m4marathi Forum

मराठी कथा मराठी गोष्टी ( Marathi Goshti / Marathi katha / Marathi stories / Marathi story ) => प्रेमाच्या गोष्टी Marathi Love Stories => Topic started by: mjare on March 25, 2016, 10:02:51 AM

Title: मित्रांनो मी लिहीलेली ही 47 वी प्रेमकथा आहे....M.jare..™
Post by: mjare on March 25, 2016, 10:02:51 AM
मित्रांनो मी लिहीलेली ही 47 वी प्रेमकथा आहे....

जी मी,ज्यांच्या आयुष्यातुन प्रेम दुर गेलं असतानासुद्धा त्याची वाट पाहत आहेत....

एक प्रियकर..

दिव्या आणि "महादेव यांचं एकमेकांवर प्रचंड प्रेम होतं,
एकाच क्लासमध्ये शिकत असल्यामुळे त्यांची चांगली मैत्री जमली अन मग त्याच मैत्रीचं प्रेमात रुपांतर झालं...

एकमेकांना समजुन
घेऊन दोघांच्या निर्णयांचा योग्य तो आदर करणं त्यांना
माहीत होतं,आणि त्यामुळे त्यांच्यात क्वचितपणे झालेला वाद
सुद्धा कधी भांडणापर्यँत पोहोचला नाही...

दोघेही
एकमेकांची प्रचंड काळजी करायचे आणि त्यामुळेच ते एक
परफेक्ट कपल म्हणुन पाहायला कोणालाही आवडलं असतं....

तीन वर्षात कधीही एकमेकांपासुन दुर न राहीलेल्या या
दोघांसाठी ही परीक्षेची वेळ होती.

कारण महादेवला त्याने
दिलेल्या job interview मध्ये banglore च्या एका कंपनीने
select केलं होतं,आणि त्याला आता लगेच आठ दिवसांसाठी
trial work साठी बोलावण्यात आलं होतं,आणि दोन
महीन्यांनी जॉबवर हजर राहायचं होतं...

हे जेव्हा दोघांनाही
कळलं तेव्हा एकमेकांपासुन आपण दुरावणार म्हणुन मनातुन
हिरमुसले गेले होते....

महादेवच्या मनात जायचं अजिबात नव्हतं
पण,हृदयावर दगड ठेवुन महादेवच्या भविष्याचा विचार करुन
दिव्याने त्याला जाण्याचा आग्रह केला तेव्हा तो गेला....
.
आठ दिवसांच्या यशस्वी ट्रायल वर्क नंतर तो परत
आला,आल्या आल्या तो प्रचंड उमेदिने आणि आनंदाने
दिव्याला भेटण्यासाठी तिच्या घरी गेला,पण तिच्या घरी
भलंमोठं ताळं होतं,त्याला थोडा वेळ समजलंच नाही की ताळं
का आहे ते..

त्याने दिव्याला कॉल करण्याचा प्रयत्न केला पण
लागला नाही,कॉलेज frnds ना कॉल केल्यावर कळलं की चार
दिवस दिव्या कॉलेजवर आलीच नाही.

काय चाललंय कळतंच
नव्हतं,क्षणभर काही सुचतच नव्हते,त्याने दिव्याची
शोधमोहीम चालु केली,आणि याच दरम्यान दोन महीने कसे गेले
कळलंच नाही,शेवटी त्याला banglore च्या कंपनीचा call
आला....

आई वडीलांच्या सुखाचा विचार करुन तो निघुन
गेला,तिच्या आठवणीँनी भरलेल्या ओँजळीने त्याला पुढची
दोन वर्षे,वीस वर्षाँसारखी गेली.प्रमोशन झालं,बदली झाली मुंबईला....

मुंबई एक स्वप्नांचं शहर,याच शहरात हजार प्रश्नांचं ओझं
घेऊन तो कामावर हजर झाला,,सहा महीने निघुन गेली
होती...

कंपनीच्या एका कामानिमित्त त्याला बँकेतुन
ठराविक रक्कम withdraw करायची होती,आणि तेच करायला
जात असताना....

