mjare

"ओळख प्रेमाची....M.Jare♥【एक हृदयस्पर्शी प्रेमकथा..】
 
"तो खुपच टेंशन मध्ये होता..
कारण..
काल त्याची लेखी परिक्षा झालेली अन् दुसर्या
दिवशी इंटरविव्ह होता...
आज काहिही झाले तरी चालेल पण,
आज तिला काय ते फाइनल विचारायचं होतं..
म्हणुन तो गोंधळुन गेला होता...
.
दुसर्या दिवशी तो इंरविव्हसाठी गेला..
ती सुद्धा आली होती तिच्या मैत्रीणींन सोबत.
तिने त्याला पाहताच दुरूनच बेस्ट ऑफ लक केले.. त्याने
तिला पाहुन फक्त स्मित
हास्य केले..
.
निकालाची लिस्ट बाहेर आली त्यामध्ये तो
टाॅप वर होता.. त्याचं नाव ऐकताच त्याच्या
मित्रांनी एकच जल्लोश केला.
नुसता गोंधळ आणी दंगा सुरू केलेला..
.
पण...
त्याचं कशातच लक्ष न्हवते..
कारण...
आज काय ते तिला शेवटचं विचारायचं होतं.
.
मागील वर्षी तिला कळले होते मी त्याला आवडते
म्हणे..
तिने मैत्रिणीला विचारले..
"मी काय थील्लर वागतेय का ग..!"
मी कधी त्याला बोलेली नाही मग हा कसा
म्हणतोय मी आवडतेय म्हणुन...
आता मैत्रिण काय बोलणार..
.
तिचे आयुष्य एकदम साधं सरळ होतं..चांगले
मार्क्स,चांगलं काॅलेज आणी आता थोड्या दिवसांनी
तिला जाॅब मिळणार होता..
पण तो पर्यंत प्रेम वगैरे असल्या वादात तिला
पडायचे न्हवते..
.
बाकिच्या मुलींचे मित्र बोलत असले तरी हि कधी
स्वता:हुन कधी बोलत न्हवती.. पण नकळत ती पण त्या
चोरुन पाहत होती...
.
जनक...अस त्याचं नाव.. अन् तिचं मानसी..!
.
क्लास मध्ये तिला त्याचे अस्तित्व जाणवू
लागले..समोरा समोर कमीच बोलणं व्हायचं...
तो आवडू लागला तरी तिने त्याची कबुली कोणा
समोर केली न्हवती...आणी आजही ती त्याकडे चोरून
पाहत होती...
.
त्याने कंपणीच फाॅर्म वगैरे सगळी कामे आटोपली
होती..
बरीच रात्र होत आली होती..
ती आपल्या रूमकडे निघाली होती तेवढ्यात त्याने
तिला हाक मारली..
त्याची हाक ऐकुन ती थांबली.
त्याच्या आवाजातला बदल तिला कळत होता
"मला तुला बोलायचंय...थांब ना..!"अस
बोलल्यावर ती तरी नाही कसे म्हणनार..?
तिच्या मैत्रीणीला "तू मेसवर जा मी येतेच" असं सांगून
ती थांबली
आता ती थांबल्यावर त्याला काय बोलावं ते
सुचेना..
.
"आपण इथेच एखाद्या हाॅटेल मध्ये बसुया म्हणजे जेवण पण
अन् बोलणं पण
होईल..!"
खरं तर ती आजपर्यत कुठल्याच हाॅटेल मध्ये किंवा
मुलांन मध्ये जेवन केले न्हवते त्यामुळे तिला थोड
अवघडल्या सारखं वाटू लागले..
शेवटी तो तिच्या सोबत चालत राहू लागला...त्याचा
एकदम फाॅरमल ड्रेस होता.
.
तिने मनात विचार केला"स्मार्ट तरी
दिसतोय,नाही"
तो हातात फाईल घेऊन चालत होता.
.
ती:-Cogratulation...!!! कसे वाटतेय आता..ती
म्हणाली
.
