mjare

एक खरी प्रेमकथा.....
Break-Up Ke Baad ..

मुलगी :तुझी नविन गर्लफ्रेँन्ड खुप छान आहे
(तीने चांगलचं Impress केलं असेल) ...
मुलगा : हो आहेचं ती
(पण सर्वात सुंदर
मुलगी माझ्यासाठी तुचं आहेस) ...♥

मुलगी : मी ऐकलयं ती खुप Stylish n Joking
आहे
(ह्यातलं माझ्यात काहीचंनव्हतं म्हणुन आपलं
Break-Up झालं वाटतं...)

मुलगा : असेलही
(पण तुझ्यासमोर ती काहीचं नाही) ...
मुलगी : मला आशा आहे
तुम्ही शेवटपर्यँत
खुश राहाल
एकत्र राहाल
(कारण आपण शेवटपर्यँत पोहोचलोचं नाही)
... ♥

मुलगा : I Hope So आम्ही राहू
(पण आपण नातं का नाही टिकवू शकलो ?
का शेवटपर्यँत पोहचू शकलो नाही?) ...
मुलगी : Well आता मी निघते Bye.. (माझं रडणं
सुरु व्हायच्या आत ) ...
मुलगा : हा मी पण निघतो
(Plz इथुन गेल्यानंतर तु रडु नकोस) ...
मुलगी : Bye
(मी अजुनही खुप प्रेम करते तुझ्यावर) ...
मुलगा : भेटु परत.. .♥

 (तुझ्यावर प्रेम कारायचं
कधीचं थांबवू
शकत नाही).... .♥

आयुष्यात प्रत्येक गोष्टीला दुसरी बाजू असते,
आणि
आयुष्यात अशी काही माणस असतात .....
ज्यांची जागा दुसरं कुणीचं घेऊ शकत, आयुष्यात
कितीही माणसं येऊ देत ते नेहमीचं
Special असतात आणि राहतात......♥

एक प्रियकर........♥

(9604672074)

Manoj Randhe

In A long Distance
« Reply #1 on: May 23, 2015, 11:51:51 AM »
   
