Ravi padekar

"अरे आवरलं का तुमचं..... चला लवकर ...... हे घे " परी "ठेवून ये गाडीत ....चिमुकली परी म्हणजे  बाबांची नात.... बाबांनी सर्वांना हाका मारल्या....
 "या बायका म्हणजे ना....
"बाबा चहा घ्या....”  गौरी ने चहा आणून दिला (बाबांची सून )
"लक्ष्मी कुठे आहे... एवढा वेळ लागतो का आवरायला.... ती माणसं वाट पाहत असतील....आणि "अमन" ला पण बोलवं" ..... बाबांनी गौरीला  सांगितलं.....
गौरीने अमनच्या बेडरूम कडे पाऊले टाकली....अमन मात्र असाच बसला होता......बाबांचा थोडा लाडका असलेला , उभा चेहरा, दिसायला ही हॅंडसमच होता, ऊंची साधारण 5- 5.5 फुट असेल...... त्याच बोलणं अगदी एखाद्याला मोहावून टाकणारं...... अगदी मनमिळावू,समजूतदार,  कुणालाही आपलस करणारा..... त्याच्याच लग्नाची सर्वांना उत्सुकता.....
"अमन, अरे चल....! झाली नाही का तयारी?
" वहिनी... ! बर झाल तू आलीस,  सांग ना हा शर्ट घालू, का हा शर्ट घालू"..... अमन ने दोन्ही हातात white आणि blue शर्ट पकडत वाहिनीला विचारलं.
"अरे लवकर तयार हो..... मुलगी पाहायला तर जायचं आहे, कुठे interview ला नाही चाललास? आणि असं पण तुला कुठलाही शर्ट चांगलाच  दिसतो..... हा शर्ट घाल white..... मस्त दिसेल.
"अगं वहिनी ती interview तर घेणार ना माझा
"अरे हो....!
" पण अस काही नसत.... चल लवकर तयार होऊन खाली ये..... बाबा बोलवत आहे
“हो आलोच"

सर्व जन तयार होऊन निघाले.... बाबांनी गाडीला चावी देत गाडी start केली....  गाडीने ही वेग घेतला..... "सोपान हा ना खूप जुना मित्र आहे माझा.”..... बाबांनी सांगितलं. त्यांचीच मुलगी पाहण्यासाठी आज गाडी त्याच दिशेने चालली होती.....  एकाच कामात काम करणारे हे दोघे मित्र...... सोपान आणि गोविंद.......  बाबांनी त्याला सांगितलं होत..... "एक दिवशी तुझ्या मुलीला सून म्हणून मी नेणार आहे घरी" बाबा नेहमी बोलायचे...... पण आज खरच ती गोष्ट अस्तिवात येत होती....  कारण सोपान काकांच्या मुली खरच संस्कारी होत्या...... एक प्रिया आणि एक नेहा ....... गाडीत सर्वांच बोलणं चालूच होत.....अमन मात्र मोबाइल मध्येच  busy होता...... तिचाच फोटो पाहत..... ती म्हणजेच  प्रिया.... प्रियाला dance ची खूप आवड..... तिने जवळपास पाच- सहा परितोषिक पटकावलेली होती .... गोल असा चेहरा, बारीक पाणीदार डोळे, थोडेसे कुरुळे असे केस..... आणि नाजुकश्या हनुवटीवर लोभस असा तिळ...... आज तो मुलगी पाहायला चालला होता.... अमन कम्प्युटर इंजीनियर आहे........mobile मधेच इतका गुंतलेला असताना कधी मुलीच्या घरी आला त्याला ही कळलं नाही.... सर्व उतरले.... बाबा पुढे गेले.....