तो:-मस्त..एकदम हलकं वाटतय
तुला कसं वाटतयं..? त्याने नजर तिच्यावर रोखत
विचारले...
.
(..आपल्यावर रोखलेली त्याची नजर पाहुन तिला कुठे
पाहू अन् कुठे नको असे झालेले काहिच सुचत न्हवते
तिला...तिला कळेना हा असा का विचारतोय ते....)
.
ती:-म्हणजे..??
.
तो:-म्हणजे मला नोकरी मिळाली त्या बद्दल तुला कसं
वाटतयं..??
.
ती:-छान आहे की, i am happy 4 u
.
तो:- ते जाऊ दे गं...पण आपलं काय...???
.
ती:-(आपलं..??)
आता ती खुप घाबरलेली तिला आज कळुन चुकलं होत
कि,आजचा तो दिवस आहे ते.)
.
तो:- "म्हणजे तुला हे सांगायला नको कि,
तु मला आवडतेस ते...!"
त्याचं हे बोलणं ऐकुन तिने पटकन अजुबाजूला
बघितले...नशीब कोणी न्हवते.
"इतकी का घाबरतेस लोकांना चल बस.." ती
नाइलाजाने बसली.
.
तो:- इतक्या दिवस वाट बघत होतो ती या
नोकरीची...अन् तुला हे न सांगता कसे दिवसं काढलेत ते
माझे मलाच माहित...
माझ्याशी लग्न करशील का..??
त्याने जणू बाॅम्बच टाकला होता.
.
एखाद्याच्या तोंडून अशी वाक्ये गेली की कान गरम
होतात..हात थरथर कापतात अशी त्याची
आवस्था...ती तर रडकुंडीलाच आली होती.
.
तो:- (स्वता:ला सावरत हसत म्हणाला)
"घाबरतेस काय गं एवढी
आपण काय पळून चालोय का लगेच..
आणी
मला माहितेय मी तुला आवडतोय ते...
माझा निर्णय ठाम आहे. तुला काय वाटतेय ते दोन
दिवस विचार करून सांग..
मी उद्या घरी जातोय.घरचे खुश आहेत
नोकरीचं ऐकून..
सोमवारी परत येतोय मग बोलू, चालेल..?? त्याने एका
दमात सांगितले.
.
तिने फक्त मान हालवली..
त्याने तिचा हात हातात घेण्याचा प्रयत्न केला
पण तिने त्याला प्रतिकार केला नाही..
खर तर तिला वेळ हवाच होता विचार करायला..
मग पुढे एक शब्द न बोलता त्याने तिला हाॅस्टेलवर
सोडले आणी धावतचं आपल्या रूमकडे सुटला..
.
"आईशप्पत, आपण प्रपोज केलं की तिला!!!",
मनातल्या मनात किंचाळून घेतलं त्याने.
आजचा दिवसच भारी होता एकदम..!"
.
ती, मेस काय, कुठेही जाण्याच्या मनस्थितीत
नव्हती.
कितीतरी वेळा तिने वर्गात प्रवेश करताना
त्याला शोधलं होतं.
कॅन्टीन मध्ये मुलींच्या भागात बसून कान मुलांच्या
सेक्शनला लावून त्याचं हसू
ऐकलं होतं.
मोठ्या सुट्टीवरून परत आल्यावर त्याला
हळूच न्याहाळलं होतं.
कधी घरी असताना अभ्यास करत त्याच्याबद्दल
विचार करायला मनाला थोड मोकळं सोडलं होतं.
पण तरी आज हे असं सर्व झाल्यावर
काय करावं ते सुचत
नव्हतं. .
.
दोन दिवस !!! विचार विचार तरी किती करणार
माणूस.
शेवटी डोकं दमतच ते. कधीतरी तिची
झोप लागून गेली.
पुढचे दोन दिवस तो आपल्या गावात नाहीये
या विचारानेच तिला एकट वाटत होतं...
.
पुढे काय होईल माहीत नाही पण दोन दिवसांत
तिचा निर्णय पक्का झाला होता..
.