In A long Distance
जगात एकदम भेटावे अशी त्यांची अचानकच ओळख झाली, त्याला ती दिसताच क्षणी पसंत पडली ..
तिलाही थोडा वेळ नाही लागला तिच्या  स्वप्नातला राजकुमार हेरायला.. खूपच कमी वेळात ते खूप जास्त जवळ येवून गेले .. सार काही स्वप्नात घडावं आस चाललं होत, त्याला तर विश्वासच बसेना
सगळ विश्व त्याला सुंदर दिसायला लागल.. दोघंही Career Oriented तोही चांगल्या कंपनीत नोकरीला .. तिचाही नुकताच शिक्षण संपलेलं तिची इच्छा कि तिने metro City मध्ये Settle  व्हावं त्यानेही  तिला अगदी मोकळेपणाने . जाण्याची परवानगी दिली, दोघांनी एक मेकांच मन मारून फक्त Career  पोटी लांब  राहण्याचा विचार केला. त्याने तिला विश्वास देवू केला कि लवकरच तोही मेट्रो सिटी मध्ये जॉब करेन. तीही त्याच स्वप्नात ...खूप कमी वेळ सोबत घालवल्यानंतर दोघ लांब झाले दुरावा सोसावेना पण करणार तरी काय त्याची इच्छा कि तिने परत यावं पण तिला दिलेला शब्द परत आठेव आणि हा गप्प बसून मन मारायचा दोघांच फोन  वर बोलन .. दिवस रात्र एकमेकांची काळजी कारण दोघे त्यांचा एकमेकांचा  विश्वात पार गुरफटून गेलेले तिला त्यःच्या शिवाय आणि त्याला तिच्या शिवाय दुसर काही सुचेना रोज सकाळी येणाऱ्या Gm  च्या msg ने दोघांची सुरुवात व्हायची एकमेकांचा आवाज एकल्या शिवाय जणू दिवसच उगवेना दोघांना जणू गभाड हाती लागल्यासारखं झाल.. पण मनात खंत होती ती जवळ येताच लांब जाण्याची तो वेळ काढून तिला भेटायला जात असे महिनाभरानंतर ते एकमेकांना बघू शकत असत., त्यामुळे प्रत्तेक महिन्याला भेटण्याची मजा काही ओरच होती , ती महिना संपण्याची वाट बघत असायची आणि तो तितक्याच उत्सुकतेने तिला भेटायला जात असे .. दिवस रात्र सार काहि एकच झाल होत !! तो तिला जीवापाड प्रेम करायला लागला होता आणि तिचही त्याचाबद्दल तेवढच प्रेम होत , Long  Distance  मध्ये दोघांचे हाल होत होते पण तो सुद्धा ते आनंदाने ते उपभोगत होते , तो तिचा सगळ्या अपेक्षा पूर्ण करत होता .. तिनेही तीच सर्वस्व त्याला देवू केल . दोघाही निस्सीम प्रेमात फार बुडाले . दोघांनी लवकरच लग्नाचा निर्णय घेतला तिने तिचा आणि ह्याने स्वताचा घरी आपआपला  निर्णय सांगितला तोहि  तितकासा सक्षम असल्यामुळे घरच्याना नाही म्हणायला प्रश्नच नव्हता काही वर्ष लोटली Valentine  Day , Anniversary , Birthday खूप उत्साहात साजरे होत होते, प्रत्तेक सन सोबत साजरा होत असे अगदी दिवाळी असो कि  दसरा अगदी जीवनाचे सखे सोबती जसे,  प्रत्तेक वेळेस एकमेकांना Surprise  देणे  आणि त्याचा आनंद घेणे,  त्यांचात कधीच वाद होत नसे ..दोघही तितकेसे समजूतदार होते एकमेकाना समजून घेत असे ..कुठलाच प्रश्न नाही एकमेकांवर अगदी डोळे बंद करून विश्वास ठेवत होते , दोघ कामात व्यस्थ व्हायला लागले Msgs कमी झाले फोन कॉल्स हळूहळू कमी झाले.. तोही व्यस्थ ती त्याचाहून जास्त !! फक्त तीचाशी लग्न करायचं म्हणून तो पैसा जमवा जमव करू लागला, घरात मोठा भाऊ तो आधी पासून पंगु वडिलांचं वय झालेलं घराचा सगळा दारोमदार त्याचावर चालू होता ,...
