mjare

"एका मुलाने ब्रेकअपच्या वेळी केलेलं वेक्तत्व..M.Jare@[ एक हृदयस्पर्शी प्रेम कथा ]
.
तो :- (msg typing..)Hello!
.
ती :- seen..(No Reply)
.
तो :- रिप्लाय करणार आहेस कि नाही..??
.
ती :- seen..(No reply)
.
तो :- माझा फोन Receive कर..
मला तुझ्याशी बोलायचंय...
.
ती :- seen..(No Reply)
.
तो: (फोनवर).. Hello..!
.
ती: (फोन कट करते)..
.
तो: (msg typing..)
Hello! माझा फोन Receive कर ना..
मला तुझ्याशी बोलायचंय.. (send...)
.
ती :- seen..(No Reply..)
.
.
तो: (काही वेळानंतर परत काॅल करतो)
.
ती: (वैतागुन) का फोन करतोयस..??
.
तो: तुला एवढं रागवायला काय झालयं.??
साधा फोन करतोय तर एवढे react
होतेयस..
जसे कि आता मी कोणाचा कोण
राहिलोच नाही..हो ना
असच वाटतय ना तुला..??
.
ती: (रागाने..) ते जाऊ दे तू फोन का केलास ते सांग..??
.
तो :- विशेष नाही पण मला तुला फक्त एकदाच शेवटचं
भेटायचय..बस्स
जमले तर बघ...
मी वाट पाहतोय.
.
ती :- (विचार करून) ठिक आहे..
.
तो :- okey.. (फोन कट..)
.
(तो नेहमीच्या ठिकणी येतो..
चेहर्यावर ना हसु ना कुठला आनंद..रडून चेहरा
लालेलाल झालेला होता..
पण एक वेडी आशा मनाशी बांधून ती येण्याची
वाट पाहत होता..तेवढ्यात ती येताना दिसते..
आणी त्याच्या ह्रदयाची धडधड वाढते..
तशी ती त्याच्या शेजारी येऊन बसते.)
.
पण.. सुरूवात कोण करणार याचे दोघांच्या
मनात प्रश्न उभे होते शेवटी तो न राहुन
शांतपणे म्हणाला)
.
तो :- "काय म्हणत होतीस काल की, मला विसरून
जा..
असं कसं तु बोलू शकतेस..
डायरेक्ट The End..!
तेही विचार न करता.."
.
कदाचित उद्या मी समोर नको म्हणून डोळे मिटून
घेशील,
पण..
चोरून पाहणाऱ्या तुझ्या हृदयाला काय
उत्तर देशील…??
.
ती :- hmm...
.
ती :- तुला जायचंय तर जा तसेही तुला अडवणारा मी
कोण..??
पण जाता जाता कारण तरी सांग...
म्हणजे मला नंतर त्रास होणार नाही तु
सोडुन गेल्याचा...
.
ती :- मी एकदा सांगितलयं ना..??
.
तो :- काय..??
मला तुझ्यासोबत Relation ठेवायच नाही...हे असे..??
.
ती :- "मग अजुन काय सांगायला पाहिजे तुला..??..!"
.
तो :- 1 नंबरचं खोट बोलतेस..
या मागचे वेगळेच कारण असणार..
पण..
तुला सांगु वाटत नाही..
नको सांगू राहू दे...
.
पण माझी एक अट आहे..
.
ती :- काय..??
.
तो :- "तुझ्यासाठी गेल्या valentine ला 1300 रू
खर्च झालेत.. मला परत हवेत.
आणी हो, गेल्या चार वर्षापुर्वीचा calculate
करायचा आहे अजुन...
.
ती :- hmm., (गप्पच..)
.
तो :- काय झालं..?? आता बोल ना..??
.
ती :- हे ऐकुन घेण्यासाठी बोलाऊन घेतलेस का मला
इथे..??
.
तो :- मला त्रास होतोय हे तुला माहितेय का..??
नाही ना..
म्हणूनच बोलवलय...समजलं का..??
.
ती :- मी सांगितला होता का खर्च करायला..??
