काही कळत की नाही... धक्के मारून जातात काही पद्धत वगैरे आहे की नाही sorry बोलाची?”

रविने फटकरून तिच्यावर शब्द फेकले... राम तर तिच्या कडे एकटक पाहतच होता....तीला काय बोलावं काहीच कळत नव्हतं... "माझ पण काय चुकून धक्का लागला नव्हता !!!" तनवी ने पण त्याला फटकारले... दोघाच्या वादात राम तर तिच्याकडे पाहतच होता... शब्द तर त्याच्या काहीच कानावर पडत नव्हते.... फक्त ओठांची होणारी हालचाल... पापण्याची होणारी उघडझाप, वारंवार काना मागे घेतलेली ती बट...या सार्‍या गोष्टीं मध्ये राम बुडाला होता... शेवटी राम ने त्यांना शांत केल...
 "ये Hello.... तू कशासाठी आली आहेस इथे??... राम ने विचारले

खर तर मी sorry बोलण्यासाठीच आली होती? पण आता ते पण नाही बोलणार जा गेलात उडत....

ते दोघे तर आवाक होऊन तिच्याकडे पाहत होते....राम ला तर तिचा हाच रांगडेपणा आवडला होता....  to be continued