आता ती त्याचाजवळ Complaint करायला लागली तू मला वाचन दिलेलं कि तू ह्या सिटी मध्ये सेटल होणार तो तिला प्रत्तेक वेळेस हो म्हणत असे .. त्याची परिस्थिती त्यःचा Job , घर , नातेवाईक सार काही इकडेच तो तिला समजवू शकत नव्हता तो मनातल्या मनात त्रस्थ होता मनातील स्थिती तिला सांगू शकत नव्हता तिची चिडचिड सुरु झाली होती तो फक्त एयकुन घेत होता आणि प्रेमाने तिला समजवत होता ..आता ती मेट्रो सिटीतली Modern  मुलगी झाली होती, तिला आता कुठल्याही परिस्थितीत मागे फिरायचं नव्हत. आता त्याचे हाल होत होते , तीची चिडचिड सुरूच होती तिचा मनस्ताप तो सहन करत होता, त्याने प्रत्तेक शक्य तो प्रयत्न केला होता.. तिचा प्रेमातला फरक त्याला जाणवायला लागला होता, तो तिचा मानाने खूप जास्त Sensitive
होता तो तिला समजवू शकत नव्हता आता ती काहीही ऐकण्याच्या पलीकडे निघून गेलेली होती,
हळूच तिच्या शब्दांमध्ये बदल जाणवायला लागले अहो म्हणून हाक मारणारी त्याला अरे - कारे म्हणून बोलायला लागली त्याला ह्या सगळ्यांचच वाईट वाटत होत पण हि वेळ वाईट वाटून घेण्याची नव्हती तर तिला होईल त्या परिस्थितीत परत समजवण्याची होती तो दिवसेंदिवस खचत होता, तिने त्याचे फोन ऊचलन बंद केले त्याचा तीचाशी काही केल्या संपर्क होत नव्हता, तो जीवाच्या आकांताने प्रयत्न करू लागला त्याला समजत होत कि त्याच गाव सोडून गेल्यानंतर त्याला खूप सारे हाल सहन करावे लागणार होते. तरी त्याला हार मानायची नव्हती त्याने तिला शेवटचे १५ दिवस मागितले. ती कुठल्याही परिस्थितीत त्याला ते १५ दिवसही देवू करत नव्हती .. त्याने तिचा विनवण्या केल्या हातापाया जोडल्या , तेव्हा कुठे ती राजी झाली आता ह्याचापुढे आवाहन होत ते नोकरी च कि इतक्या १५ दिवसात दुसऱ्या गावी नोकरी कशी शोधायची ..इकडे ह्याची हि नोकरी सुद्धा हातातून जायला लागली होती , ह्या सगळ्या काळात त्याच कामाकडे बरचस दुर्लक्ष झाल होत, त्याने हाताची नोकरी सोडली. आणि धडक तिचा शहरात पोचला राहायला घर नाही हातात काम नाही , त्याने त्याच्या लग्नासाठी गोळा केलेला पैसा ह्या सगळ्या गडबडीत संपायला लागला होता, गावी आई वडिलांचे हाल होऊ लागले त्याहून अधिक ह्याचे , तिच्या शहरात असून देखील तिने त्याला भेटायला साफ नकार दिलेला, त्याचं बोलणही बंद झालेलं होत तो एकटा पडलेला होता कोणाचीच मदत घ्यायची नाही त्यानेही निश्चय केलेला, त्याने तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला, त्याने तिला फोन केला
ती :- बोल काय बोलायचय ते
तो :- कशी आहेस तू ?
ती :- तू कामाचं काय ते बोल सांगितल होत न फोन नाही करायचा
तो :- तुझी सारखी आठवण येते ग !! तुला भेटू वाटतय ??
ती :-   ते शक्य नाही लास्ट सांगते मला ह्या पुढे कधीच संपर्क करू नकोस कृपा कर माझावर, मला इकडे कोणीतरी आवडायला लागलाय आणि तू सुद्धा थोडा प्रक्टीकली विचार कर आणि होईल तितक्या लवकर मला विसरून जा , मी तुला भेटत नसते आपण कधीच एक होऊ शकत नाही, तर मला माफ कर,
त्याची वाचा बंद पडली काही वेळेसाठी तो सुन्न पडला , मोठा बॉम्ब ब्लास्ट अगदी कानाच्या पडद्याजवळ फुटावा असा काही तो सुन्न पडला, एक चक्कर येवून तो उभ्या जागी खाली बसला , शून्यात सगळ काही दिसू लागल पहिली भेट, पहिली मिठी, हातात घेवून सोबत फिरलेले ते दिवस, तिच्या साठी काहीतरी तडजोड करून घेतलेले गिफ्ट्स, तिच्या चेहऱ्यावर हास्य बघण्यासाठी मारणारा तो , मारायला लागला होता , डोळ्यातून अश्रू ओघळायला लागले आणि लहान बाळ रडावं तसा ढसाढसा तो रडायला लागला, त्या