त्याला दिव्यासारखी दिसणारी एक मुलगी
दिसली,त्याच्या आनंदाला पारावर उरला नाही त्याने कार
वळवली...आणि तिच्याजवळ नेऊन थांबवली,ती मुलगी अचानक
दचकलीच,पण हा तिला दिव्या म्हणुन हाक मारु
लागला.....

तिच्या चेहर्याचा एक भाग सावळा पडला
होता,खुपच कुरुप होती ती मुलगी...

महादेवच्या वारंवार दिव्या म्हणुन उच्चारण्यापुढे शेवटी तिने हार मानली,कारण तिच
दिव्या होती....

ते दोघे एका हॉटेलमध्ये गेले,दिव्याच्या
बदललेल्या चेहर्याबद्दल,तिने सोडुन गेल्याबद्दल जाणुन
घेण्याची एक दुःखभरी ऊत्सुकता महादेवच्या चेहर्यावर दिसत
होती....

दिव्याने बोलायला सुरुवात केली,तु बेँगलोरला गेल्यावर
मी मन रमवण्यासाठी नवनवीन पदार्थ करायला शिकण्याचा
प्रयत्न करु लागले...

आणि अशाच एका घाईगडबडीत माझ्याकडुन
घडलेल्या निष्काळजीपणामुळे उकळलेलं तेल माझ्या चेहर्यावर
उडलं,त्यामध्ये माझा निम्मा चेहरा जळाला आणि मग आई
वडीलांनी मला हॉस्पीटलमध्ये नेलं,तिथुन प्लॅस्टीक
सर्जरीसाठी मला मुंबईत हलवण्यात आलं...

सर्जरी यशस्वी झाली,पण सर्जरीनंतर मी जेव्हा माझा चेहरा आरशात
पाहीला,तेव्हा तो पाहुन माझा थरकाप उडाला,आणि हा
चेहरा घेऊन मी तुझी साथ मिळविण्याची अनपेक्षित इच्छा
मी कधीच बाळगु शकले नसते....

म्हणुन तुझ्या आठवणी घेऊन तुझ्या
आयुष्यातुन दुर जाण्याचा निर्णय घेतला...

महादेव दुखी मनाने म्हणाला,हेच काय ते समजलंस माझ्या
प्रेमाला...

इतका स्वार्थी कसा विचार करेन मी...

मेरा प्यार तेरी खुबसुरती का मुहताज नहीँ है....
जहाँ प्यार खुबसुरती का मुहताज होँ,वो प्यार प्यार नहीँ है।
अब भी मैँ तुमसे प्यार करता हुँ,तुम्हारे खुशी के लिये,
जिँदगी भर का साथ चाहता हुँ,जिँदगी से बढकर जिँदगी जीने के लिये...

असं म्हणुन त्याने जपुन ठेवलेली त्याच्याकडची एक रिँग तो
हातात घेवुन गुडघ्यावर बसुन म्हणाला,

मी अजुनही तुझ्यावर तितकाच प्रेम करतो,
जर
तुझंही माझ्यावर अजुनही तितकंच प्रेम
असेल तर मी देत असलेली ही रिँग स्वीकार कर आणि आणि
माझ्या प्रेमाला होकार दे...

त्याचं बोलणं ऐकुन आधीच डोळे भरुन आले असताना त्याच्या
या वाक्याने ति रडुच लागली,आणि तिने फक्त ती रिँग
स्वीकारली नाही,तर तिने त्याच्या कपाळाचं चुंबनही घेतलं...

