m4marathi Forum

मराठी कथा मराठी गोष्टी ( Marathi Goshti / Marathi katha / Marathi stories / Marathi story ) => प्रेमाच्या गोष्टी Marathi Love Stories => Topic started by: Smitul on December 02, 2016, 11:30:58 AM

Title: पहिलं "किस"...
Post by: Smitul on December 02, 2016, 11:30:58 AM
              पुर्वीच्या काळी म्हणजेच एक ६०-७० वर्षांपूर्वी, आपल्या आजी-आजोबांच्या तरुणपणात 'चुंबन' आत्ताचा प्रचलित शब्द 'किस' ही खुप लाजिरवाणी अशी क्रिया होती. ज्याची सर्वांसमोर चर्चा करणं सुध्दा अति कठीण काम होत. एवढंच काय? तर लग्न झालेल नवविवाहित दांपत्य सुध्दा एकमेकांचं पाहिलं चुंबन लग्नानंतर १-२ महिन्याने घेत असतं... शिवाय चित्रपटांमध्ये असा एखादा सीन दाखवायचा झालाचं तर दोन फुलं एकमेकांत गुंतलेली दाखवतं किंव्हा दोन भुंगे एकमेकांभोवती फिरताना दाखवतं. यापैकी काही नाहीच तर मग एखादी नैसर्गिक सौंदर्याने बहरलेले सिनरी दाखवत असतं.
                 मात्र याउलट आत्ता! 'किस' तर सोडाच पण प्रणयाचे सीन सुध्दा सरार्स दाखवले जातात चित्रपटात...  एकमेकांना किस करणं ही एक खुप नॉर्मल गोष्ट होऊन बसलीये, मुलं-मुली एकमेकांचे मित्र-मैत्रीण झाले कि लगेच किस करायची घाई करतात. only friends म्हणुन घेणारे सुध्दा आजकाल किस करु लागलेत. आणि हे किस काही साधंसुध कपाळावर किंव्हा हातांवर चुंबन घेण्यासारखं नसतं हा!!! हे अगदी एकमेकांचे श्वासोश्वास मिसळे जावेत असे आणि पाहणाऱ्यांना घाम सुटावा असे, अर्ध्या किंव्हा एका तासापर्यंत चालणारे असे सुध्दा किस असतात. कारण आजच्या संस्कृतीत girl friend आणि boy friend मध्ये असे किस करण्याचा एक standard असतो तो पाळला नाही तर इमेज ला प्रॉब्लेम होतो ना! म्हणुन बाकी काही नाही.

             आता तुम्हांला वाटलं असेल कि, मी या चुंबन घेण्याच्या क्रियेविषयी सहमत नाही म्हणुन असं सर्व लिहीत आहे. पण तसं नाहीये... चुंबन घ्यावं माणसाने कारण ते प्रेम व्यक्त करण्याचं माणसाचं एक माध्यम आहे. आई सुध्दा पहिल्यांदा आपल्या बाळाचा पापा घेऊन त्याच्या विषयीच प्रेम व्यक्त करते. बाबा आपण वर्गात पहिले आलो कि, कपाळावर अभिमानाने चुंबन घेतात. गावाकडे गेल्यावर तर, आपला गाल हा सर्व आजी-आजोबांसाठी किस करण्याचं ठिकाणं होऊन जातो. तर कधी-कोणी पाहत नाहीये ना! हे बघून हलकेच प्रियकर प्रेयसीच्या गालावर त्याचे ओठ टेकवतो. मी देखील आज एका अश्याच सुंदर पहिल्या किस बद्दलचा एक किस्सा तुम्हांला सांगत आहे...

