mjare

M.j..9.... एक प्रियकर....M.Jare..♥
« on: September 15, 2016, 06:48:17 AM »
9...कॉलेज ..M.jare..
कॉलेज सुटलं होतं...
कॉलेजच्या गेटमधून एकदमच सायकल्स आणि
मोटार सायकलींचा मोठा लोंढाच्या लोंढा बाहेर यायला
लागला...
काही विद्यार्थ्यांचे चेहरे कॉलेज सुटलं या आनंदाने,
चमकत होतं तर काही विद्यार्थ्यांचे चेहरे भूकेने व्याकुळ होवून
कोमेजलेले होते....
महादेवचा शेवटचा तास सामान्यत: नेहमीच
केमेस्ट्री, बायोलॉजी किंवा फिजिक्स च्या लॅबचा
असायचा...
सकाळी एकदा नाश्ता करुन निघालं की सकाळी
सकाळी फ्रेश मुडमधे वेगवेगळ्या सब्जेक्टसचे क्लासेस होत...
मग एक,
रिसेस व्हायची आणि मग पुन्हा क्लासेस त्यामधे जनरली भाषेचे,
वर्ग होत आणि पुन्हा एक रिसेस होत असे आणि तिसऱ्या,
भागात जेव्हा सर्व विद्यार्थी थकलेले असत तेव्हा फिक्जीक्स
केमेस्ट्री किंवा बॉयलॉजीची लॅब असायची.... सायंसच्या
विद्यार्थ्यांना तरी एका क्षणाचीही फुरसत मिळत नसे...

तसे आर्टस कॉमर्सचे विद्यार्थी खऱ्या अर्थ्याने कॉलेजच्या,
जिवनाची मजा घेत असतं....

कधी मुड झाला तर क्लासेस करायचे,
नाहीतर मस्तपैकी कॉलेजच्या कॅंटीनमधे किंवा कट्ट्यावर
गप्पा मारत बसायचं...
सायंसचे विद्द्यार्थी जसे बिझी असत तसे
त्यांचे प्रोफेसरही बिझी असत...
दुपारपर्यंत क्लासेस झाले की,
कॉलेज सुटल्यानंतर जेवन झाल्यावर लगेचच त्यांच्या ट्यूशनच्या,
बॅचेस सुरु होत त्या थेट रात्री दहा वाजेपर्यंत चालत...
तशी कॉलेज सुरु व्हायच्या आधी म्हणजे सकाळी सहा ते सात,
अशीही एक बॅच घेण्याची संधीही ते सोडत नसत....
त्याबाबतीत आर्ट आणि कॉमर्सच्या विद्द्यार्थ्यीची आणि
प्राध्यापकांची फार मजा असे...
म्हणजे कॉलेजमधेही,
विद्द्यार्थांनी क्लास केलाच तर व्हायचा आणि कॉलेज
सुटल्यानंतरही ट्यूशन वैगेरेची भानगड राहत नसे...
मग अश्या वेळी,
कधी कधी आर्ट कॉमर्सचे प्राध्यापक क्लास न घेउन,
कंटाळायचे आणि मग त्यांची कधी कधी क्लास घ्यायची,
तिव्र इच्छा आणि मुड व्हायचा...
पण मग क्लासमधे गेल्यावर जर
विद्ध्यार्थी नसतील तर ते चपराश्याला विद्य्यार्थ्यांना,
बोलावण्यासाठी थेट कॅंटीनवर पाठवायचे... आणि त्यात जे
बिचारे दोन चार विद्यार्थी त्या प्रोफेसरांच्या तावडीत
सापडायचे त्यांना तो जबरदस्तीचा क्लास करावाच लागत
असे...
त्यामुळे कॉलेज सुटल्यानंतर त्या लोंढ्यात ज्यांचे चेहरे कोमेजलेले
असत ते मुख्यत: सायंसचेच विद्यार्थी असत...
