mjare

M.j..10.... एक प्रियकर....M.Jare..♥
« on: September 15, 2016, 07:10:09 AM »
10..M.jare....
संध्याकाळची वेळ होती...
 तसा अंधारायला अजून बराच अवधी शिल्लक होता...
वातावरण कस प्रसन्न प्रसन्न वाटत होतं...
फिरायला जाणारे हळू हळू रस्त्यावर येवू लागले होते....
प्रियाही रस्त्यावर सायकल घेवून निघाली होती...
 सायकल चालविता,
चालविता येणाऱ्या हवेच्या झोतामुळे तिचे बॉबकट असलेले
केस उडत होते....
सायकल चालविता चालविता तीची ती एका
हाताने चेहऱ्यावर येणाऱ्या केसांच्या बटा बाजुला,
सारण्याची तऱ्हा फारच लोभस वाटत होती...
आणि थोड्या,
वेळाने त्याच हाताने हवेने उडणारा स्कर्ट सारखा करण्याची
तऱ्हाही एक विशीष्टच होती...
थोडं अंतर कापल्यानंतर तिने,
आपली सायकल रस्त्याच्या कडेला घेतली आणि एका
कंपाऊंडच्या लाकडाच्या गेटच्या बाजुला उभी केली...
सायकल साईड स्टॅंडवर लाऊन तिने लॉक केली आणि मग ती
त्या लाकडाच्या गेटकडे गेली....
सायकल थांबवणे...
सायकल स्टॅंड्वर लावने...
आणि मग लॉक करणे...
प्रत्येक हालचालीत कशी
एक मनाचा ठाव घेणारी रिदम होती...
ज्या गेटकडे ती गेली होती ते महादेवचं घर होतं...
घराच्या अंगणात कुणी आहे का हे,
पाहत तिने गेट उघडलं...
घराचं दार बंद होतं...
आणि अंगणातही कुणी नव्हतं...
संध्याकाळची वेळ असल्यामुळे तिला अपेक्षीत
होतं की अंगणात कुणीतरी असेल...
निदान महादेव तरी...
कमीत कमी घराचं दार तरी उघडं असायला हवं होतं...
पण तेही बंद होतं,सगळेजण कुठे बाहेर गेले की काय...
गेट उघडून ती घराच्या अंगणात आली....
ती प्रथमच महादेवच्या
घरी येत होती म्हणून तिने आजुबाजुला एक नजर टाकली....
घराची एकही खिडकी उघडी दिसत नव्हती... सगळ्या खिडक्या आतून बंद होत्या...
ती घराच्या दाराकडे जावू
लागली....
दाराला बाहेरुन कुलूप नव्हते...
म्हणजे नक्कीच घरात कुणी तरी असणार....
कदाचित महादेवची आई एकटीच घरात असणार...
किंवा महादेव एकटाच घरी असणार आणि तो आपल्या रुममधे
अभ्यासात व्यस्त असणार...
तिने विचार केला आणि ती दरवाजासमोर येवून थांबली...
दाराची बेल दाबण्यासाठी वर गेलेला हात पुन्हा खाली
आला कारण दाराला बेल नव्हती...
तिने मग हळूच दार ठोठावले...
आत काहीही हालचाल जाणवत नव्हती...
तिने पुन्हा दार वाजवले,तरीही आत काहीच हालचाल जाणवत नव्हती...
कदाचित खरंच घरात कुणी नसेल...
कुठेतरी बाहेर गेले असतील....
घर कदाचित मागणं बंद करुन बाहेर गेली असतील सगळी....
आजकाल तिने इथे बऱ्याच जणांकडे चोऱ्या होवू नए म्हणून
घराच्या मागच्या दाराला कुलूप लावून बाहेर जाण्याची
पध्दत बघितली होती....
मागच्या बाजुने जावून बघावं का..?
पण नको आपण इथे प्रथमच येतो आहो आणि आपल्याला मागे
कसं जायचं आणि मागे काय काय आहे काहीच माहित नाही...
ती विचार करता करता वळून कंपाऊंडच्या फाटकाकडे,
निघाली तेवढ्यात तिला घराचे दार उघडण्याचा आवाज आला...
तिने वळून पाहाले तर दारात महादेव उभा होता...
"" अरे मला वाटलं घरात कुणीच नाही..?''
प्रिया परत जात म्हणाली...