आणि अशा प्रकारे दिव्या आणि महादेवच्या जीवनात ती
सकाळ आली जी रात्रीच्या गडद अंधारात स्वतःचं अस्तित्वच
विसरुन गेली होती..........
Story written by
_▄▄_
(●_●)
╚═► => एक प्रियकर...M.Jare.....♥
           【९६०४६७२०७४】

♥♥
♥♥♥
♥ ♥ ♥ ♥ ♥ ♥ ♥ ♥ ♥ ♥ ♥ ♥

जे काही झालं ….
त्यात मी पूर्ण
पणे 100 % देऊन try केल…. काहीच नाही समजत काय करायचं ते….. ???
काय होणार आहे ते ??? …
डोळे बंद केले कि डोळ्यांसमोर ….. Future …. life …. आणि
काय काय तसेच भरपूर प्रश्न येतात …. आणि झोप उडउन
टाकतात …… डोळे उघडे असताना …. present च्या विचाराने
.. वैताग येतो… आणि त्यातच … past … तो देखील एवढा वाईट
आहे … नुसता विचार करून करून … काहीच सुचेनासं होतं ….
खरच नाही समजत मी कुठे कमी पडलो … काय … आणि कुठे …
कमी मेहनत केली ?? every time स्वतःचा best च दिलाय …
तरी समजत नाही का …????
का सगळं माझ्या हातातून निघून जातं ????
प्रत्येक वेळेस ….
नेहमीच … असाच होतं … काहीच
सुचत नाही …. कोण सोबत आहेत माहिती नाही …
कोणासोबत जाऊ समजत नाही …. कोणावर विश्वास
ठेवायचा माहिती नाही …
काय करायचं ???? कसं करायचं ??
कुठे जायचं ??? कशा साठी जायचा ??? कसं जायचा?? नाही
गेलो तर ??? आणि गेलो तरी … कोणी असेल काय सोबत … ??
काय?कुठे? कसं? केव्हा? कोण? कितीतरी ….. प्रश्न …. नाही
समजत काहीच …
कोणी नाही सांगायला? कोणी नाही ……. अक्तुअल्ल्य ….
कोणी नाही म्हणून काहीच नाही फरक पडत …. पण मी कुठे
कमी पडलोय तेच नाही समजत …!!! मग जर कुठे कमी पडलो नसेल
तर नेहमी माझ्याच बाबतीत का असा होतं??? मीच का
नेहमी मागे राहतो ???…. माझ्या सोबतच का कोणी
नसता??? ना देव ना धर्म …. ना मित्र … ना शत्रू … नेहमी चाच
मी एकटाच …. सगळ्यात शेवटी …..
मला देखील पुढे जायचं … सगळ्यांसोबत राहायचं … कधीतरी
मनापासून हसायचय …. किती दिवस असंच हसणार ….
डोळ्यातलं पाणी लपून ओठ फुलवणार … मला खरच हे अजून
जास्त दिवस नाही जमणार … कधी ना कधीतरी …. मनाचा
control सुटणार ….
देव … काय आहे तो?? कोण आहे तो? नाही माझा या पुढे
त्यावर अजिबात विश्वास नाही …. या आधी मी कधी कधी
त्याच्या कडे पाहायचो … पण आता … यापुढे अजिबात नाही
…. आत्तापर्यंत .. जेव्हा पण कोणते हि … मी पाहिलेलं स्वप्न
त्याने पूर्ण नाही होऊ दिलं …. मी पूर्ण मेहनत केली …
सगळ्यांनाच माहिती आहे … पण मग तरीही … जे काही
मागितला … ते त्याने कधी माझ्या पर्यंत येऊनच दिलं नाही …
जे काही माझ्या कडे होतं … ये राहुदे असं बोललो …. ते सगळं
त्याने माझ्याकडून …. हिसकावून घेतलं ….
नाही समजत काय काय लिहू अजून …. बरेच शब्द आहेत मनात …..
पण कागदावर त्यांची जागा fix नाही करता येत …. नाही
समजत कसं लिहू …. फक्त प्रश्न … आणि प्रश्न …. आणि प्रश्नच...

The end..M.jare.
♥ ♥ ♥ ♥ ♥ ♥ ♥ ♥ ♥ ♥ ♥
Title: Re: मित्रांनो मी लिहीलेली ही 47 वी प्रेमकथा आहे....M.jare..™
Post by: tushri on November 18, 2016, 12:58:00 PM
 :) :) :)
Title: Re: मित्रांनो मी लिहीलेली ही 47 वी प्रेमकथा आहे....M.jare..™
Post by: Chutaki on April 02, 2017, 06:45:57 PM
Awesome story...**