                     तो तिला प्रपोज केल्या नंतर पहिल्यांदाच बाहेर फिरायला घेऊन जातो. तिथे गेल्यानंतर तो गाडी पार्क करुन तिच्या जवळ येऊन उभा राहतो. त्यांना आता रोड क्रॉस  करायचा असतो. ती हलकेच नजर वर करुन त्याच्याकडे पाहते. त्याला काय समजायचे ते तो समजुन तिचा हात-हातात घेतो आणि दोघेही पलीकडे जातात. तिच्या काहीही न सांगता त्याने समजुन घेण्यावर तिला फार बरं वाटतं. पाहिलं-वाहिलं प्रेम असंच नाजुक आणि कोमल असतं त्याच्या हळूहळू उलगडण्यातच खरी मजा असते. आता ते खुप फिरुन झाल्यावर बसण्यासाठी एक जागा निवडतात. तो तिला बसायला सांगुन स्वतः तिच्या जवळ जाऊन बसतो. तशी ती त्याच्याकडे पाहुन मंद हसते. तिच्या याचं लाघवी हसण्यावर तो फिदा असतो. तिचं तसं हसणं पाहिलं कि, त्याला क्षणात तिला जवळ ओढून घ्यावं आणि 'किस' करावं असं वाटतं असतं. पण तो मुळातच चांगला आणि सालस मुलगा! मग तो असं वागून कसं चालेल! शेवटी त्याने न राहावून, हळुच आणि सौम्य शब्दात तिला विचारलं. "मी तुला 'किस' केलं तर चालेल तुला?" पण, ती घाबरुन "नाही" म्हणाली. झालं!!! आता मात्र त्याला वाटलं कि, आपण तिला असं विचारुन चूक तर नाही केली ना??? पण दुसऱ्या क्षणीचं तिनं धीर करुन त्याचा हात-हातात घेतला, आणि "हो चालेल" असं हळुच म्हणाली. तिचं धाडस पाहुन नकळत तो सुध्दा तिच्या जवळ ओढला गेला. त्याने अलगद तिला आपल्या बाहु-पाशात घेतले. हलकेच तिच्या चेहेऱ्यावर आलेले तिचे मऊ रेशमी केस बाजूला सारले. तिच्या डोळ्यांत आपली प्रतिमा पाहुन, तिची हनुवटी वर केली. तिच्या ओठांवर आपले ओठ टेकवले तसे तिचे आणि त्याचे हृदयाचे ठोके वाढले. त्या दोघांनाही एकमेकांच्या हृदयाची धडधड ऐकू येत होती. शिवाय तिचा प्रत्येक श्वास त्याच्या श्वासात मिसळत होता. तिच्या उरांचा स्पर्श त्याच्या छातीला होत होता. त्यामुळे त्यांचे चुंबन अधिकच दीर्घ होत होते. त्याला तिला सोडावे असे वाटतं नव्हते तरी देखील ती स्वतःला त्याच्या बाहु-पाशातुन सोडविण्याचा एक लडिवाळ प्रयत्न करत होती. अखेर तिने स्वतःला त्याच्यापासून दूर केले. त्याला जाणवले कि, तो ओघात वाहून गेला आणि काही तरी चूक करुन बसला. तशी त्याने लागलीच तिची माफी मागितली. ती त्याच्याकडे पाहुन 'आपण काहीचं चूक नाही केली' असं म्हणाली. 'उलट तसं काही घडू नये म्हणूनच मीच स्वतःला तुझ्या पासून दूर केलं' अशी लाजुन कबुली दिली तिने. त्याने तिचे हे निरागस बोल ऐकताच पुन्हा एकदा तिला आपल्या कवेत घेतले. आणि दोघेही पुन्हा आकंठ प्रेमात बुडाले...
Title: Re: पहिलं "किस"...
Post by: swaralibhoir58 on December 14, 2016, 06:49:18 AM
premachi bhavna khup sunder shabdat lihili ahes..........!!!!!!!!! khup sunder.....
Title: Re: पहिलं "किस"...
Post by: 9145345627 on January 27, 2017, 04:59:07 PM
myself bhavesh,it is a real romantik story which give value for true love.it give romantik description about true love emotion which differ from attraction.
Title: Re: पहिलं "किस"...
Post by: Luv Bhalerao on March 27, 2017, 12:59:53 PM
nice
Title: Re: पहिलं "किस"...
Post by: Smitul on May 16, 2017, 04:47:20 PM
Thanks to all....