सोमवार सकाळ उजाडली तशी ती हरखली.. एकदम छान,
आवरून कॉलेजला गेली..
.
वर्गात आली ते हसतच..
पण तो दिसला नाही...
अक्खा एक तास त्याची वाट बघत
घालवला तिने...
वाटलं अजून आला नसेल गावाहून...
पुढचे दोन तासही तसेच गेले...
जेवायची वेळ झाल्यावर मैत्रिणीला आणि
मेसला दांडी मारून तिने कॅन्टीनला जायचं ठरवलं...
तिथे त्याचा आवाज, त्याचं हसू कुठे ऐकू
येतंय का हे ऐकत बसून राहिली...
पण,
किती वेळ करणार ते तरी...?
अर्ध्या तासाने तिला उठावं लागलं.
एकटी मुलगी किती वेळ बसणार..??
.
दिवस संपल्यावर तिने कॉलेजला फेरी मारण्याच्या,
कारणाने ग्राउंडलाही चक्कर मारली..
कुठे तो क्रिकेटच्या मैदानात तर दिसत
नाहीये ना,
अशी खात्री करून घेतली....
काय करावं तिला,
सुचत नव्हतं...
कुणासाठी इतकं बेचैन होण्याची तिची
पहिलीच वेळ होती...
रात्री मेसवरून येताना तिने त्याच्या मित्राला
पाहिलं एकट्यालाच...
तिने मनात विचार केला....
पण सोडून देणं,जमणार नव्हतं...
हिम्मत करून तिने,'त्याच्या मित्राला हाक मारली...
त्याने मागे वळून पाहिलं.
.
ती :- "तो आला का रे घरून?" तिने विचारलंच...
.
मित्र:- "काय माहीत नाही....सकाळपासून पाहिला
नाही त्याला...काही काम होतं का..?",मित्र
बोलला...
.
ती :- "नाही नाही,असंच " ती म्हणाली.
पुढे बोलू नये असं वाटत होतं,
पण मन मानत नव्हतं...
तिने त्याला विचारलंच,"त्याचा नंबर आहे का रे
तुझ्याकडे?".
.
मित्र:-"हो आहे ना" म्हणत त्याने नंबर दिला... तो,
घेऊन ती झर्रकन मैत्रिणी सोबत निघून गेली..
.
आपण म्हणजे त्या मुलाला शोधायला काहीही
करतोय याची तिला एकदम लाजच वाटली... एका,
दिवसाने काय फरक पडणारेय..?
असे,
मनाला समजावून काही उपयोग होत नव्हता...
रूमवर आली तरी चैन पडेना...
तिने त्याला "मेसेज" केला फोनवर,"हाय"
इतकाच...
अर्धा तास काहीच उत्तर नव्हतं...
म्हणून,
मग फोनच लावला...
.
दोन वेळा फोन लावून उचलला नाही म्हटल्यावर तिने
नाद सोडून दिला...
पण,
रात्री फोनवर गाणी ऐकताना मात्र त्याच्या
आठवणीने,
तिच्या डोळयात पाणी आलं..
.
दुसऱ्या दिवशी तिने पुन्हा नव्या उमेदीने
आवरायला सुरुवात केली....
पुन्हा पहिले दोन,
तास तसेच निराशेत गेले...
आता तिचा संयम संपला होता...
दोन दिवस कॉलेज कसा बुडवू शकतो हा.?
आणि अशा निष्काळजी मुलाच्या प्रेमात आपण इतके वेडे,
का झालोय...?
दुपारच्या जेवणाच्या वेळी तिने त्याच्या
मित्राला गाठले...
.
ती :- "अरे त्याच्याकडे काम होतं जरा...
फोन उचलत नाहीये तो....
त्याच्या घरचा नंबर आहे
का.?"
त्याने थोड्या अविश्वासाने तिला त्याचा घरचा
नंबर दिला....
.
घरी फोन करू की नको असा निदान हजार
वेळा तरी विचार तिने केला असेल...
शेवटी तिने घरी फोन लावलाच...