आणि ज्यांचे चेहरे प्रफुल्लीत असत ते त्यांच्या आईवडीलांनी जबरदस्ती
कॉलेजमध्ये पाठवलेले आर्ट कॉमर्सचे विद्ध्यार्थी असत....
आणि,
त्यांचे चेहरे प्रफुल्लीत होण्यामागे कॉलेज सुटने हे प्रमुख कारण,
असण्या ऐवजी हीच ती कॉलेज सुटण्याची वेळ असे की
ज्यावेळी त्यांना सायंसच्या सुंदर आणि चेहरे कोमेजल्यामुळे
अजुनच सुंदर दिसणाऱ्या मुली बघण्याची संधी मिळत असे...
महादेवने आणि राजेशने त्या लोंढ्यातून मार्ग काढीत सायकल
गेटच्या बाहेर काढली आणि ते घरी जाण्यासाठी मुख्य
रस्त्याला लागले...
घरी जातांना ते सामान्यत: काही बोलत
किंवा गप्पा मारीत नसत कारण त्यांना कॉलेज सुटल्यानंतर
खुप भूक लागलेली असे आणि केव्हा एकदा घरी जातो आणि
जेवण घेतो असं होत असे...
सायंस च्या विद्यार्थ्यांना मुली बघणे
वैगेरे या भानगडीत पडण्याची इच्छा म्हणण्यापेक्षा उसंत राहत नसे...
आधीच ते थकलेले असत आणि घरी जावून जेवल्यानंतर,
लगेच ट्यूशनची पहिली बॅच सुरु व्हायची त्यामुळे त्यांना इकडे,
तिकडे वेळ दौडवून चालत नसे...
मुख्य रस्त्यावर लागल्यावर महादेव,
आणि राजेशने आपापली सायकल जेवढं शक्य होईल तेवढ्या
वेगात पळवली...
नंतर एका वळणावर राजेश आणि महादेव चा
रस्ता बदलायचा...
"" ओके बाय .. सी यू इन ट्यूशन'' राजेश वळणावरुन वळतांना
त्याच्याकडे न पाहताच म्हणाला...
"" बाय.. '' महादेवही त्याच्याकडे न पाहताच म्हणाला आणि
पुढे सायकल चालवू लागला...
थोडं अंतर कापल्यानंतर मग महादेवच्या घराकडे जाण्याचं वळण
यायचं...
त्याने आपल्या तंद्रीतच आपली सायकल त्या वळणावर
वळवली...पण वळणावर वळतांना त्याच्या ध्यानात आलंकी
त्याच्या मागे मागे कुणीतरी येत आहे...
कदाचित कॉलेजचच कुणीतरी...
कॉलेजचं दुसरं कुणीतरी असतं तर कदाचित त्याने
तिकडे दुर्लक्ष केलं असतं...
पण ती कुणीतरी कॉलेजची एखादी
सुंदर मुलगी असावी, आणि कदाचित ओळखीची, असं त्याला
वाटलं...
म्हणून त्याने त्याने वळून पाहालं तर ती प्रिया होती...
तिचंही घर तिकडेच होतं पण ती केव्हा त्याच्या मागे यायची
नाही किंवा मागे येवू शकत नसे कारण महादेव आणि राजेश
पटकन बाहेर पडून आपल्या सायकली जोरात पळवायचे...
ही आज आपल्या मागे आहे....
म्हणजे हिनेही सायकल जोरातच
पळवली असेल...
कदाचित तिला काही महत्वाचं काम असेल की तिला घरी
लवकर पोहोचायचं असेल...
त्याने विचार केला..
पण त्याच्या लक्षात आले की त्याच्या विचारांच्या धुंदीत,
त्याची सायकल थोडी हळू झाली होती तशी तिचीही,
सायकल हळू झाली होती...
म्हणजे ही आपला पाठलाग तर करीत नाही....
तो विचार करीत होता तेवढ्यात त्याला मागून आवाज आला
-
"" महादेव ''
एखाद्या त्याच्या वयाच्या, किंबहूना त्याला आवडत
असलेल्या मुलीच्या तोंडून त्याने प्रथमच त्याचे नाव, आणि
तेही इतक्या आर्ततेने ऐकले होते...