.
तो :- हो का..मग ते गिफ्ट,चाॅकलेट्स..मी खाल्ले का
..?
का आभाळाने गिळले..??
.
ती :- "हे बघ...उगीच काहितरी बोलु नको..!"
.
तो :- बोलु नको म्हणजे..??
मग हा खेळ कुणी मांडलाय..?
मी मांडलाय का एकट्याने..??
.
ती :- (खाली मान घालुन गप्प..)
.
तो :- ऐ माझ्याकडे बघं..
कोणी मांडलाय हा खेळ..??
.
ती :- (आता मात्र ती तोंडाला हात लावुन
रडु लागली ..)
.
तो :- "आता का रडतेस... मुळू-मुळू बोल ना
काहितरी..."
.
ती :- "माझ्याशी बोलू नको..जा..!"
.
तो :- "जा काय जा...टाईमपास करताना मज्जा आली
असेल ना...
.
जाळ्यात चांगलाच "बकरा" सापडलाय
मग काय
नुस्ती हवा करायची त्याच्या जीवावर..
आणी काम झाल की,
कल्टी मारायची..? असचं ना...
.
या जगात काय मीच एकटा सापडलो का तुला
खेळणं म्हणून खेळायला..??
.
ती :- (ती मात्र मान खाली घालुन रडत होती..)
.
तो :- (तो मात्र एखादी नशा केल्यासारखा डोक धरुन
बसला होता..पुढचे काहिच सुचत नसल्यासारखा..)
.
(नंतर...थोडा वेळ दोघेही शांत..ना कुठला आवाज ना
संवाद..)
.
काहि वेळाने....
तो :- (स्वःता:ला सावरत...)
बोल ना काहितरी गप्प का आहेस..?? तो
व्याकुळतेने म्हणाला,
.
काय होती माझी चुक.?
असे अचानक सोडून जातेस..
एवढा वाईट आहे का मी..?
.
तुला माहितेय..??
.
ज्या दिवशी तु फोनवर म्हणालीस की, मला हे
Relation नकोय..
त्या दिवशी अख्खा दिवस वेड्यासारखा तुला
शोधत होतो...पण काहीच उपयोग झाला नाही...
खर तर..
"तुम्हा मुलींना ना खर्या प्रेमाची किंमत
कळत नाय..
प्रेम करणारा कधीच वाईट नसतो गं...
पण
तुम्ही मात्र त्याचा पार बाजार करून टाकता...!"
.
ती :- तुला मी माझ्या मागे लाग म्हटलं होतं का..?
.
तो :- तिथच झक मारलीय ना मी नादी लागुन...
.
ती :- ( ती मात्र शांतपणे ऐकुन घेत होती..)
.
तो :- तुझ्या नादी लागुन मला खुप पश्चाताप
झाल्यासारखं वाटू लागलय ..
पण...
एकदा सवय झालेली लवकर मोडत नाही ना...
म्हणून हे relation तुटू नये असे मला
मनापासुन वाटतं होते...
पण तु...?
.
तु मात्र एका क्षणाचाही विचार न करता...
चांगल्या नात्याची पार वाट लावली...सोबत माझी
पण
.
ती :- तुला तुझा मार्ग मोकळा आहे..
मी कुठं आडवतेय तुला..?
.
तो :- पण... तुझ्यात अडकलेल्या
जीवाचं काय..?
बाजारातील भाजीपाला आहे का मी..?
खराब झालं की, फेकून द्यायला..??
.
ती :- जमलं तर मला माफ कर पण इथुन पुढे
मी तुला कधीच भेटणार नाही...
अन् तु पण
मला पुन्हा भेटू नको..
मी तुझ्याकडे येणार नाही..
.
तो :- (तिचं हे बोलणं ऐकुण त्याच्या डोळ्यात
अश्रु उभे राहतात...
पण
अजुबाजूला असलेली माणसं बघुन तो डोळे पुसतो..)
.
तो:- (शांतपणे) "ऐक ना थोडं माझं.."
.
ती :- (ती थांबतं..) काय..?
मल उशीर होतोय...
.
ती :- मला उशीर होत नाही का...?

