Trupti zure

शब्द मनातले ओठांवरी
(भाग 3)

दुसर्यादिवशी ......

"Good morning!!!अभ्या"....ऑफीसमध्ये आल्यावर कबीर म्हणाला

"क्या बात है??? आज स्वारी भारीच खुष दिसतेय??...अभि

"Ooo....common मी नेहमीच खुष असतो"कबीर

"For your kind information Mr.Kabir तु जेंव्हा खुष असतोस ना...तेंव्हाच मला अभ्या बोलतोस....चल अब बता क्या बात है।।" अभिने प्रश्नार्थक नजरेने कबीर कडे पाहिले

कबीर ने फक्त एक गोड smile दिले....

"Oooo....समझा ...समझा बोलणं झालेले दिसतयं वहिनी सोबत" अभि

"yaaaa....she called me!!! आणि तिला job मिळाला" कबीर प्रफ्फुलित चेहर्याने अभिला सांगत होता

"अरे वाहऽऽ ....इस बात पर party तो बनती है!!! Double celebration होना चाहिये...एक आपल्या कंपनीच्या Deal चं... आणि दुसरं आपल्या वहिनीसाठी" अभि सुद्धा खुष झाला

"Doubble नाहि....Tripple!!!"कबीर

"आआआऽऽ ...कस काय??" काहिश्या सांशक स्वरात अभि म्हाणाला

"एक तर आपल्या deal चं...second आपली नाही....तुझ्या वहिनीच्या Job साठी ..तुझ्या ह्या शब्दावर कबीरने मुद्दामहून जास्तच जोर दिला...आणि third Bachelor party ......है ना!!!"कबीर हसतच म्हणाला

"आयला हो रे लग्न जवळ आलंय माझं" अभि

"हम्ममऽऽ"कबीर

"ते ठीक आहे रे!!!....पण वहिनी ला कस बोलवणार?? येइल का ती??" अभि

"मला काय माहित!!"कबीर अभिच्या प्रश्नाला उत्तर देत म्हणाला

"अरे....simple... call her!!" अभि ने कबीरला सल्ला दिला

"By the way...तुझ्या तिला नावं.. गावं आहे की नाहि???" अभि

"मीराऽऽऽ......"कबीर ने एक दिर्घ श्वास आणि एक गोड smile देत तिचे नाव घेतले......

"Oye...hoyeee कबीर की मीरा....मीरा का कबीर "अभिने पुन्हा कबीरला चीडवण्याचे काम सुरु केले....

"येऽऽ ....मी निघतो बरीच काम आहेत मला...इथे थांबलो तर तु काय मला सोडणार नाहि....Bye" कबीर

"एए...evening भेटु and call her!!" अभि ने कबीरचा निरोप घेतला.

'The mobile number you have called is currently switch off, please call again later'

कबीरचे मीराला कॉल करण्याचे सतत प्रयत्न सुरु होते...
"शीट यारऽऽऽ" कबीर चिडक्या स्वरात म्हणाला

"आता काय्य्यऽऽ?" अभिने कबीरला विचारले

"switch off आहे तिचा phone!!!" कबीर

कबीरला फक्त आणि फक्त तिच दिसत होती. अगदी आपण इंन्स्टाग्राम मध्ये बाकीच्या गोष्टी धुसर करुन टाकतो एखाद्या गोष्टीवर फोकस रहाण्यासाठी.. अगदी तस्संच. माहीत नाही! ती कुठे होती??.. काय फरक पडतो.. ती ‘होती’, ह्यातच सर्वकाही होतं. तिच्या हसण्याचा आवाज, तिचे स्पार्कलिंग डोळे,तिचा चेहरा अगदी स्पष्ट दिसत होतं कबीरला...

११ सप्टेंबर....अभिच्या लग्नाचा दिवस

ऑर्किडच्या महागड्या फुलांनी प्रवेशद्वार सजवले होते. चौघडा वाजवणाऱ्याबरोबर, दोन तुतारी वाजवणारेही प्रवेशादारापाशी उभे होते. अनेक मोठ-मोठ्या गाड्या पार्किंगमध्ये दिमाखात उभ्या होत्या....
हॉल मध्ये सनई चौघड्यांचे सुर घुमत होते... Reception ला नुकतीच सुरवात झाली होती...अभिच्याच बाजुला कबीर उभा होता....
"creamy colour ची Indo Western with golden work असणारी शेरवाणी...... beautifully कबीरच्या look ला enhance करत होतीे.......

काही वेळाने....लग्नमंडापाच्या दारातुन एका मुलीने प्रवेश केला..

टीपीकल मराठी स्टाईलची राणी-कलरची काटा पदराची साडी तिने नेसली होती.... सोनेरी रंगांचे वर्क त्या साडी सौदर्य अजुनच खुलवत होते. गालांवर त्याच कलरचा.. पण लाईट-शेडचा मेक-अप होता. एखाद्या टपोर्या मोत्यासारखे तिचे सुंदर डोळे काळजाचा ठाव घेत होते. तिचे लांबसडक काळेभोर केस अर्धे पाठीवर तर अर्धे खांद्यांवरुन पुढच्याबाजुला पसरले होते....ब्लॅक-आयलायनर्सने तिचे आधीच अॅट्रॅक्टीव्ह असणारे डोळे अजुनच अॅट्रॅक्ट करत होते. पुर्ण मनगटभरुन रंगेबीरंगी बांगड्या.... तिला टीपीकल मराठी मुलगी लुक देत होता..

“देख कर तुमको..
यकीन होता है..
कोई इतना भी हसीन होता है..
देख पा ते है कहा हम तुमको…
दिल कही.. होश कही होता है॥”
जगजीतच्या आवाजातले गाण्याचे ते शब्द आठवले जेंव्हा कबीरने..... मीराला पाहिले.....
क्रमशं........