bk

"LOVE "तेरे बिनं......(भाग-१)
« on: October 23, 2016, 04:48:02 PM »
............आपण जेवढे कोणालातरी
प्रेम करतो तेवढेच प्रेम
तो व्यक्ती आपल्यावर
करेल असे काही नाही
आणि त्या व्यक्तीने
आपल्याला प्रेम दिले तर
त्यालाच आपण प्रेम
जिँकले असे म्हणतो...
   दिग्या (दिगांबर
काळे)नुकाच बारावी ६३
टक्क्यांनी पास झाला ,
वर्गात पाचवा आला
होता. त्याने ठरवले होते
कि आपल्याला फार्मसी
करायचे आहे.त्याचा
डिप्लोमा फार्मसी ला
चांगल्या कॉलेजला नंबर
लागला. अभ्यासात
तरबेज असलेला दिग्या
खुप अभ्यास करायचा
ठरवतो. दिग्याची
फॅमिली इकोनॉमिकली
कमकुवत असल्यामुळे
फॅमिली ला पण
इकोनॉमिक सपोर्ट
करायचा होता. यामुळे दिग्याने
मनोमन ठरवले होते कि
कोणाच्या नादी
लागायचे नाही, आपला आपला
अभ्यास आणि आपण येवढेच
माननारा दिग्या खुप
अभ्यास करु लागला. सर्व
मुले कॉलेज लाईफ मस्त
इंजॉय करत होते. दिग्या
मात्र एकटा अभ्यास
करत बसायचा.
दिग्याचा रुम पार्टनर
अभिजीत (बंटी) त्याला
नेहमी "सन्नाटा -
सन्नाटा"म्हणुन
चिडवायचा. बंटिच काय
कॉलेजचे सर्व मुले त्याला
"सन्नाटा" म्हणुन हाक
मारत असत. दिग्या
मात्र कोणाकडेही लक्ष
देत नसे त्याचे आपले एकच
अभ्यास एक अभ्यास
त्यामुळे पुर्ण कॉलेजमध्ये
दिग्या सन्नाटा या
नावाने फेमस झाला
होता. बंटी दिग्याला
नेहमी सांगायचा . अरे
थोडा हसत खेळतं जा,
मुलांसोबत गप्पा मारत
जा, कॉलेज लाईफ मध्ये
आता इंजॉय नाही
करणार तर केव्हा
करणार , मात्र दिग्या
नेहमीच अभ्यास एक
अभ्यास. (क्रमश: )