फोन त्याच्या,
आईने घेतला होता...
"जनक आहे का...?"
'तिने जमेल तितक्या,सौम्य आवाजात विचारले....
.
"कोण बोलतंय...?
तो तर गेला सांगलीला,
परवाच."
असं उत्तर ऐकल्यावर तिचा धीर खचलाच...
कुठे गेला असेल, का बोलत नसेल कितीतरी
विचार येऊन गेले...
.
"हां मी मानसी बोलतेय....
काम होतं प्रोजेक्टचं...
मोबाईल लागला नाही म्हणून घरी केला. "
.
"हां अगं तो त्याच्या चुलतभावाकडे असेल
तिथेच गव्हर्न्मेण्ट कॉलनीत राहतो. ",
त्याची आई बोलली...
.
आता तिथे कसं शोधणार त्याला...?
तिने 'ओके ओके' म्हणून
फोन ठेवून दिला...
संधाकाळ झाली तशी तिची त्याला भेटायची
इच्छा अनावर झाली....
पुन्हा ती त्याच्या
मित्राच्या मेसकडे गेली...
तिथे नशिबाने तिला तो
दिसला...
पण मुलांच्या मेस मध्ये मुलीने जायचं
म्हणजे अनेक टाळकी उभी असायची तिथे. .
त्या घोळक्यातून त्याच्या मित्राला हाक मारून
तिने त्याला विचारले,
"अरे मला महत्वाचं काम होतं जनक कडे
पण तो भेटतच नाहीये....
फोन पण लागत नाहीये....
त्याची आई म्हणाली कि चुलतभावाकडे गेला
असेल. ..
तुला माहित आहे,का त्याचा पत्ता?"
तिने कसंतरी त्याला विचारलं...
.
मित्र:-"हो हो माहितेय ना. " आणि त्याने
तिला पत्ता सांगितला.
"मी येऊ का..??'
असंही त्याने विचारलं....
.
ती :- "अरे नाही नाही जाईनच असं नाही... आणि
वाटलं तर एकटी जाऊन येईन. ..
" ती बोलली...
.
"बिचारा चांगला आहे" मनात तिने विचार केला....
पण आता खरेच त्याच्या चुलतभावाकडे
जायचे की नाही हा प्रश्न होताच...
रात्रीचे नऊ वाजत आले होते...
.
पण काय करणार,'दिल है की मानता
नही!'.
.
तिने गाडी त्या रस्त्याला लावली होती...
शोधत,
शोधत ती त्या दिलेल्या पत्त्यावर आली...
दाराच्या पाटीवरचे आडनाव बरोबर होते...
पाच मिनिट ती दारासमोर विचार करत उभी
राहिली....
शेवटी जनकचा चेहरा आठवून तिने
दार ठोकले...
.
एका तिशीच्या माणसाने दार उघडले....
 त्याचा
भाऊ वाटत होता....
तिने,"जनक आहे का....?"
विचारले....
"जनक...?
तो नाही आला इकडे....
पर्वा फोन आला होता नोकरी लागली म्हणून
पण भेट नाही झाली....
काही काम होतं का...?", त्या भावाने विचारले....
.
"हा जरा प्रोजेक्टचे काम होते....
काकू म्हणाल्या इथे असेल म्हणून
आले.", ती बोलली.....
नाही आलाय....
 पण,
आला तर काय सांगू?",
भाऊ....
"मानसी विचारत होती म्हणून सांगा.",
"ओके", तो उत्तरला....
.
तिने गाडी काढली....
काल पासून आपण याच्या नादात काय काय
करत आहोत आणि कुठल्या कुठल्या लोकांशी
बोलत आहोत....
त्यांच्याशी बोलायची तिने,
कित्येक महिनेही हिम्मत केली नसती....
तो भेटला नाही म्हणून, त्याची आठवण येतेय म्हणून की,
आपण असे वेड्यासारखे,
फिरतोय म्हणून, हे माहित नाही,
पण तिला आता रडू फुटलं होतं....