"मी फक्त माझ्या प्रेमासाठी ईथ पर्यंत आलोय,
अन् तु मलाच एकटं सोडून जातेस..
माझ्याकडे तरी बघ एकदा..!"
.
(तिने हलकेच मान उचलून
त्याच्या डोळ्याकडे पाहिलं
त्याचा डोळ्यांच्या दोन्ही कडेला पाणी तरळत
होते.)
.
.
ती:- मी समजु शकतेय तुला कसं वाटतेय ते...
.
खर तर..
तुझी काळजी मला पण आहे..
पण मी तरी काय करणार..??
.
तुला खरं सांगायचं तर हा त्रास माझ्यासाठी
खुप असह्य आहे..
.
"मी हतबल झालेय रे आपल्या प्रेमापुढे...!"
आणी.. तिथच तिला रडू कोसळले..
तिला काय बोलावं ते सुचत न्हवते...
.
नंतर...
(ती स्वःता ला सावरत..)
"तू मघाशी एवढ बोलास त्या बद्दल मला अजिबात
राग नाही...,
.
पण..
.
तुला जेवढ्या वेदना होतात तेवढ्याच
मला पण होतात...
कारण इथुन पुढे मला सुद्धा तुझ्याशिवाय
रहायच आहे...
.
खुप त्रास होतो ना जवळचे दूर जाताना..
पण...
मी हे सगळू निमुटपणे सहन करतेय...
फक्त तुझ्यासाठी...
मला माहित नाही का ते पण,
सध्या तरी हेच बरोबर वाटतेय...
.
मला माहितेय,
तु समजुन घेशील,
पण मी गेल्यावर जास्त त्रास करून घेऊ नको...
एवढचं सांगायला मी आलेय...
.
कारण...
.
प्रत्येक वेळी मी तुला सावरायला येणार नाही..
जमले तर एकटं राहायला शिक...माझ्याशिवाय
.
Byee..
.
(अन् ती तिथून डोळे पुसत निघुन जाते ..)
.
तो :- हा मात्र भरलेल्या डोळ्यांनी तिच्या
धावणार्या अंधुक पाठमोर्या आकृतीकडे बघत,
तिथच खाली बसतो..
अन् दोन्ही गुडघ्यांच्या मध्ये...
डोकं घालुन रडत राहतो...
कारण...
त्याला माहित होतं कि ती परत येणार नाही
आपल्यासाठी...
तो नाईलाजाने स्वतःला सावरण्याचा निरोपयोगी,
प्रयत्न करायला जातो..
पण मनातील आलेल्या वेदना स्वस्थ बसू देत
न्हवत्या...
(त्याच मन :~~)
.
आजवर काहिच मागीतले नाही देवा,
पण...
कधी कधी अस वाटत की सगळे असुन पण नसल्यागत
आहेत...
ज्याच्यावर विश्वास असतो तिच माणसं एकटं सोडून
जातात....
.
अशी नाती तूच देतोस ना..?
पण..
.
तुला तर माहितच आहे..
.
"प्रेमात खुप भांडन होतात..
पण ते
नात तुटताना त्यालाच खुप त्रास
होतो..
ज्याला त्या नात्याची गरज
असते.....
.
पण
.
काही गैरसमज इतके मनाला बोचतात..
की आपल्या नकळत सुंदर नाते हृदयासोबत तोडून
जातात.. न सांगता..
.
समजत नाही रे..,
"प्रेम म्हणजे जीवन की,जीवन म्हणजे प्रेम"...
.
ती आपलीच असतात जी मनं दुखावुन जातात...
नाहीतर,
परक्यांना काय माहित कि आपल्या
अडचणी काय आहेत...
.
म्हणून...
.
हात जोडून मागतोय देवा,
खरचं
एक दगडाचं मन दे..
.
आणी
.
ती जिथं असेल तिथं सुखी असुदे...
.
बस्स... एवढीच एक प्रार्थना..!
 !!

_▄▄™
(●_●)
╚═► => एक प्रियकर...M.Jare....♥

              【9604672074】
♥ ❇ ♥ ❇ ♥❇ ♥ ❇ ♥ ❇ ♥ ❇ ♥❇ ♥ ❇

mahadhu143

Very Nice yar..Ka krt aastil aashya muli..ka shevti sodun jatat...

ka aata prem nhi re rahile..koni pn Timepass krte yar..

Vuchar pn nhi krt re..kashe hoeil mhnun direct sodun jatat..

"जड अंतकरणाने जाऊ नकोस, पिंजर्यातून उडालेल्या
पक्षा प्रमाणे मुक्त विचार कर, समज कि मी एक
फांदी होते, तू काही वेळ रमलास पण मुक्कामाचे मी
ठिकाण नाही, उठ आणि पुढच्या प्रवासाची
तयारी कर. बेस्ट लक डीअर, मी ठीक आहे तू पण
वाईट नको वाटून घेउस, जेंव्हा तुला हव्या असलेल्या
मुक्कामाला पोचशील तेंव्हा मला कळव."