त्याला जाणवलं की त्याच्या
हृदयाची स्पंदनं वाढली आहेत...
 त्याने आपसूकच आपली सायकल
अजून स्लो केली....
एव्हाना ती त्याच्या बरोबर येवून त्याच्या
सोबत सायकल चालवत होती...
महादेव ला काय बोलावे काही
कळत नव्हते...
त्याने नुसते तिच्याकडे पाहाले आणि नजरा नजर
होताच जणू सुर्याने डोळे दिपावे तसे त्याने आपली नजर पटकण,
समोर रस्त्यावर वळवली...
"" आज केमेस्ट्रीचं लेक्चर जरा कठिणच होतं नाही'' शेवटी
प्रियाच पुढाकार घेवून बोलली....
"" कठिण..?
हो तसं कठिणंच होतं'' महादेव म्हणाला...
"" नाही म्हणजे तुला ते सोपं जात असेल '' प्रिया म्हणाली...
"" नाही तसं काही नाही'' महादेव लाजून म्हणाला....
"" नाही म्हणजे मला केमेस्ट्री -2 चे सगळ्या रिऍक्शन्स
समजायला थोड्या कठिणच जातात...आणि समजल्या तरी
दोन-तिन दिवस झाले की सगळ्या पुन्हा विसरतात'' प्रिया
म्हणाली...
"" हो तुझं बरोबर आहे...म्हणूनच तर तर केमेस्ट्री-2 ला
व्होलाटाईल म्हणतात'' महादेव हसून म्हणाला...
"" व्होलाटाईल... खरंच व्होलाटाईलच म्हणायला पाहिजे''
प्रिया खळखळून हसत म्हणाली...
महादेव प्रथमच तिला एवढं खळखळून आणि तेही एवढ्या जवळून
पाहत होता....
तिच्या त्या दोन्ही गालावर पडणाऱ्या खळ्या
आणि तिचे ते मोत्यासारखे शुभ्र चमकणारे दात...
"" पण रिऍक्शनस लक्षात रहायला प्रथम त्या समजणे आवश्यक
आहे... नाही..?'' प्रियाने विचारले...
"" हो बरोबर''
"" तुला आत्तापर्यंत शिकवलेल्या सगळ्या रिऍक्शन्स समजल्या
आहेत का...?'' प्रियाने विचारले...
"" हो'' महादेव म्हणाला...
"" मला काही समजलेल्या आहेत पण काही समजल्या नाहीत...
त्या तु मला समजावून सांगशिलका..?
प्रियाने विचारले...
"" हो सांगिन की...'' महादेव म्हणाला...
एव्हाना तिच्या घराकडे जायचे वळण आले होते...
ती तिकडे वळत म्हणाली, "" ओके बाय देन... मी विचारीन तुला
कधीतरी''
"" हो ... बाय'' तो म्हणाला...
ती निघून गेली होती...आणि आत्ता त्याच्या लक्षात आले
होते की वळनावर त्याने पाय टेकवून सायकल थांबवली होती
आणि तो तिला जात असलेलं पाहात होता...
अगदी ती
नाहीशी होईपर्यंत आणि ती ही मधून मधून वळून त्याच्याकडे हसून पाहत होती...
महादेवने आपल्या डोक्यातले विचार झटकावं तसं डोकं झटकलं,
आणि पायडल मारुन तो आपल्या घराकडे निघाला...
नाही हे असं व्हायला नको...
प्रथम आपलं धेयं महत्वाचं...
आणि मग सगळ्या गोष्टी...
तो विचार करीत आपल्या घराकडे निघाला होता...
पण तिच्यासोबत दोन क्षण का होईना फार चांगलं वाटत
होतं...
ते काहीही असो आपल्याला स्वत:ला आवर घालावीच
लागेल...
विचार करता करता केव्हा आपलं घर आलं महादेवला कळलंच
नाही...
क्रमश: continue

mjare143.blogspot.in/