नंतर तिने त्याचाशी बराच संवाद साधला पण हा इतका काही घायाळ झालेला कि एकही शब्द त्याचा कानावर नाही पडला, शुद्ध आली तेव्हा ती म्हणत होती मी चुकी केली आणि तुझासोबत संपर्कात आली कदाचित आपण भेटलोच नसतो तर बर झाल असत, माझे फोटो किवा माझ्या ज्या काही आठवणी तुझाकडे असतील सगळ्या फेकून दे , कारण त्या सोबत असतील तर तुलाच त्रास होईल , पहिल्यांदा त्याचा आवाज तीचावर चढला आणि तो ओरडला, पण दुसऱ्याच क्षणी स्वताला आवरत तो म्हटला मला एकदा तरी भेट.तिने साफ नकार दिला, तो विनवण्या करायला लागला , तिने अट घातली हि शेवटची भेट असेल , आणि ह्या नंतर तू माझा वाटेला कधीच येणार नाही आणि भेटी मध्ये ओरडणार नाही त्याने रडत रडत होकार दिला , दुसरा दिवस उगवण्याची तो वाट बघू लागला, रात्र भर विचार करून तो खूप दमला होता, जेवण व्यवस्थित होत नव्हत खूप अशक्त पणा जाणवायला लागला होता,
गचाड कपडे , काळवंडलेला चेहरा , चेहऱ्यावर वाढलेली दाढी  तिने बघताच किळसवाणा चेहरा केला,
तो एक शब्द बोलू पावत नव्हता , त्याचे डोळे अश्रूंनी दाटून आले होते  तीही काही बोलायला तयार नाही त्याने तिच्या डोक्यावर हात ठेवला आणि म्हणाला कि चल परत आपल्या दुनियेत जावूस जे झाल ते सार काही मी विसरायला तयार आहे तुझ्याकडून जी चूक झाली ती मी विसरायला तयार आहे माझाकडून अशी चूक झाली असती तर तू नक्कीच माझी समजूत घातली असती ह्या वेळेस तुला माझी जास्त गरज आहे आणि ह्या वेळेस मी तुला एकट सोडलं तर , माझ्या प्रेमाचा काहीच अर्थ नाही उरत ,
ती ओरडली तुला कळतय का मी तुला काय सांगतेय हे असले डायलॉग मारून मला मिळवण्याचा  तुझा प्रयत्न सफल नाही होणार तू मला विसरून जा , मी खूप पुढे निघून आलीये, त्याने अपेक्षेच्या नजरेने तिच्या कडे बघितल आणि विचारलं काहीच नाही होऊ शकत का ,तिने सरळ नकार दिला , ती म्हटली मला खूप मोठ व्हायचंय माझे Ambitions  खूप मोठे आहे आणि तू त्या गावातूनच बाहेर यायला तयार नाहीयेस माझ्या ह्या परिस्थितीला सुद्धा तूच जबादार आहेस, मला आधी पासून तू टांगून ठेवलंस माझ्या कडे दुसरा पर्याय काही नव्हता, तो तरी सांभाळत बोलला मी करेन न सगळ काही खूप मेहनत घेईल पण तू मला असं अर्ध्यात सोडून गेलीस तर माझ काय होईल मी तुझ्याशिवाय मरून जाइल ,
ती :- कोणी कोणासाठी मरत नसत , भेटतील तुलाही बऱ्याचश्या मुली, तर हा टोपिक इथेच संपव,
तो रात्र भर गाडी चालवून तिला भेटायला आलेला होता , त्याने विनंती केली कि आपण सोबत जेवू शकतो का, ती कामाला निघून गेली आणि हा तिचा ऑफिसच्या खाली तिची वाट बघू लागला , १० वाजे पासून दुपारी २ वाजे पर्यंत हा चकरा मारत होता, डोळे लागत होते , अशक्त पणा अजून वाढत चालला होता , उभ  राहाण सुद्धा त्याला कठीण होऊ लागल . ती जेवणासाठी खाली आली ते सोबत तर होते पण फक्त जेवनापुर्ता तिने  तोंडातून एकही शब्द न काढता सरळ ऑफिसचा रस्ता धरला तो मागे चालत होता ती मागे फिरून ओरडली आता काय ? तो म्हटला उद्या आपल्याला भेटून २ वर्ष पूर्ण होतील तर फक्त उद्याचा दिवस जर शक्य झाल तर ...?? त्याचे शब्द तुटू लागले होते ... ती म्हणाली सांगते !! आणि आता कृपया करून मागे नको येवूस इथे माझे ऑफिसचे लोक आहेत उगाच तमाशा नको करू , त्याला खूप लाज वाटली कि त्याच्या  मुले  तिला त्रास होतोय . तो तसाच पाठी फिरला