"कसं आहेस सोपाना...”
"अरे या या या.... आलात आपण..... “सोपान काका"
बाबांची आणि सोपान काकाची ओळख काही नवी नाही......  "अहो या ना बाहेरं का उभे"
सर्वजन घरामध्ये विराजमान झाले..... “ ये काका कुठे आहे काकी " अगं परी शांत बसायच काही बोलायचं नाही.... गौरीने तिला ठमकावला.....
बाबांच त्यांचं बोलणं चालूच होत..... अमन मात्र घरातला परिसर डोळ्यांनी टिपत होता..... कधी fan, कधी light..... सारीकडे नजर फिरून आता काहीच ठेवलं नव्हतं पाहायचं बाकी....
घरातल्या आतल्या खोलीतून दोन तीन जणी बाहेरं आल्या.... सर्वांच्या नजरा तिकडेच..... जिच्या हातात चहाचा ट्रे पाहिला..... अमन तर तिलाच पाहत होता..... “ ये ताई हे घे "  नेहाने चहाचा ट्रे प्रिया कडे दिला..... प्रिया चहाचा ट्रे घेऊन आली.... सर्वांना चहा देत ती अमन जवळ आली..... अमन ने चहा उचला पण तिने काही पहिलं नाही आणि ती निघून गेली.....
सर्वांच बोलणं चालूच होत.... सोपान काकांनी प्रियाला हाक मारली..... आणि ती समोर येऊन बसली......
विचारा काय प्रश्न विचारायचे असतील तर....
“वाहिनी ने विचारलं... किती शिक्षण झाल आहे ते.....”
" graduation”  तिने ही सांगितलं.
बाबांनी अमनला विचारलं..... तुला काही विचारायच आहे का?
नाही बाबा.... तुम्हाला पसंत आहे ना
अरे लग्न काय मला करायचं आहे का?
“ अहो त्यांना थोड free सोडा.... ते बोलतील हळूहळू.... तुम्ही दोघ जावा वर गच्चीवर..... आणि बोला...
दोघेही वर गच्चीवर गेले.... पण दोघेही काही बोलत नव्हते.... अमन तर इकडे तिकडे पाहत होता..... ती तर शांतच होती.... "खूप गरम होतय ना....” अमन नेच विचारलं
"हो...!” ती फक्त एवढच म्हटली.
"कुठे होतीस कॉलेजला?
“ मी DSIC ला स्टेशन पासून जवळच आहे.”..... प्रिया
“अच्छा"
'तुम्ही कुठे आहात job ला"
“मी computer इंजीनियर आहे....  मुलुंडलाच आमच ऑफिस आहे.
“तुला माहिती आहे प्रिया...! तू खरच खूप सुंदर आहे..... कोणीही तुला हो म्हणेल"
“पण मला तुम्हाला एक सांगायचं आहे".....   “बोल ना" ..... “ मी हे लग्न नाही करू शकत....
“माझ एका मुलावरती प्रेम आहे".........  अमन फक्त ऐकतच होता.  त्याला कळलं नाही काय बोलावं..... तो म्हटला ठीक आहे...... मी नाही करणार हे लग्न......”
“मग तू घरी का सांगितलं नाही.... माझ प्रेम आहे म्हणून एका मुलावर?
“कस सांगणार.... मला नाही जमत बोलायला...... आमच्या बाबांसमोर कुणाचीच हिम्मत होत नाही......मला भीती वाटते.
“ok... चल जाऊया. दोघेही पुन्हा घरात येतात.... प्रिया तर शांतच होती.... पण अमनचा चेहरा पण पडला होता.... बाबांनी विचारलं झाल ना बोलणं...... मग ठिक आहे.
“चल सोपान कळवतो तुला....!
त्यांची गाडी पुन्हा घरच्या दिशेला निघाली.....  आईच, वाहिनीच बोलणं तर चालच होत.... “तशी छान आहे मुलगी" आईने म्हटलं....
“हो आणि शिकलेली देखील आहे" ......गौरी
अमन मात्र बाहेरच दृश पाहण्यातच मग्न होता.... त्याच्या मनात वेगळाच विचार चालला होता..... बाबांनी विचारलं " काय रे तुला आवडली ना मुलगी" अरे बाहेर काय पाहतोय तुला विचारतोय....
“ मी अजून विचार नाही केला बाबा" अमन ने म्हटले

क्रमश:
To Be Continued....
 

Sarita

Re: एका लग्नाची गोष्ट.... (भाग-१)
« Reply #1 on: January 24, 2017, 02:19:57 PM »
Pudhache bhag kevha yenar??