mjare

माझी मैत्री कथा कुणाला तरी
मी मित्र मानले होते पण त्याने माझ्या मैत्रीला
दुसरेच नाव दिले...
हे तुमच्याही बाबतीत घडले असेल तर
शेअर करा...

"मला ती आवडायची,तिला न मी आवडायचो
माझी बेस्ट friend तिला म्हणायचो... ♥

तिच्यासाठी मी,दूनियेशी लढायचो...
ती माझी बेस्ट होती,डोळयांतले तिच्या पाणी ते
माझे डोळे ही भिजवायचे,मग तिला हसवून
मलाच मी सूखवायचो,
तिला माझी Best Friend मी म्हणायचो... ♥

आता ती मला भेटत नाही पण....
माझ्या मैत्रीचा गंध तसाच आहे...
असे काय चूकले मला,सोडून तू गेलीस
मैत्रीची ती वेल जिला मी,
जपले ती कळी विश्वासाची
तोडून,
विरह रोग देऊन तू गेलीस....
विरह रोग माझ्या मैत्रीलाच
का लागावा...??
उपाय ही कदाचीत तूझ्याकडेच असावा
तूला मी आवडत नाही,मात्र मला तू आवडतेस,कधी तरी असो
पण....
मित्राला तू आठवतेस....
आहेस जेथे कूठे,तू आनंदीच रहावी
मी नाही तेथे
पण....
पाखरांनी भेट तूज द्यावी,पाखरांनी पाहून उंच उंच उडावे,
नाते आपले पाखरांनी त्या
आकाशास ही सांगावे...
आज मी वाट तसाच पाहतो
तू पून्हा येशील याची,आस मी धरतो
खरंच माझी Best Friend तिला म्हणायचो...... ♥

↓↓ ♡ ♤ ◇ ♧ ↓↓ ↓↓ ♡ ♤ ◇ ♧ ↓↓

कारण ती मला तिचा "best friend"मानायची....
मला वाटायच तीच,
माज्यावर जीवापाड प्रेम आहे...
फ़क्त मी विचारायची देरी आहे ...
मलाही ती प्रचड आवडायची
जेव्हा ती मला आपला "best
friend"म्हणायची.....♥

मनातल गुपित फोडायची , लाडत येऊन बोलायची ,
लटक
रागवायाची , माज्याशी भान्डायची ,
गप्पा मारायची ..
माज्या कविता ऐकायाची,
त्याना उत्सुर्फ़ दाद द्यायची...
माज्यावर प्रेम करायची ...
पण,
मला माहित नव्हत ती मला फ़क्त आपला"best
friend"मानायची.... ♥

मला खुप यातना जाल्या,
जेव्हा ती म्हणाली...
"मी प्रेमात पडले रे त्याच्या....
" पण,
तिच्या अपेक्षेप्रमाणेच मी तेव्हा तिची थट्टा केली...
अन तिची कळी लगेचच खुलवली,
तिला काय सांगू काय नको जालेल...
असे तिला मी कितीदा तरी पहिलेल .
मी म्हणालो,"मज़ा आहे...
बुवा एका मुलीची....!"
ती म्हणाली,"तुला पण मिळेल रे साथ
कोणा सुन्दरीची....!"
मन रडत असतानाही हासत होतो.....
तिला कलू
न देण्याची सगळी काळजी घेत
होतो......
तिला पण काहीच कळल नाही
प्रेमात,
पडलेल्या तिला वेगळ काहीच दिसत
नाही....
मी पण,तसदी घेतली नाही मनातल
काही बोलायची...
कारण ती मला आपला "best
friend"मानायची..... ♥
ती गेल्यावर मी सुन्न
जालो ,आतल्या आत मी मग्न जालो ,
तिच्या आठवणी मी आठवू लागलो....
त्या पुसून
टाकायचा निष्फ़ळप्रयत्न
करू लागलो ,
तिच्याशी बोलताना मी तिची खुप
थट्टा करायचो....
त्याच्या'नावाने तिला भरपूर चिडवायचो..
कोणाशी भांडल्यावर मात्र,
तिला माजी आठवण यायची....
आजही माज्या मध्यस्थीची तिला गरज
वाटायची ,
ती अजुन ही माज्याशी खुप
बोलायची ,
खुप काही सांगायच म्हणायची ,
पण कधी ते सांगायला विसरायाची....
मनातले अश्रु मी तिला कधीच
दिसू दिले नाहीत , कारण
ती मला तिचा"best friend"मानायची....♥

मी मात्र आतल्या आत कुढत
बसायचो,
माज्याच एकटे पणात हरवलेला
असायचो...
तिचे बोलणे ऐकत असताना , मुकपणे
आपले अश्रु गिळत
असायचो तिच्यासमोर नाटक करणे
फारच
कठीण होते.....
त्याच तीच भांडण,ती मला येऊन सांगायची....
माज्याशी बोलून मोकळ वाटल अस
म्हणायची....
स्वत:च्या वेदना लपवून तिचे बोलणे... शांतपणे ऐकून घ्यायचो, एक दोन गोष्टी सांगून,तिला बरे वाटावे असे
काहीतरी करायचो......
माज्या बोलन्यापेक्षा माज्या
असन्यावरच,ती समाधानी असायची.....
कारण ती मला तिचा "best
friend"मानायची..... ♥