दुसऱ्या दिवशी ठरलेल्या वेळेत तो तिचा घराजवळ  पोहोचला, त्याने खूप सारी Arrangement  केली होती त्याने एक शेवटचा प्रयत्न करून पहिला कि तिला त्यांचा जुन्या भेटींचे काही फोटोस दाखवून जर का परत जुण प्रेम ताज करता आल तर !! पण तिला त्याच्या सोबत वेळ घालवण सुद्धा कठीण झाल होत !, आता ती त्याचा कडे बघतही नव्हती , ठरल्या प्रमाणे हि शेवटची भेट आणि ह्याच्या पासून कायमची सुटका ती ह्याच विचारात होती , त्याने ठरवल्या ठिकाणी हि जायला नाही म्हटली समोरच असलेल्या एका छोट्याश्या  हॉटेल मध्ये दोघ जेवले ती म्हणाली मी निघू कामं आहेत भरपूर, त्याच समाधान झालेलं नव्हत !, त्याने मिश्कील चेहरा करत हळूच विचारल आपण Movie  ला जायचं ??
तिने जोरात टेबलावर हात आपटला तो म्हटला असू दे तीच हे असलं रूप बघताना त्याला खूप जास्त तुटल्यासारख झालं ! ती निघू लागली , आणि हा संपू लागला,
Long  Distance  Relationship  चा अर्थ त्याला कदाचित कळायला लागला होता, मनात शेकडो अनुत्तरीत उत्तर घेवून तो तिला फक्त जाताना बघत होता आणि तो तिला शेवटचा हाकहि देवू शकत नव्हता सगळ काही संपल होत , नोकरी गेली , छोकरी गेली , घर दार , आई वडील सगळ काही उध्वस्थ झालेलं होत , त्याहून अधिक ह्याच्यातच हा तुटून पडला होता , कि नाते संबंध इतक्या सहजासहजी कशे बदलू शकतात , त्याने शक्य ते सगळे प्रयत्न केले होते तिला मिळवण्याचे पण फायदा काहीच झालेला नव्हता दोन वर्षाच्या साऱ्या आठवणी प्रेमात घेतलेल्या आणाभाका सगळ्या खोट्या ठरू लागल्या होत्या ..
त्याला त्याचीच लाज वाटू लागली ...हा रस्त्यावरच जोरदार रडायला लागला , त्याला तिची गरज होती आता सुद्धा तो विचार करत होता कि ती परत फिरेल ... पण पण ..तसं काहीच नाही झाल ती मागे न वळून  बघता निघून गेली ,.. आणि हा जोर जोरात हसायला लागला ,...सगळ्या संवेदना संपल्या ,
आयुष्यातील रंग, गंध, चव , गती , सगळ तिच्या सोबत निघून गेल होत , त्याचा आत्मविश्वास संपला , एव्हाना त्याचा स्वतः वरचा विश्वासच उडाला !! ..
बाजूला असलेल्या आरश्यात त्याने डोकावून बघितल त्याचं प्रतिबिंब त्याला हसत होत !! आणि थोड्या वेळानंतर त्याच प्रतीबिम्बाने त्याचावर थूकून टाकल . ह्याला सगळच वैर झाल्यासारखं वाटू लागल ,
आजु बाजूला असेलेल्या लोकांची देखील त्याला भीती वाटू लागली .. कसा बसा तो त्याच्या गावी परत आला ,... पण सगळे विचार तिच्या अवती भवती फिरत होते ....
तो स्वताशीच बोलू लागला ,..आसपास कोणीच नव्हत ...स्वताला हिम्मत देण्यासाठी नशेचा आधार त्याने घेतला तिच्या छोट्या छोट्या गोष्टी आठवून तो अजूनही मनात हसत होता ,
आणि नेहमी बोलायचा Long Distance  relationship  काय असते ,
त्याला त्याची चूकच कळत नव्हती, हि सगळी उत्तर शोधन त्याला खूप आवश्यक झाल होत , त्याने निर्धार केला कि तो ह्या सगळ्यांची उत्तर शोधूनच राहील ..आणि ह्या Long  Distance relationship चा अर्थ शोधण्यासाठी तो प्रेमवेळा कायम साठी ह्या जगापासून long Distance Relationship मध्ये निघून गेला

rajpawer

khup bhari ahe..story..kharch radu aal yar..kharch muli ka ashya vagtaa yar..ka klt nhi tyna prem..

Siddharth Baghel

 :'( me he story ghet aahe Karan me new director siddharth

mjare

Mhnje samjle nhi..Sir..?