तो घरात बोलावेल या अंदाजाने ती त्याच्या जवळ उभी
राहाली तसा तोच घराच्या बाहेर अंगणात येत म्हणाला,
''ये इथे बाहेरच बसूया''
बाहेर अंगणात टीनाच्या दोन-तिन फोल्डींग खुर्च्या
टाकलेल्या होत्या,त्यातली एक ओढून तिच्यावर बसत, दुसऱ्या
खुर्चीकडे इशारा करीत महादेव म्हणाला,
'' बस की''
ती त्या खुर्चीवर बसत म्हणाली,
'' नाही म्हणजे....
मी तुझ्याकडे तुझ्या पी -1 च्या नोट्स
मागायला आले होते...
म्हणजे तुला एवढ्यात त्यांचं काही काम
नसेल तर...''
'' नाही तसं दोन-तिन दिवस तरी मला त्यांचं काही काम नाही...
कारण मी सध्या एम-1 आणि सी-1 चा अभ्यास करीत आहे...
त्याची टेस्ट आहे ना उद्या आणि परवा...
पण तिन दिवसानंतर मात्र मला त्या लागतील...
पाटील सरांची टेस्ट
आहेना त्यानंतर म्हणून''
'' दोनच दिवसात परत करीन मी'' प्रिया आपल्या चेहऱ्यावर
येणाऱ्या केसांच्या बटा मागे सारीत म्हणाली...
महादेव डोळ्यांच्या कोपऱ्यातून तिचे ते संध्याकाळच्या हवेमुळे,
डोळ्यावर येणारे केस आणि तिची ती मागे सारण्याची लकब
पाहत होता...
तेवढ्यात एक मध्यमवयीन बाई आपले केस विंचरत विंचरत घराच्या
बाहेर आली...
'' ही माझी आई'' महादेवने आपल्या आईची ओळख करुन दिली...
'' गुड इव्हीनींग आंटी '' प्रियाने अभिवादन केले...
महादेवच्या आईने गालातल्या गालात हसून जणू तिच्या
अभिवादनाचा स्विकार केला...
'' आणि ही माझी क्लासमेट - प्रिया '' महादेवने तिची ओळख
करुन दिली...
'' कुणाची पोर तू?''
महादेवच्या आईने प्रेमळपणे तिची चौकशी
करीत विचारले...
प्रियाला तिचा तो प्रेमळपणा पाहून आपल्या आईची आठवण
आल्यावाचून राहाली नाही...
'' उल्हासराव कुळकर्णी...
माझे वडील...
तुम्ही कदाचित ओळखत नसाल कारण आधी आम्ही मुंबईला असायचो...
एवढ्यातच बदली होवून आम्ही इथे आलो आहोत'' प्रिया
म्हणाली...
"" कुठे कामाला आहेत तुझे वडील'' महादेवच्या आईने विचारले...
'' स्टेट बॅंकेत'' प्रिया म्हणाली...
'' असं होय ...
तुझे वडील ओळखत असतील नाही..?"
महादेवच्या आईने महादेवला विचारले...
'' नाही आई...
बाबांचं तिकडे फॉरेस्ट डिपार्टमेंट आहे... इचे
वडील बॅंकेत आहेत'' महादेव म्हणाला...
'' नाही तुझे वडीलही जातात की कधी कधी बॅंकेत ''
महादेवची आई म्हणाली...
'' हो जातात...
पणे ते लोक काय प्रत्येक येण्या -जाण्याऱ्यांना थोडी ओळखणार'' महादेव...
'' हो तेही आहे म्हणा''
'' पण आता ओळख होईल कदाचित'' प्रिया म्हणाली...
तेवढ्यात घरातून, कदाचित स्वयंपाक खोलीतून काहीतरी खड
खड असा आवाज आला तशी महादेवची आई '' थांब पोरी...
मी आले'' असं म्हणत महादेवची आई आत गेली...
महादेवची आई आत गेली तशी महादेव आणि प्रियात एक क्षण
तसाच काही न बोलता गेला....
काय बोलावं हे दोघं मनातल्या,
मनात कदाचित ठरवीत असावेत....
'' बरं त्या नोट्स'' प्रियाने पुन्हा आठवण दिली...
'' एक मिनीट'' म्हणत महादेव उठला आणि घरात गेला...
क्रमश: म.जरे
          continue

mjare143.blogspot.in/