गाडी चालवत जोरजोरात रडत ती रूमवर निघाली...
.
किती मूर्खपणा करतेय मी....?
यालाच प्रेम,
म्हणायचं का....?
असे अनेक विचार येत होते,
तिच्या मनात....
गाडी लावून ती जिना चढू लागली.....
आणि
दाराच्या पहिल्या पायरीवरच तिला "तो" दिसला...
.
जनकच होता तो...!
.
गेले दोन दिवस ज्याच्या एक क्षण नजरेसाठी आपण इतके,
वणवण फिरलो तो,
असा दिसल्यावर तिला थांबलेलं रडू पुन्हा फुटलं....
त्याने तिला हातानेच शेजारी बसायची खूण
केली....
त्याच्या शेजारी बसल्यावर, तिचा श्वास वाढल...
डोळे पुसून ती जरा शांत झाली....
तेव्हा कुठे,
त्याने बोलायला सुरुवात केली...
.
तो:-"रडतेस काय वेडाबाई...?
मी कुठे जातोय....?",
.
ती:-"पण होतास कुठे...?
मी तुला किती शोधलं.. ?"
.
तो:-"हो मला माहितेय....कॅन्टीन, ग्राऊण्ड,
मेस, फोन, घरी फोन सगळं माहितेय मला. ",
.
ती:-"मग...?????
भेटला का नाहीस मला...?"
तिला आता खूप संताप झाला होता..
कुणी किती,
वाईट वागावं याला काही लिमिट....?
.
तो:-"हे बघ चिडू नकोस.....त्यादिवशी
नोकरीच्या आनंदात होतो मी...
एकदम बोलून गेलो सगळं....
म्हणजे ते
सर्व खरंच होतं....
पण तुला किती टेन्शन,
आलं असेल याचा विचारच केला नाही मी.... आणि त्यात तू अशी
लाजाळू...
मला वाटलं आपण उगाच घाई तर करत
नाहीये ना.. .?
घरी जाऊन खूप विचार केला मी....
वाटलं, ही,
तर फक्त सुरुवात आहे....
पुढे अजून कितीतरी मोठ्या गोष्टी असतील..
पण...
त्या सगळ्यात तू माझ्या सोबत राहशील का...?
की अशीच गप्प राहशील...?
पुढे जाऊन,
अर्धवट सोडायचं नव्हतं गं मला हे....
म्हणूनच मग मी दोन दिवस अजून तुला
वेळ दिला थोडा...
.
मित्राने सांगितलं मला तू कुठे कुठे शोधत
होतीस मला...
मीच त्याला गप्प बसवलं होतं....
शेवटी काकांकडे गेलीस तेव्हा कळलं की ही
वेडी काय करेल काही सांगता येत नाही...
म्हणून इथे आलो आणि बसून राहिलो,
तुझी वाट बघत....
.
तुझ्यासारखे मलाही जड गेले ते दोन दिवस
पण त्यात जे कमावलंय ना त्याच्यासमोर हे
दोन दिवस काहीच नाहीत....
.
परवा हॉटेल मध्ये माझ्यासोबत यायलाही
लाजणारी तू,
माझ्या घरी, काकांकडे, मेसवर कुठे कुठे
फिरलीस...
अशीच धडपडशील का आपल्या दोघांसाठी..?
सर्व लोकांची पर्वा न करता,त्याने तिच्या
डोळ्यात बघत प्रेमानं विचारलं....
.
पण...
.
तिला बोलायला त्राण होतेच कुठे...?
त्याच्या हातात हात देऊन त्याच्या खांद्यावर ती
विसावली होती...
आणी तिचं सर्व सुख तिच्या शेजारी
बसलं होतं...

_▄▄™
(●_●)
╚═► => एक प्रियकर...M.Jare....♥

Like page... मराठी प्रेम कथा आणि प्रेम कविता

https://mjare.wordpress.com

              【9604672074】
♥ ❇ ♥ ❇ ♥❇ ♥ ❇ ♥ ❇ ♥ ❇ ♥❇ ♥ ❇