Ravi padekar

    प्रेम हे काय असत कधीच कळलं नव्हतं..... लोक करतात म्हणून आम्हाला ही ते करावसं वाटलं होत....कुणीतरी आवडणे.... एखाद्याला जीव लावणे.....छोट्या छोट्या गोष्टीमध्येच रमणे....चित्रपट पाहून आम्हाला ही वेड लागलं होत....आपल्या प्रिय व्यक्तिसोबत वेळ घालवणे.... असचं एक शाळेतल प्रेम...!!!
       गावामध्ये एकच शाळा होती....संत ज्ञानेश्वर माऊली विद्यालय... नववीचा रिजल्ट लागला होता....सर्व जण वर्गाबाहेरच उभे होते... रिजल्ट आणायला आले होते...result आणण्यासाठी झालेला सर्वांचा गोंधळ....
“ये व्हय माग, जाऊ दे म्होर मला ”....जितू  (वर्गातला खोडकर मुलगा...नेहमी वर्गामध्ये याचाच धाक, मस्तीखोर, अभ्यासात zero असा हा जितू....)
सट्टाक असा कानावर आवाज पडला ...."अय बांडगूळ्या, रांगत उभ राहता यतनाय व्हय तुला"...मोहिते सर
लई मोठ दिवा लावला जणू काय... आलय पुढ?
हातात रिजल्ट पडताच जितू ची नजर पहिली पास की नापास वर.... " वाचलो"
काय झाल रं??....मित्र
काठावर पास झालोय... जितू ने म्हटलं
कोणत्या? " घड्याळ्याच्या व्हय"......मित्र
जितुने त्याच्या डोक्यात टपली मारत.... "काट्यावर नाहीरं काठावर म्हटलं  फुकणीच्या... लई अभ्यास केलेला बघ... पण ते परिकशेला गेल ना... टाइमचं नाय पुरत बघ लिहायला ... नाही तर या येळेस पहिला आलो असतो बघ...!!
"राहुदे या येळेला पण खालूनचं  पहिला आलाय, अन तस बी " दिगंबर " असताना कोणी अजून पहिलं नाही आलय या शाळेत... ”  मित्र

हो का? अन दुसर कोण आलय?
"सोनल".....मित्रा ने म्हटले
ती बघ त्याचीच वाट बघत उभी हाय तिथ....चल जाऊ तिथ?
"आला नाय व्हय अजून ?... जितू ने तिला म्हटलं
सोनल ने डचकून मागे वळून बघितलं,  अन म्हटली ...कोण?
जितू मित्राच्या कानात कुजबुजत, "जस काय आम्हाला काय ठाऊकचं नायी..." दिगंबर गं"
"मला काय माहीत... मी तर मैत्रिणीची वाट पाहतेय!!!”... सोनल

"तो बघ बाबांना घेऊन आला आहे  आज तर " ...जितुने म्हटल्यावर सर्वांनी पाहिले.... दिगंबर एकदम शांत स्वभावाचा, हुशार असा विद्यार्थी, प्रामाणिकपणा, नेहमी शर्ट इस्त्री केलेलं, राहणीमान देखील साधंसरळ,पोशाख ही टापटीप, सर्वांशी हसून खेळून राहणारा, अन कुणाला ही आवडेल असा हा दिगंबर...
"इथून म्होर गेलात ना? डाव्या बाजूलाचं आहे मुख्याध्यापिकांच ऑफिस!” दिगंबर ने आपल्या सोबत आलेल्या त्या काकांना सांगितले, आरं आम्हाला वाटलं तू बा ला घेऊन आलाय? पहिला नंबीर आलाय म्हणून? अरे ते जावूद्या आधी पेढे घ्या त्याकडून सोनल ने म्हटलं ....
" तू गप्प!!!  त्याच्याकडून तर घेणारच आहोत पण तुझ्याकडून पण?
“ अरे देईल ना मॅट्रिक पास झाल्यावर”.... सोनल
“एक काम कर की लग्न झाल्यावरच दे की...मॅट्रिक पास झाल्याचा... बिकाम पास झाल्याचा... MSCIT पास झाल्याचा....
"तुझ्या बा नं ठेवलं व्हय MSCIT झाल्यावर पेढे वाटतात का रं" ..... मित्राने म्हटलं (सर्व हसत गप्पा मारत निघून जातात, दिगंबर आणि सोनल तेथेच असतात गप्पा मारित, मैत्री असावी तर अशी, समद्या शाळेला ठाऊक त्यांची मैत्री )

Excuse me?
दोघेही वळून बघतात... ज्ञानेश्वर विद्यालय हेच का? हो हेच आहे सोनल बोलते.
" पप्पा कुठे गेले  काय माहीत? ती मुलगी पण हळू आवाजात बोलते. principal चं ऑफिस कुठे आहे  सांगू शकाल?
"इथून समोरच आहे "... दिगंबर ने म्हटले
ती निघून गेल्यावर... "का रे कोण व्हते ते काका सोनल ने विचारलं, अगं मी येत असताना भेटले मधेच,  त्यांना पण इकडेच यायचं व्हत... मी म्हटलं म्या सांगतो म्हणून... त्यांच्या मुलीचं अॅडमिशन करायचं आहे त्यांना आपल्या शाळीत... मुंबईला होते ते पण काही कारणास्तव त्यांना इकड याव लागलं... असो चल आपण जाऊया परवा तर भेटणारच आहोत शाळा सुरू झाल्यावर....
हो चल bye...
bye.... क्रमश:                (to be continued....