mjare

जोडपे....Funny sanwaad katha..M.jare..♥
« on: March 21, 2017, 06:36:03 PM »
तो - झाल्या का पोळ्या?
खूप भूक लागलेय.
ती - झाल्या ना. मलाही
भूक लागलेय पण पोळ्या
करायला वेळ लागतो.
तो - म्हणूनच सांगत होतो,
लवकर स्वैपाकाला लाग.
ती - आणि तू काय करशील?
सोफ्यावर बसून टी. व्ही.
बघशील?
तो - तसं नाही गं. जरा
जास्तच भूक लागली होती
म्हणून जरा. ते जाऊदे.
कसली भाजी आहे.
ती - नाही
तो - ही कोणती नवी
भाजी? नाही?
ती - म्हणजे भाजी नाही.
तो - भाजी नाही? मग
काय नुसत्याच पोळ्या
खायच्या काय आज?
ती - हे बघ मला स्वैपाक
करायला वेळ लागतो. सवय
नाही. आणि तुला भात,
भाजी, आमटी, पोळी सगळं
लागतं. आज भाजी
चिरायला वेळच मिळाला
नाही.
तो - मला सांगायचं
ती - सांगितलं. पण
कॉम्प्युटर समोर बसलास
की तुझ्या कानाची होते
फुंकणी. नळी फुंकिली
सोनारे. इकडून तिकडे गेले
वारे.
तो - मी फुंकणी आणि तू
सोनार? जरा जोरात
फुंकायचं ना. ऐकू आलं असतं.
ती - जेवायचंय ना? की
फुंकर मारू अजून एक?
माझ्या ऑफिसमधल्या
लोकांना मी केलेल्या
पोळ्या खूप आवडतात. तुला
नसतीलच खायच्या तर ते
खातील.
तो - नको. एवढं अन्नदान
नको.
ती - कंजूस.
तो - मुद्दा तो नाही आहे.
तू आज पोळ्या केल्यास
म्हणून तुझे जाहीर आभार.
पण आता त्या पोळ्या
पाण्याबरोबर खायच्या
का?
ती - नाही.
तो - हवेबरोबर?
ती - शिकरण केलंय. ते
वाढून घे आणि गीळ किती
गिळायच्यात त्या
पोळ्या.
तो - शिकरण केलंय? अरेरेरे,
काय ही भाषा. शिकरण
स्त्रीलिंगी. ती शिकरण, ते
शिकरण नाही.
ती - ई…. ती शिकरण
काय. ते शिकरणच बरोबर
आहे. ते केळं आणि त्याचं ते
शिकरण.
तो - फालतू लॉजिक सांगू
नकोस हं. तुला गाणं आठवतं
का ते? केळ्याची शिकरण
करायला गेली धुपकन
पडली आत?
ती - आठवतं.
तो - मग मान्य कर की चूक
झाली.
ती - चूक तुझी होतेय. मला
आठवतंय, केळ्याचे शिकरण
करायला गेली धुपकन
पडली आत. चुकलायस तू मी
नाही.
तो - हे बघ तू मला बाकी
कशाचंही लेक्चर दे, पण
मराठीचं देऊ नकोस.
ती - का बरं का? मी तुला
कसलंही काही सांगायला
लागले की तुझं हेच. हा
विषय सोडून दुसरं
कशाचंही लेक्चर दे. असे
काय दिवे लावलेस रे तू
मराठीत? पु. ल. देशपांडेच
की नाही तू? की आचार्य
अत्रे?
तो - अगदी तितका नसलो
तरी थोडं फार लिहितोच
की मी
ती - कुठे? ब्लॉगवर? काळं
कुत्रंतरी वाचता का रे
तुझा तो ब्लॉग? अरे ब्लॉग
लिहिण्यापेक्षा जरा
घरातली कामं कर, म्हणजे
शिकरण खायची वेळ येणार
नाही. मी एकटीने काय
काय म्हणून करायचं.
तो - मुद्दा मी कुठे काय
लिहितो हा नाहीये.
मुद्दा हा आहे की माझं
मराठी तुझ्यापेक्षा चांगलं
आहे.
ती - हे आपलं तुझं मत. तुझ्या
मताला मी किंमत देत
नाही.
तो - ते माहितेय मला.
आजचं का आहे ते. पण हे माझं
मत नाही. दहावीत मला
मराठीत ऐंशी मार्क
मिळाले होते.
ती - मला एटीटू मिळाले
होते.
तो - अगंपण माझी फर्स्ट
लँग्वेज होती मराठी.
ती - लँग्वेज होती ना? मग
तर झालं. मार्क कुणाला
जास्त होते? मला. मग
मराठी कुणाला जास्त येतं?
मला? मग ती शिकरण का ते
शिकरण? ते.
तो - च्यायला. तुला
शिकवणारे धन्य आणि तुला
मार्क देणारे त्याहून धन्य.
ती - ए. जास्त बोलू नकोस
हां. माझी आईच
शिकवायची मला. आणि
तिला तिच्या आईने
शिकवलं.
तो - तरीच.
ती - लाज नाही वाटत
माझ्या माहेरच्यांना नावं
ठेवायला?
तो - नावं ठेवायची
नाहीत म्हणूनच तर
लग्नात तुझं नाव नाही
बदललं.
ती - फार उपकार केलेस हं.
बदललं असतंस तर बदडलं
नसतं तुला?
तो - पुन्हा विषयांतर करू
नकोस. मुद्दा वेगळाच आहे.
ती - ते शिकरण
तो - ती शिकरण
ती - मी जेवतेय तुला हवंय?
तो - हो.
ती - पोळीबरोबर ते…..
शिकरण देऊ का?
तो - मला ती शिकरण दे तू
ते शिकरण खा.
ती - आता कसं शहाण्या
मुलासारखं बोललास.
तो - थांब पोळ्या थंड
झाल्यात मायक्रोव्हेव
करून आणतो.
ती - शहाणा माझा बाळ.
तो - हं...M.Jare...@