m4marathi Forum

मराठी कथा मराठी गोष्टी ( Marathi Goshti / Marathi katha / Marathi stories / Marathi story ) => प्रेमाच्या गोष्टी Marathi Love Stories => Topic started by: mjare on August 31, 2015, 06:40:11 PM

Title: एक प्रेम कि एक मैत्री....♥एक प्रियकर...M.jare .....♥)
Post by: mjare on August 31, 2015, 06:40:11 PM
एक प्रेम कि एक मैत्री....♥
               (एक प्रियकर...M.jare .....♥)
आम्ही एकाच कॉलनीत राहतो......ती आणि मी.......मी तिच्यापेक्षा तीन वर्षाने
मोठा आहे.....♥


मी जेव्हा जेव्हा तिच्या घरासमोरुन जात
असतो,तेव्हा तेव्हा ती माझ्याकडे बघत
असते.मला वाटतं तिचं माझ्यावर प्रेम आहे...
ती दिसायला सुंदर आणि स्वभावाने तर खुपच
चांगली आहे,मलाही ती खुपच आवडते पण,सर्वात
मोठा प्रोब्लम काय आहे माहीतीये she is my bst
frnds sistar......ती माझ्या बेस्ट फ्रेंडची सख्खी बहीण
आहे।पण मी तिला खुप...आवडतो,जेव्हा मी माझी
आंघोळ
वगैरे आवरुन बाहेर येतो,तोपर्यंत
ती मला पाहण्यासाठी दारात
उभी असते.आणि जोपर्यंत मी बाहेर येत
नाही,मला एकदा बघत नाही तोपर्यंत
ती कॉलेजला जात नाही,तिथेच उभी असते
कॉलेजला जातानाही पुन्हा पुन्हा वळून मागे पाहत,
असते मग मी संध्याकाळी निवांत जेव्हा बाल्कनीत
येतो तेव्हा ती बाहेर उभी राहुन माझी वाटच बघत,
असते कि,कधी मी एकदा येईन आणि तिच्याकडे माझी,
एक
नजर वळवुन पाहीन,आणि मी तिच्याकडे पाहील्यावर
मग ती दुसरीकडे बघत असल्याचं नाटक करायची
गेली ६ महीने मी तिला टाळत आलोय तिच्याकडे न
बघणं,तिच्यापासुन लांबलांब पळणं माझं चालुच
होतं.कारण मी ठरवलं होतं की काही झालं
तरी मित्राच्या बहीणीशी मी कसंकाय प्रेम करु
शकतो,मी मित्राला कसंकाय धोका देऊ शकतो....?

नाही नाही हे कधीच होऊ शकत नाही.माझेच
सिद्धांत
मला याची अजिबात परवानगी देत नव्हते म्हणुनच
मी तिला अशा प्रकारे टाळाटाळ करत होतो पण
तरीही ती न डगमगता माझ्यावर अशीच प्रेम करत
होती माझ्याकडे सतत
पाहायची आमच्या घरी येण्याची सतत बहाणे
शोधायची,आमच्या घरच्यांची आणि त्यांच्याघरच्यांची चांगली ओळख होती ना म्हणुन तिच्या याच
प्रेमासमोर माझे सिद्धांत विरघळले गेले,हळुहळु खुपच
प्रेम करु लागलो होतो मीही तिच्यावर....♥


मग मी तिच्या त्या घायाळ करणार्या नजरेत
इतका बुडालो कि मी ही तिच्याकडे सारखासारखा
बघु
लागलो,आणि तिला कसंही करुन प्रपोझ करायचं
ठरवलं,मी एक चिट्ठी लिहुन पुस्तकातल्या एका
पानात
घडी घालुन ते पुस्तक(थोडं घाबरतच) तिच्याकडे
एका लहान मुलगीद्वारे पाठवुन दिलं पण ते तसंच परत
आलं ती लहान मुलगी म्हणाली की ती दीदी म्हणतीये
हे
पुस्तक तिचं नाहीमी ते पुस्तक परत घेतलं कदाचित
तिला कळलं नसावं कि यात
मी तिच्यासाठी चिठ्ठी ठेवलीये ते मग यानंतर अशीच
दोन वर्षे गेली मी त्यानंतर फेस टु फेस तिला प्रपोझ
करायचं ठरवलं,पण मी खरोखरच
याआधी कोणत्याही मुलगीशी कधीच
बोललो नव्हतं,फारच कमी मग मला हे जमेल कसं कारण
माझ्यात फारच कमी कॉन्फीडंट होतो,त्यामुळे
मी सोबत प्रेमपत्रही लिहुन घेतलं,आणि ते खिशात ठेवलं
जर मी तिला बघितल्यावर जर काहीच बोलु
शकलो नाहीतर किमान हे पत्रतर तिच्या हातात
देईन,ठरल्याप्रमाणे मी तिच्या घरात
कोणीही नसताना गेलो,माझ्या मित्राचं एक
गाण्याचं
कॅसेट माझ्याकडे होतं ते देण्याचा बहाणा करुन
मी तिच्या घरात गेलो ती एकटीच होती,मला पाहुन
ती थोडी दचकलीच,मी तिला हे कॅसेट
दिलं,आणि म्हणालो हे आशिषचं(तिचा भाऊ,माझा
मित्र)
कॅसेट ते द्यायला आलोय ते तिनं घेतलं.....♥