आधेमधे,
तिलापण काही तरी हुक्की यायची ,
कोणाच्याही नावावरून मला चिडवून
पहायची...
मीही हसून खोटा राग दाखवायचो ,
तिच्या चीडवन्यावर खोटे चिडून
तिला खुष करायचो...
माज्या वेदना आणि दुःख कधीच
दाखविले नाही , एका शब्दाने
ही तिला कलु दिले नाही.....
त्या दिवशी त्याची आणि माजी भेट
जाली..
माजी ठसठसणारी जखम
पुन्हा उघडी पडली....
तिने माजी ओळख चांगला मित्र म्हणुन करून दिली....
मी भेट,दिलेल्या "माज्या कविताची वही"
त्याला दाखविली....
दुसरयाच दिवशी त्याने
तिला आपली कविता भेट दिली..
कारण,
त्याला कदाचित तिच्या बद्दल
असुरक्षितता भासली....
तिला मात्र
कधीच याची भिती नाही वाटायची..
कारण ती मला तिचा "best
friend"मानायची.... ♥

तिच्या लग्नामधे,तिने मला आवर्जुन बोलावले..
"लग्नाला नक्की यायचे"असे
पत्रिकेत लिहून पाठविले...
माज्या ह्रुदयाची शकले मीच
गोला केली , एक तिच्या आवडीचे
गिफ्ट घेवून
तिची भेट घेतली....
चेहरा हसरा ठेवून मी काळजी घेतली तिला खूष ठेवायची...
कारण ती मला तिचा "best
friend"मानायची..... ♥
तिच्या लग्नानंतर
मात्र,
मी एक गोष्ट केली कटाक्षाने तिची भेट टाळली...
माज्या वागन्यातला फरक तिला कलू
द्यायची माजी तयारी
नव्हती....
कारण त्याच्या प्रेमात बुडालेल्या तिला..
माज्या अश्रुंची मुळीच कदर
नव्हती...
मी इतके दिवस असे काही दाखवले
नाही कारण ती मला फक्त
तिचा "best friend"मानायची..... ♥

आयुष्यभर,
एकट राहून जगत आलो,
तिच्या पत्राना जानून बुजुन एक दोन
ओळीत उत्तर लिहू लागलो,
माज्या बिजी लाइफचा चांगला बहाना
माज्या कड़े होता....
तिच्याही व्यापन मुले तिला आजिबत
वेळ नव्हता....
तरी पण माज्या एक दोन
ओळीना ती उत्तर पाठवायची...
कारण ती मला तिचा "best
friend"मानायची....♥

तिच्या अखेरच्या क्षणी मी तिला
भेटलो , इतके दिवस
थाम्बलेल्या अश्रु संकट बोललो....
शेवटच्या घटका मोजताना तिला फार
बोलावले नाही....
मलाही जास्त वेळ थाम्बवले नाही...
तरीही एका वाक्यात तिने सांगितले..
"तू आता पर्यंत खरे मित्रत्व दाखवले" डोळ्यानीच,
ती म्हणायचे ते म्हणाली ,
ती मला तिचा "best
friend"मानायची......♥

आता माजाही प्रवास संपत
आला आहे ,
मागे,
बघताना त्या हीरवळीचा हेवा वाटत
आहे , आताच पोस्टमन येवुन हे
पारसल
देवून गेला.....
माज्या मनात प्रश्नांचे काहुर माजवुन गेला....
काय गरज
होती का तिला तिच्या मृत्यु पत्रात
आवर्जुन माज्या साठी काही ठेवायची...! पण
नाही , कारण ...
ती मला तिचा"best friend"मानायची.......♥

तिच्या डायर्यांमधे सापडले ,
माजे हरवलेले क्षण, आठवणी ,
खोडया,
थट्टा, हसने, बोलणे, रडणे..,
गुपित, गोष्टी, गाठी, भेटी...
मैत्री आणि बरच काही.....
आणि पटत गेले की .....
खरच ती मला तिचा "best
friend"मानायची.... ♥

जेव्हा शेवटच्या पानावर
तिच्या ओळी वाचल्या....
ह्रुदयातिल अश्रूना जणू वाटा मोकाळ्या जाल्या..
"मला वाटायच त्याच माज्यावर
जीवापाड प्रेम आहे.....
फक्त त्यांन,
मला विचारायची देरी आहे.....
मला तर
तो प्रचंड आवडतो....
मी त्याला "best friend"म्हटल्यावर
गालातल्या गालात
हसतो ....
मनातल गुपीत सांगतो .
माजे ऐकतो...
माज्याशी भांडतो ....
त्याच्या कविता ऐकवून ,
माज्या कड़े अर्थपूर्ण कटाक्ष
टाकातो....
 माज्या वर प्रेम करतो ....
खरच का तो माज्या वर खर प्रेम
करतो...?
जणू,
माज्या ओळी मी तिच्या डायरीत वाचत होतो....
मरन्यापूर्वी सरणावर जळत होतो....
काय,
गरज होती मरण शय्येवर नियतीनेही
माजी अशी क्रूर थट्टा करायची.....
त्या शेवटच्या क्षणी मला जाणवून
दयायची की
"वेड्या ती तुला तीच "true.......love"मानायची.......♥
                Miss u....p.. ♥
_▄▄_
(●_●)
╚═► => एक प्रियकर...M.Jare....*.♥
मराठी प्रेम कथा,प्रेम कविता,फक्त यासाठी...

mjare143.blogspot.in/

              【९६०४६७२०७४】
♥ ❇ ♥ ❇ ♥❇ ♥ ❇ ♥ ❇ ♥ ❇ ♥❇ ♥ ❇ ♥