मी थोडावेळ
तिच्याकडे तसंच पाहत राहीलो,माझं शरीर थरथरंत
होतं भीतीने,तिने माझ्याकडे पाहीलं
आणि म्हणाली तुला काही बोलायचंय,मीःनाही नाही मला काय बोलायचं असेल असं
मी म्हणालो आणि तिथुन लगबगीने निघालो....

खुपच
घाबरलो होतो मी खुपकाही सांगायचं होतं,शब्द
ओठापर्यँत येत होते पण बाहेरच पडले
नाहीत...♥

मी आरशासमोर उभा राहिलो,मी माझ्या आत्तापर्यंतच्या
घेतलेल्या निर्णयांचा आढावा घेण्याचं ठरवलं,सर्व
गोष्टींचा सर्वबाजुंनी विचार करण्याचं
मी ठरवलं,तिला प्रपोझ केल्यावर तिने जरी माझं प्रेम
स्विकारलं तर,आमचं भविष्य काय असेल...?

काय तिचा
भाऊ
म्हणचेच माझा मित्र मला तिचा नवरा म्हणुन
स्वीकारेल,तर उत्तर येत होतं नाही..?
तो मला स्वीकारणार नाही....(Written by
एक प्रियकर...M.jare .....♥ )उलट तो मला धोकेबाज
म्हणेल,मी तिच्या मनाचाही विचार
केला मी तिला नाही म्हटलं तर काय होईल..?


तिला दुःख नक्कीच होईल पण ते तात्पुरतं असेल,पण नंतर
ती मला कदाचित विसरेल.आणि तिचं लग्न झाल्यावर
तिच्या घरी ती नक्कीच सुखी राहील......♥

तीन
तासांनी मी एका निर्णयावर येऊन
पोहोचलो,मी तिला विसरण्याचा निर्णय
घेतला,मला या निर्णयाने खुप रडु आले,मी गपचुप
बाथरुमध्ये जाऊन रडु लागलो,तोंडावर रुमाल धरुन हूंदके
देऊन रडत होतो मी काही दिवसांनी तिचं लग्न
झालं...♥

नवरा मुलाची खुपच मोठि शेती,गडगंज
पगाराची नोकरी होती त्याने मनात एक समाधान
होतं आणि एक दुःखही,डोळ्यातील आसवांप्रमाणे
मनातील आठवणी पुसता आल्या असत्या तर किती बरं
झालं असतं नाही....आज ती तिच्या संसारात सुखी
आहे
आणि तिच्या सुखात
मी हि.....शेवटी मैत्री जिँकली आणि प्रेम हारलं
सुखी राहावं तिने,जिथे असेल ती, ही एकच
ईच्छा माझ्या मनी आहे,
ती दुर जाताना माझ्यापासुन आज,चेहर्यावर हसु
आणि डोळ्यात पाणी आहे......♥


आनंदी आहेस,आनंदी राहा तुझा नवरा तुला सुखी ठेवतो
ही बातमी माझ्या कानी आहे,
ती दूर जाताना माझ्यापासुन आज,चेहर्यावर हसु
आणि डोळ्यात पाणी आहे
जाताना एकच सांगतो,सांभाळ स्वतःला गं या
वासनेने
भरलेल्या जगात,इथे
कोणासाठी ना कोणी आहे....तुम्हाला कथा
सांगणार्या एका प्रियकराची ही प्रेमकहानी आहे.....
ती दुर जाताना माझ्यापासुन आज चेहर्यावर हसु
आणि डोळ्यात पाणी आहे,चेहर्यावर हसु अन
डोळ्यात............पाणी आहे,डोळ्यात पाणी
आहे.........♥ ♥ ♥ ♥


एक प्रियकर...M.jare .....♥
Mjare89@Gmail.com
                  (9604672074)
Date:-31/08/15
Title: Re: एक प्रेम कि एक मैत्री....♥एक प्रियकर...M.jare .....♥)
Post by: tushri on November 18, 2016, 12:50:58 PM
nice story